SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23/12/2020
गणपतीची विविध रूपे

गणपती चारही युगांमध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक युगामध्ये, त्याच्या ऊर्जेचे विविध पैलू प्रकट होतात. एका युगात त्याचे फक्त दोन हात होते. दुसर्‍या युगात तो एक अतिशय सुंदर मुलगा होता. आणखी एका युगात त्यास चार हात होते आणि एका युगात त्याला हत्तीचे डोके आणि चार हात आहेत. ललिता सहस्रनामातही गणपतीचा उल्लेख आढळतो. देवीमातेस ‘लंबोदरी’ या नावाने संबोधले जाते. या अर्थी गणपती स्त्री देवतांच्या रूपातदेखील असल्याचे दर्शवते. त्याची देवी म्हणून उपासना केली जाते. पार्वती देवीने गणपतीची निर्मिती केली आणि तिची ऊर्जा तिने तिच्या या निर्मितीमध्ये हस्तांतरित केली. बौद्ध लोकसुद्धा गणपतीवर विश्वास ठेवतात. एक चीनी देव गणपतीसारखाच आहे. तिबेटी लोकांमध्येही गणपतीसारखीच एक देवता आहे. जावा, सुमात्रा, थायलंड, सिंगापूर, नायजेरिया इत्यादी ठिकाणी गणपती लोकप्रिय आहे आणि जगभरात त्याची पूजा केली जाते. थायलंडमध्ये बौद्ध मंदिरांमध्ये आपल्याला गणपती दिसतो. गणपती फक्त एका धर्माचे प्रतीक आहे असे नाही. तर तो सामर्थ्य, ध्वनी, प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे. तो नादाचे प्रतीक आहे (आदीकाळापासून अस्तित्वात असलेला नाद). तो रक्षणकर्ता आहे. विष्णूंच्या अनेक अवतारांमध्ये गणपतीची महत्त्वपूर्ण भूमिका असे. शिवपुराणात शंकराच्या अवतारांत गणपतीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुद्गल पुराण आणि गणेश पुराणातदेखील गणपतीबद्दलच्या महत्त्वाच्या कथा आहेत. गणपतीमध्ये ‘अ’, ‘ऊ’, ‘म’ ही तीन बीजाक्षरे (बीज-अक्षरे) आहेत आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद दिला आहे. ही तीन अक्षरे ओंकार ह्या नावानेदेखील ओळखली जातात आणि ही तीन अक्षरे कंपनसंख्येच्या तीन स्तर सूचित करतात. ईडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाकातील तीन नाड्या तो नियंत्रित करतो. पद्मासनात बसण्यासाठी, पाठीच्या कण्याच्या पाचवा आणि सहावा मणका खूप महत्त्वाचा असतो. जर आपण शरीराचा दुरुपयोग केला तर, मणके खराब होतात आणि अतिशय वेदना होतात. अमर्याद इच्छा, प्रमाणाबाहेर खाणे, जास्त लैंगिक संबंध, अतिलोभ, क्रोध, निराशा ही शरीराचा दुरुपयोग करण्याची उदाहरणे आहेत. गणपती हे आपल्या पाठीच्या कण्याचे दैवत आहे, जर तुमची पाठ दुखत असेल तर तुम्ही ‘गं गणपतये नम:’ चा जप करावा. यातून साधला जाणारा परिणाम तुम्ही कोणत्याही वैज्ञानिक माध्यमातून तपासू शकता. तुमच्या पाठदुखीत सुधारणा होईल.

  • ५ सप्टेंबर १९९७ - लंडन
Tags: