मी त्या परमानंदाचे वर्णन कसे करू शकेन? मी माझ्या अंतरंगातील आनंद शब्दात कसा मांडू शकेन? तो माझा आनंद आहे. मी हे शब्दात सांगू शकत नाही. ती माझ्या आत सुप्त असलेली तपश्र्चर्या आहे.
हिमालय नावाचे एक पुस्तक आहे - अतिशय प्रसिद्ध असे पुस्तक आहे. यामध्ये लेखकाने हिमालयाबद्दल खूप विस्तृतपणे वर्णन केले आहे. त्या पुस्तकात हिमालयाचे बरेच फोटोदेखील आहेत. त्याच्या मनात असलेला आनंद तो आपल्या कथनातून व्यक्त करतो आहे. पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदात लेखक म्हणतो की ‘‘मी हिमालयात गेलो नाही. कारण मी भेट दिली तर माझे मन त्यावरून उडून जाईल. मी खरंच हिमालयात गेलो तर हा आनंद आणि ही भक्ती कमी होईल.’
त्या प्रमाणेच, मला माता जयलक्ष्मीकडून दीक्षा मिळाल्यानंतर मला जो आनंद झाला - तो मी स्पष्ट करून सांगू शकत नाही. मी सांगितले तर माझा तो आनंद हरवून जाईल. मी समजावून कसे सांगू? मी २० शब्दात, किंवा ४० शब्दात, किंवा १००० शब्दांत किंवा लाखो शब्दांतसुद्धा स्पष्ट करून सांगू शकत नाही. तो परमानंद स्पष्ट करण्यासाठी लाखो शब्ददेखील अपुरे आहेत. त्या आनंदाचा परिणाम स्वामीजींच्या कृतींमधून आणि कामकाजातून दिसून येतो. स्वामीजींचा हा आनंद तुम्हालादेखील आनंद आणि फळ देतो.
(प्रश्न आणि उत्तर त्रिनिदाद २२ जुलै २०१८)