SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 21-12-2020
तरुण विधवांना हळद, कुंकू, बांगड्या आणि फुले घालण्याची परवानगी आहे का?

ही त्यांची इच्छा आहे. पारंपरिकरित्या, विधवांना नटण्याची किंवा सुंदर दिसण्याची परवानगी नव्हती. इतर कोणत्याही परपुरुषाने त्यांच्याकडे वासनेने पाहू नये हा त्यातील हेतू होता. जर मुलींनी योग्य प्रकारे कपडे घातले तर त्या पुरुषांचे अनावश्यक लक्ष आकर्षित करणार नाहीत. परंतु त्या आपले केस कापतात, लहान लहान कपडे घालतात, उंच टाचेच्या चपला घालतात. त्यामुळे इतरांचे लक्ष वेधून घेतले जाते. त्यातून मग लोक प्रेमपत्रे लिहितात, त्यांचे विवाह विस्कळीत करतात आणि त्यांचे आयुष्यदेखील खराब करतात. म्हणूनच, जर देवाने तुम्हाला जे नैसर्गिक सौंदर्य भेट दिले आहे, ते जतन करून राहिले तर कमी त्रास होईल. तुम्ही मुख्यत्वे लग्नानंतरच कुंकू अधिक ठळकपणे लावण्यास प्रारंभ करता. तुम्ही तुमच्या पतीच्या नावे जे मंगळसूत्र घालता ते तुम्ही विवाहित असल्याचे प्रतीक आहे व पतीच्या असल्याचे प्रतीक आहे. जर तुम्ही आपल्या पतीच्या मृत्यूनंतरदेखील ते परिधान करत राहिलात, तर विवाहित स्त्रियांना हळद कुंकू देणाऱ्यांना कसे कळेल की ते तुम्हाला द्यायचे आहे का नाही. ते तुम्हाला देणे चुकीचे ठरेल. त्यासाठी ही प्रथा सुरू झाली. जेव्हा आपण आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीस गमावल्यामुळे शोकाकुल असता, जेव्हा आपल्या पतीशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे असे तुम्ही मानता आणि तुमच्या पतीच्या नसण्यामुळे तुम्हाला आयुष्यात एक पोकळी जाणवते, तर मग नानाविध प्रकारच्या सुंदर बांगड्या, दागिने, फुले घालण्याला आणि सुंदर सुंदर साड्या नेसण्याला काय अर्थ आहे? ज्या व्यक्तीवर तुम्ही इतके मनापासून प्रेम केलेत, त्याच्यासाठी जर तुम्ही एवढेही करू शकत नसाल तर काय उपयोग? म्हणून ही प्रथा. इतरांमध्ये अशी प्रथा नाही. ते अशा प्रथा पाळत नाहीत म्हणून आपण त्यांचा अनादर करणेदेखील उचित नाही. ही प्रथा अधिक प्रतीकात्मक आहे. पतीच्या निधनानंतर विवाहित स्त्रिया विवाहामुळे मिळणाऱ्या या प्रतीकांचा त्याग करतात. पूर्वीच्या काळी तर त्या अजिबात सुंदर दिसू नयेत म्हणून मुंडन करण्याची, केशवपन करण्याची पद्धत होती. तथापि, एखादी स्त्री हे सर्व परिधान करणे चालूच ठेवू इच्छित असल्यास, त्यात गैर किंवा आक्षेपार्ह असे काहीही नाही.

(प्रश्नोत्तर सत्र २८ नोव्हेंबर २०१६)

Tags: