काही हरकत नाही. जर तुम्ही अलिप्त होऊ शकत नसाल, तरी त्याने फार काही फरक पडत नाही. परंतु जर तुम्हाला आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नती करायची असेल तर आपुलकीच्या या भावनांमध्ये न अडकणाऱ्या समविचारी लोकांची निवड करा. इथे असंख्य असे लोक बसले आहेत जे भाव-भावनांपासून दूर आहेत. अशा लोकांशी मैत्री करा की जे जीवनात सामीलझाले नाहीत, मोहित झाले नाहीत जे वासनांनी भारले नाहीत, भाव-भावनांच्या दलदलीत अडकले नाहीत.
भारतातील एक महान संत, श्री रामकृष्ण परमहंस यांचे लग्न झाले होते. परंतु त्यांनी अलिप्त जीवन व्यतीत केले. त्यायोगे त्यांच्या पत्नी शारदा देवी ह्यांनीदेखील असेच जीवन व्यतीत केले. ते दोघेही आध्यात्मिक आणि ब्रह्मचारी जीवन जगले. तुम्ही अद्याप तरुण आहात आणि तुम्ही शिकू शकाल. इथे बसलेल्या सर्व लोकांकडे पाहा. इथे बरेच लोक माझी प्रवचने ऐकत आहेत आणि भजने गात आहेत. कशासाठी? तर ही एक आध्यात्मिक साधना आहे, हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास आहे आणि त्यासाठी त्यांनी करमणुकीच्या इतर काही गोष्टी सोडून दिल्या आहेत. हाच योग्य मार्ग आहे.
ज्याअर्थी आपण भगवान दत्तात्रेयांकडे आला आहात, यावरूनच अशी पुष्टी होते की तुम्ही हळूहळू जगापासून अलिप्त होत तुम्हाला विरक्ती येणार.