शारीरिक, मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या सामाजिक सेवा करावयास हवी. आपण किराणा सामानदेखील पुरवू शकतो किंवा त्यासाठी लागणारे पैसे देऊ शकतो. आपल्या कुटुंबातील लग्न, नामकरण सोहळा, वास्तू शांती , वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इत्यादी कोणत्याही विशेष प्रसंगी वृद्ध आणि गरजू लोकांसाठी काही पैसे खर्च करण्यास शिका. त्या दिवशी अनाथाश्रम, किंवा वृद्धाश्रम किंवा मंदिरात किंवा तुम्ही निवडलेल्या ठिकाणी अन्नदान करा. अशा कृत्यांद्वारे समाजातील इतरांना आपल्या आनंदात सहभागी करा. तुम्हाला हे समजले पाहिजे की स्वामीजी तुम्हाला त्यागाचे महत्त्वपूर्ण विशेष गुण शिकवत आहेत. नेहमी आनंदाने दान करावे. प्राचीन काळी, जेव्हा लोक मंदिर बांधण्यासाठी खूप मोठी देणगी देत असत तेव्हा ते आपले नाव जमिनीवर किंवा पायऱ्यावर कोरले जावे अशी सूचना देत असत जेणेकरून जे भक्त त्या मंदिरास भेट देतील तेव्हा ते नाव त्यांच्या पायदळी ते तुडविले जाईल. त्यांचा अहंकार कमी होत पूर्णपणे नष्ट व्हावा अशी त्यामागची कल्पना होती. याच्या अगदी उलट, कोणत्याही लहान देणगीसाठी त्याचे नाव पंख्यांवर ट्यूबलाइट्स, छतावर, भिंतींवर लिहिले जावे असे आधुनिक माणसास वाटते जेणेकरून त्याची जाहिरात होईल. हे किती लज्जास्पद आहे. आमचे वडीलधारे म्हणायचे की उजव्या हाताने काय दिले ते डाव्या हाताला कळू नये! हे इतके गुप्त असावे. खरं तर एकदा देणगी दिल्यानंतर त्याबद्दल विचार करू नये. जरी विचार चुकून आला तरीही आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे.
सार्वजनिकपणे देणगी देणारे नक्कीच काही लोक आहेत. इतर लोक त्यांचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित व्हावेत अशा हेतूने ते तसे करतात. हे चांगले आहे. जर अशा लोकांना आपले नाव कोरण्याची इच्छा असेल तर ते जमिनीवर असावे छतावर नको. भक्तिमाला १९९३