होय, मी यास सहमती देतो. प्रत्येक वेळी स्वामीजींना स्वत: बसून वर्ग आयोजित करणे शक्य नसते. अशा वेळी मी जे काही सगळे शिकवले आहे त्याचे आणि या विषयावरील माझ्या विविध भाषणांचे संकलन क्रिया योग शिक्षक करू शकतात. मागील युगांमध्ये गुरुजी स्वत: बसून त्यांच्या सर्व रचना लिहीत नसत. त्यांचे विद्यार्थी त्यांच्या रचनांचे संकलन करत असत. त्याचप्रमाणे मीदेखील त्यासाठी परवानगी देत आहे.
हे ज्ञान काळाच्या ओघात लुप्त होऊ नये यासाठी, तसेच भविष्यातील वापरासाठी संकलित केले पाहिजे. सध्याच्या काळात ह्याची खूप निश्र्चितच मदत होईल. दत्त क्रिया योग नावाचे एक फेसबुक पेज आहे. कृपया ते लाईक करा आणि तेथे पोस्ट केलेले संदेश वाचा.
(प्रश्नोत्तर आणि दत्त क्रिया योग वर्ग, ४मार्च २०१६)