SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21 Dec 2020
क्रिया योग करणारा विद्यार्थी आजारी पडल्यास प्राणायाम करणे थांबवू शकतो का?

रोगांमुळे क्रिया योग थांबवण्याचा प्रश्नही प्रथमत: मनात येणे चुकीचे आहे. कारण प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्‌वास घेण्याची क्रिया. याशिवाय इतर काही नसते. आजारी आहे म्हणून कोणी श्वास घेणे थांबवू शकतो का? अशी शंकादेखील कोणाच्या मनात कशी येऊ शकते? रोग आणि प्राणायाम काहीही संबंध नाही. प्राणायाम चालू ठेवता येतो. जेव्हा आपल्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतात, जेव्हा आपल्यामध्ये शिस्तीची कमतरता असते, जेव्हा आपण आपल्याला लहर येईल त्याप्रमाणे खातो तेव्हा आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तेव्हा मनुष्य क्रिया योग करतो आहे अथवा नाही हे बघितले जात नाही. तथापि क्रिया योग साधना आणि आजारांचा काहीही संबंध नाही. त्यातूनही प्राणायाम सुरू ठेवावा की ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्या आध्यात्मिक आचरणाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. ते स्वत:च स्वत:शी प्रतिबद्ध आहेत. तथापि क्रिया योग थांबविण्याचा सल्ला मी कधीच देणार नाही. क्रियायोग हे एक साधन आहे जे आपल्याला एकाग्रता प्राप्त करण्यासाठी समर्थ बनवते जेणे करून त्या सर्वशक्तिमान भगवंताचा दृष्टांत मिळवण्याच्या पातळीवर आपण आपल्याला नेऊ शकतो. प्राणायामामुळे आजार कधीही निर्माण होत नाहीत. तथापि सर्व आजार नष्ट करण्याचे हे एक साधन आहे. क्रिया योगामुळे काही छुपे रोग प्रत्यक्षात जाणवण्याची शक्यता असते.

(प्रश्नोत्तर , दत्त क्रिया योग वर्ग, ४ मार्च २०१६)

Tags: