SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21/12/2020
बौद्ध आणि हिंदू धर्मात अनेक समानता आहेत

आज एक वैश्विक भाषा आहे, जी मुलांना देखील समजते. गाय आणि साप यांनाही ही भाषा समजते. ते संगीत ऐकतात. आज दलाई लामांनी आपल्या आश्रमाला भेट दिली आणि त्यांना पाहून मला खूप आनंद झाला.

बर्‍याच वेगवेगळ्या देशांचे आणि वेगवेगळ्या धर्मांचे लोक इथे जमले आहेत. हे सगळेजण खडीसाखरेच्या खड्यांप्रमाणे आहेत- सगळे गोड आहेत आणि कुठल्याही दोन खडीसाखरेत फरक नाही.

सर्व धर्माच्या लोकांचे एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे या ऐहिक अस्तित्वातून बाहेर पडून त्या परमात्म्यामध्ये विलीन होणे हे आहे. आपल्याला हा संसार पार करायचा आहे (पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे चक्र; सांसारिक बंधने).

एकाच गंतव्यस्थानावर जाण्यासाठी घेऊन गेलेल्या वेगवेगळ्या बोटींसमान वेगवेगळे धर्म आहेत. आपण आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचणारच आहोत तर मग ती कोणती बोट आहे हे महत्त्वाचे आहे का? संस्कृतीमधील क्षुल्लक भिन्नतेचा विचार करुन आपला वेळ वाया घालवू नका.

शिस्त महत्त्वाची आहे. आत्मावलोकन सुद्धा महत्वाचे आहे. निरुपयोगी विचार सोडून द्या. तुम्ही सर्वजण सिद्ध आणि बुद्ध व्हा. बायबल, कुराण आणि बुद्ध यांनी हा उपदेश केला आहे. आपल्या वेद आणि उपनिषदांनीही हाच उपदेश केला आहे. या सर्व मौल्यवान शिकवणी आपण अंमलात आणायला हव्या. हे आपले कर्तव्य आहे.

जय गुरु दत्ता

भक्तीमाला जानेवारी २००१

Tags: