SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23 Dec 2020
भगवद्गीता पठणाचे फायदे

गीतेतील ७०० श्लोक मुखोदगत केल्यामुळे स्मरणशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होते. भगवद्गीता पूर्ण पाठ करणारी मुले त्यांनी निवडलेल्या कोणत्याही अभ्यास शाखेत श्रेष्ठत्व प्राप्त करतील. भगवद्गीतेचे नियमित पठण केल्याने मुलांमध्ये शिस्त बिंबविली जाते. ती त्यांना मानवी मूल्ये शिकविते आणि मर्यादशील मानव म्हणून कसे जगावे हे सुद्धा शिकवते.

जे संपूर्ण भगवद्गीता मुखोदगत करतात ते भविष्यात कोठेही आणि कोणत्याही पदांवर असले तरी त्यांच्यासाठी भगवद् गीता कायमस्वरूपी मित्र आणि गुरू म्हणून राहील. भगवद् गीता स्मरण करणे म्हणजे आपल्या खात्यात कायमस्वरूपी मोठा खजिना साठवण्यासारखे आहे.

भगवद्गीतेचा एक अध्याय, एक श्लोक किंवा एका शब्दाचा जरी जप केला तरी त्यात अपार गुणवत्ता आहेत. भगवद् गीता ऐकणे देखील अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळवून देते. भगवद्गीतेचे पठण करणे किंवा ऐकणे ह्यात मुक्ती देण्याची शक्ती देखील आहे.

अध्यायांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण त्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण आहे. महत्त्वाचे म्हणजे, अर्थ समजून घेतल्यास मुक्तीचा मार्ग मोकळा होतो आणि त्यामुळे मानवी जन्म सफल होतो.

भगवद्गीतेत साध्या सोप्या शब्दात अंतिम परम तत्व शिकवले आहे. यात उपनिषदांचे संपूर्ण सार आहे.

प्रत्येक विषयाशी संबंधित ज्ञान त्यात आहे, मग ते योगअसो, सुख (भोग) असो, राजसत्ता असो, ऐहिक ज्ञान, समर्पण/निष्ठा , वैराग्य , गुरु व शिष्य यांच्यातील आदर्श नाते संबंध इत्यादी आणि आंतरिक तसेच बाह्य जगाचेही ज्ञान सूक्ष्मपणे त्यात सांगितले आहे.

गीतेतील ज्ञान हे चारही युगांमध्ये उपयुक्त आहे.

बर्‍याच भारतीयांनी तसेच परदेशी लोकांनीही गीतेच्या माहात्म्यावर भाष्य लिहिले आहे. यामध्ये जगभरातील शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे. त्यांनी असे सांगितले की भगवद् गीतेच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून आले.

सामूहिक पठण (सामुहिक पारायण ) ही एक अत्यंत शक्तिशाली अवर्णनीय ऊर्जा असलेली तपश्चर्या आहे. ही एक तपस्या आहे.

ही तपस्या सर्वांपर्यंत पोचली पाहिजे ही श्रीकृष्णाची इच्छा आहे. गीता प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे हा त्यांचा हेतू आहे.

( कुरुक्षेत्र २०१६,२०१७,, नाद मंडप डिसेंबर२०१६,, जुलै २०१७,, डॅलस २०१७)

Tags: