पल्लवी: देवी! वंदे श्री ललिते!
देव! वंदये श्री ललिते!
कडवे १: देवी हे शिव रंजनी
त्राही पाहि माम्।
देवी देवी वंदे वंदे
त्राही पाहि माम्॥
कडवे २: श्री कळे ह्री कळे
गिरीश कळे चित् कळे।
सच्चिदानंद पाहिमाम्
रुचितरळे रुचितरळे॥
अर्थ:
हे देवी ललिता माते! मी तुला प्रणाम करतो. सर्व स्वर्गीय जन तुझी उपासना करतात. तू भगवान शंकराची पत्नी आहेस. तू माझे संरक्षण करावेस यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो.
तू सर्व संपत्ती, ज्ञान आणि शक्तीचे मूळ आहेस. तू विश्वनिर्माती आहेस. तुझे आध्यात्मिक तेज नेहमीच आल्हाददायक असते. सच्चिदानंद (सत्-चित्-आनंद) म्हणजेच सत्य, ज्ञान आणि परमानंद या तिन्हीच्या प्राप्तीसाठी मला आशीर्वाद दे.
हे दिव्य माते, तू संपूर्ण विश्वावर कृपादृष्टी ठेवतेस आणि या सर्व ऊर्जेची तू आद्यप्रवर्तक आहेस. तुझ्या दिव्य कृपेमुळेच या चराचरातील सर्व प्राणी बोलण्यास, काही कृती करण्यास किंवा कोणताही विचार करण्यास समर्थ आणि सक्षम होतात.
- विजयादशमी १९९८