SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25 Dec 2020
सण साजरे करण्यासाठी सर्वसाधारण नियम

सण म्हटले की कुटुंबातील सर्व सदस्य किंवा विस्तारित कुटुंबातील सदस्य सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र जमतात. दिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात घालवला जातो. घर स्वच्छ करून सजवले जाते. आपला देवावर विश्वास असो वा नसो, पूजा केली जातेच. मग जर पूजा श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर किती चांगले वाटेल, नाही का? प्रत्येक सणात पूजा सुरू करण्यापूर्वी भगवद्गीता, रामायण किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे किमान दोन श्लोक वाचा.

वडील, शिक्षक तसेच आध्यात्मिक गुरू यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्या. जेव्हा तुम्ही आशीर्वाद मागता तेव्हा तुमचा सर्वाधिक तिरस्कार करणारी व्यक्तीदेखील तुमच्यासाठी चांगले आणि शुभ शब्द उच्चारते.

तुमचे आई, वडील, आध्यात्मिक गुरू आणि तुमच्या राष्ट्राबद्दलची भक्ती वाढवा. सगळ्या कुटुंबाने एकत्रित जमिनीवर बसून जेवा. केळीच्या पानावर जेवा. जेव्हा आपण जमिनीवर बसून खातो तेव्हा अन्न अधिक चांगले पचते. चमच्याने नाही तर आपल्या हाताने अन्न खा. अन्न हाताने नीट कालवा.

अन्न कालवण्यासाठी तळहाताचा वापर करा. यामुळे मूत्रपिंड आणि पचनाच्या अवयवांशी संबंधित सूक्ष्म मज्जातंतूंची टोके (नाडी) सक्रिय होतात, पाचकरस अधिक चांगल्या रीतीने तयार होतात आणि त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. खाल्लेल्या घासाचा आनंद घेतल्यानंतर बोटे चाटणेही आरोग्यदायी आहे.

अशा दिवशी खाण्याचे विविध प्रकार तयार करण्यामागेदेखील एक उत्तम विज्ञान आहे. अन्नाचे वेगवेगळे मिश्रण शरीरातील वेगवेगळ्या मज्जातंतूंना सक्रिय करून ऊर्जा देतात आणि सर्व प्रकारचे पोषण करतात.

सर्व पदार्थ वाढून होईपर्यंत थांबा. एकेक पदार्थ वाढल्यानंतर लगेच तो खाऊन संपवणे ही चुकीची पद्धत आहे. वाढलेल्या सगळ्या ताटाचे निरीक्षण करा आणि मग खाताना प्रत्येक घासाचा आनंद घ्या. आपले आरोग्य चांगले आणि पूर्ववत व्हावे असा उद्देश या सर्व प्रथांमागे होता.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन सण आपण आपल्या देशासाठी साजरे करतो. राष्ट्रगीत गायला शिका. आपल्या मनात मातृभूमीबद्दल प्रेम विकसित करा. प्रत्येक सणाच्या दिवशी आपल्या लष्कराच्या संरक्षक जवानांची आठवण करा, जे या सणासुदीच्या दिवशीदेखील स्वत:चे कुटुंब सोडून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. ते आपले रक्षणकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच आपण आपले दिवस शांततेत घालवू शकतो आहोत. एकीकडे आपण मात्र आपापसात लढत आहोत, फसवणूक करत आहोत, दोषारोप करत आहोत आणि अशा प्रकारे आपल्या देशाविरुद्ध आणि आपल्या कुटुंबाविरुद्ध पापकृत्ये करत आहोत. आपण निराशाजनक जीवन जगत आहोत. पण तरीदेखील, आपले सैनिक मात्र कोणतीही तक्रार न करता देशवासीयांच्या जीवनाचे रक्षण करत आहेत. त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा.

(स्रोत: दिवाळी २०१७, म्हैसूर)

Tags: