SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 25-12-2020
स्वामीजी करतात त्याप्रमाणे ध्यान व संगीतोपचार मैफिल (concerts) इतर कोणी संगीतकार सादर करू शकेल का?

हे जरा अवघड आहे. हे साध्य करण्यासाठी मुळात ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. चांगले आरोग्य ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी येथे अपेक्षित आहे. त्या व्यक्तीची योगसाधनेवर चांगली पकड असायला हवी आणि एकाच बिंदूवर एकाग्रता टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असायला हवे. या सर्व गोष्टींबरोबरच, त्या व्यक्तीकडे संगीताचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संगीतातील रागाचे स्वरूप माहिती असणे आवश्यक असते. ज्याच्या अंगी हे सर्व गुण आहेत तो निश्र्चितच संगीताच्या माध्यमातून उपचार करू शकतो.

माझ्या बाबतीत म्हणाल तर मी रोग बरे करतो असा दावा मी कधी करत नाही. हे आजार भगवान दत्तात्रेयच बरे करतात. मी फक्त एक साधन आहे. त्या दिव्य परम चैतन्यासमोर मी कोण आहे? त्या दिव्यत्वासमोर मी केवळ एक मूठभर माती समान आहे. या प्रकृतीमध्ये, निसर्गामध्ये मनुष्याला बरे करण्याची अतुलनीय शक्ती आहे.

(भक्तिमाला १९९१)

Tags: