SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 21 Dec 2020
तान्ह्या हनुमानास इंद्रास्त्र लागून जखमी झाल्यानंतर माता अंजनेने त्यास औदुंबराच्या पानांनी वारा घातला होता का?

होय. तो जखमी झाल्यावर अंजनीमातेने त्यास वारा घालण्यासाठी औदुंबराची पाने वापरली होती. लंकेत सीतेनेदेखील त्याच्या शेपटाला आग लावली गेली असताना त्यास औदुंबराची पाने दिली होती. लंकेत हनुमान दोन वेळांना आगीच्या लपेट्यामध्ये सापडला होता – एकदा सूर्याची असह्य तीव्र उष्णता आणि दुसऱ्या वेळेस रावणाच्या आज्ञेवरून त्याच्या शेपटीला लावलेली आग. या दोन्ही वेळांना त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी सीतामातेने त्यास एक मंत्र दिला होता ज्याने त्याच्या अंगाची आग थंड होण्यास मदत केली.

नृसिंह अवतारात लक्ष्मीदेवीने असह्य उष्णतेमुळे होरपळणाऱ्या नृसिंह स्वामींना औदुंबराची पाने दिली. याच कारणास्तव भगवान महा-विष्णू, भगवान हनुमान आणि भगवान दत्तात्रेय सदैव औदुंबराच्या झाडाजवळ वास करतात. हा एक दिव्य आणि स्वर्गीय वृक्ष आहे. तो लवकर वाढतो. तो एक अतिशय प्रभावी असा वृक्ष आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण औदुंबराजवळ जातो, तेव्हा त्याला स्पर्श करून त्याला प्रदक्षिणा घालावी.

दत्तात्रेय म्हणजे महा-विष्णू. महा-विष्णू म्हणजे श्रीराम. म्हणूनच श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेले हनुमंत दत्तभक्तदेखील आहेत. याचे कारण दत्तात्रेय आणि राम हे एकच आहेत. सर्व एकच आहेत.

सर्व देव एकच आहेत. ते केवळ विविध रूपे आणि अवतार धारण करून त्यांच्या लीला दाखवतात. उदाहरणार्थ, दोन्ही हात आपलेच असतात. परंतु उजव्या हाताला नेमून दिलली कामे ही डाव्या हाताला नेमून दिलेल्या कामांपेक्षा वेगळी असतात. तसेच हाताच्या प्रत्येक बोटाची कामे भिन्न भिन्न असतात. असे असले तरीही ती बोटे आणि ते हात एकाच शरीराचा भाग असतात. आपल्या शरीरामध्ये अनेक ज्ञानेंद्रिये असतात, परंतु ती सर्व एकाच शरीराशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे हनुमंत आणि राम सर्व एकसमानच आहेत. (प्रश्न आणि उत्तर त्रिनिदाद २२ जुलै २०१८)

Tags: