SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 21-12-2020
देव निराकार आणि सर्वव्यापी आहे असे म्हणतात. तसे असल्यास, आपण त्याला क्ष-किरणांत कैद का करू शकत नाही? दुसरे म्हणजे, हनुमंत कोणत्या जातीचे आहेत?

हनुमान म्हणजे साक्षात वारा (वायू) आहे. तो सर्वत्र अस्तित्वात आहे. मी श्वास घेतो, तुम्ही श्वास घेता, प्रत्येक जिवंत प्राणी श्वास घेतो. ब्राह्मण, क्षत्रिय किंवा कोणत्याही जातीचा श्वास वेगळा केला जाऊ शकतो का? माझा देव त्या परमावस्थेमध्ये आहे! पवन म्हणजेच वायू, तो सर्वकाही व्यापून टाकणारा आहे. तो एक्स-रेमध्येदेखील पकडला जातो. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून आपण असे म्हणू शकतो की देव क्ष किरणांमध्ये कैद झाला आहे. क्ष किरणांच्या प्रतिमांमधील रिक्त जागा कोणाशी संबंधित आहे? हा कोणाचा गुणधर्म आहे? तुम्ही खुलासेवार हे स्पष्ट करू शकता का? याच कारणास्तव, त्यागराज स्वामींनी अखेरीस असे जाहीर केले की देव प्रकाशमय आहे! बल्बमधील प्रकाश हा दृश्यमान आहे, परंतु ईश्र्वर एक अदृश्य प्रकाश आहे. वारा हादेखील अदृश्य प्रकाश आहे. आपण वारा डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्याला मूळचा असा रंग नसतो, कुठलाही वास नसतो. देव अस्तित्वात असल्याच्या या सिद्धांताचा अनुभव घेण्यासाठीच आपण सर्व अनेक प्रकारचे आध्यात्मिक प्रयत्न करत असतो. काहीजण भजन गाण्यात गुंग होतात, तर कोणी तपश्र्चर्येत, काहीजण मंत्र जप, नामस्मरण करत असतात, तर काही लोक गरजूंना अन्न देतात किंवा तत्सम इतर सामाजिक कार्यात भाग घेतात, तर काही लोक नित्योपासना करतात – अशा प्रकारे असंख्य मार्गांनी लोक या निराकार परमेश्वराचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वजण नैसर्गिकरीत्या श्र्वासोच्छ्‌वास करतो. श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो. परंतु यावर नियंत्रण ठेवणाऱ्या परमेश्वराचा अनुभव घेणे मात्र फार कठीण आहे. आपण देवाचे मूळ रूप पाहू शकत नाही. परंतु त्याच्यामुळे आपण जगतो. देवाशिवाय कोणताही जीव अस्तित्वात राहू शकत नाही. आपण जिवंत आहोत ही त्याची कृपा आहे. आपण मृत्यू पावतो हीदेखील त्याचीच कृपा आहे. आपल्याला आयुष्यामध्ये येणारे सर्व अनुभव ही त्याच्या एकट्याचीच कृपा आहे! पण देवाचे मूळ रूप कसे दिसते? तो तर निराकार आहे. ईश्र्वर पंचमहाभूतांचे तत्त्वसार आहे. मूलतः ही पाचही तत्त्व निराकार आहेत. आज डोळ्यांना दिसणारी ही पृथ्वी एक दिवस पूर्णपणे नाहीशी होईल. अशी वेळ येईल जेव्हा प्रलयामुळे, संपूर्ण विनाशामुळे पाणी, पृथ्वी इत्यादी दृश्यमान गोष्टी अदृश्य होतील. मग देव कुठे आहे? तो अग्नितत्त्वामध्ये अस्तित्वात आहे; तो वायुतत्त्वात, तो जल-तत्त्वात आणि अशाच प्रकारे इतर तत्त्वांमध्ये अस्तित्वात आहे. पण तरीही तो अदृश्य आहे. आपण पाणी, अग्नी इत्यादी पाहू शकतो, अनुभवू शकतो. परंतु जो अदृश्य आहे, त्याला आपण पाहू शकत नाही. परमेश्र्वर हे संपूर्ण विश्व व्यापतो. तो सर्वव्यापी आहे. म्हणूनच तो क्ष किरणांमध्ये अस्तित्वात आहे. किंबहुना तो क्ष किरण आहे. एक्स-रे स्वतःच देवसमान आहे. आपण देव प्रत्यक्षात पाहू शकत नाही मात्र पाच घटकांच्या माध्यमातून आपण त्याला समजू शकतो. त्याचे स्वरूप, त्याचे तत्त्व स्पष्ट करण्यास कठीण आहे. तो त्याला जे हवे ते रूप घेऊ शकतो. तो दृश्यमान आहे आणि त्याच वेळी अदृश्यदेखील आहे.

(प्रश्नोत्तर सत्र २७ डिसेंबर २०१५)

Tags: