हनुमानाने या भूमीला प्रत्यक्ष स्पर्श केला नाही. पण जेव्हा तो सीतेच्या शोधार्थ जात होता, तेव्हा त्याच्या कपाळावरून घामाचा थेंब इथल्या समुद्रात पडला. त्रेता युगापूर्वी तिथे कोणतीही जमीन नव्हती. मात्र त्या घटनेनंतर ही बेटे तयार झाली. त्या घामातून सारारीपो (अरिपो) या नदीचा उगम झाला. अशी कथा आहे. हनुमानाचा घाम अनेक देशांत पडला. परंतु मुख्यत: त्रिनिदादमध्ये पडला. म्हणूनच ती शक्तिशाली हनुमंताची भूमी आहे. हे सर्व रामायण काळात घडले. या कारणास्तव स्वामीजींनी या देशात हनुमानाचा अभिषेक केला. हनुमानाचे भक्त आणि रामभक्त या देशामध्ये भरपूर आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी अनेक भारतीय या जमिनीवर आले. हळूहळू या भूमीमध्ये राम आणि हनुमंताबद्दलची भक्ती वाढीस लागली. अरिपो नदी अतिशय प्रभावशाली आणि रोगनिवारक अशी नदी आहे. म्हणूनच स्वामीजी या भूमीवर वारंवार येत असतात. म्हणून रामाच्या आणि हनुमानाच्या भक्तांना माझा संदेश आहे – तुम्ही माझे आणि हनुमानाचे कार्य पुढे चालू ठेवा. त्याच्या नामाचा प्रसार करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. रामायणातील सुंदर कांड हे संपूर्णतया हनुमानाच्या महिमेवर आधारलेले आहे. युद्धाच्या वेळी जेव्हा लक्ष्मण मूर्छित होऊन खाली पडला होता, तेव्हा हनुमानाने संजीवनी वनस्पती असलेला पर्वत लंकेला उचलून नेला. जेव्हा तो डोंगर घेऊन उड्डाण करत होता, तेव्हा डोंगरावरचे अनेक खडक वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ज्या ज्या ठिकाणी ते खडक पडले, त्या त्या सर्व ठिकाणी हनुमानाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मालदीव, मॉरिशस येथेही हे खडक कोसळले. ती सर्व हनुमानाची क्षेत्रे आहेत.
प्रश्नोत्तर सत्र १९ जुलै २०१८ त्रिनिदाद