SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21 Dec 2020
प्रलयाच्या वेळी सर्व काही जर भगवंतामध्ये विलीन होते तर मग त्यानंतर प्राणिमात्र पुन्हा का जन्माला येतात?

तुम्ही भरपूर अन्न खाता. तुम्ही जे काही खाता ते अन्न पोटात जाते. मग ते अन्न पचते आणि आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा देते. आता, अन्नातील ऊर्जा शरीर जितके दिवस वापरते तितके दिवस तो माणूस जगतो. काहीजण २ दिवस, काहीजण ३ दिवस जगू शकतात, काही तर एक महिन्यापर्यंत जगू शकतात. त्याबरोबर थोडे पाणी पित राहिल्याने ते अधिक आयुष्य जगू शकतात. काही लोक असेही आहेत जे फक्त श्वासावर जगू शकतात! काही वेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाबाबत डॉक्टर कधी कधी विचारतात, यांचे मन मेलेले आहे, आणि फक्त श्वास चालू आहे, तर मशीनचा आधार काढून घेऊ का? जिवंत राहण्यासाठी बंधनात अडकलेला जीव अशा विविध अवस्थांमधून जातो. जिवंत राहण्यासाठी, श्वास चालू राहण्यासाठी संघर्ष करतो. त्याची मरायची इच्छा नसते. शेवटच्या क्षणापर्यंत त्याला जगायचे असते. त्याचप्रमाणे त्या जीवाचे कर्म संपत नाही तोपर्यंत त्यांना परत परत जन्म घेत येत राहावे लागते. त्यातून कोणाचीही सुटका नाही. विनाशानंतरही केवळ त्यांचे शरीर नष्ट होते, परंतु त्यांचे संचित कर्म अजूनही कायम असते. त्यांना त्यांची कर्मे संपवावी लागतात. त्यांना त्यांच्या मागील चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांची फळे भोगायची असतात. त्यानुसार ते परत जन्म घेतात. ज्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत ते व्हेंटिलेटरच्या आधारावर अवलंबून असतात, त्याप्रमाणेच पुन्हा जन्म घेताना ते कर्मावर अवलंबून असतात. जोपर्यंत कर्मांचा शेवट होत नाही तोपर्यंत ते पुन्हा जन्म घेत राहतात. ते अपरिहार्य आहे. त्या व्हेंटिलेटरच्या आधारामुळे गंभीर आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला वाटते की आपण आता आणखी कर्म जमा करू नये. तो / ती फक्त अस्तित्वात असलेली कर्मे पूर्ण करण्यासाठी जगत राहणे पसंत करतात. जीव जन्मल्यापासून दूध पिणे चालू करतो. तो फक्त दूधच पित असतो. जेव्हा तो मोठा होतो आणि विचार करण्याची क्षमता प्राप्त होते, तेव्हा तो खाणेदेखील सुरू करतो. सातत्याने, कर्म करतच राहतो. कोणामध्येही अलिप्ततेने किंवा केलेल्या कृतींमध्ये न गुंतता कृती करण्याची क्षमता त्यात नसते. कर्म हे एका चक्राप्रमाणे आहे. ती एक गोलाकार प्रक्रिया आहे. एकदा आपण या कर्मांच्या दुष्टचक्रामध्ये अडकलो की यातून आपल्याला मुक्ती नाही! जोपर्यंत या चक्रातून कसे बाहेर पडायचे हे तुम्ही विचारत नाही तोपर्यंत मी ते समजावून सांगत नाही. कोणालाही जन्म देण्याची किंवा वेगळी निर्मिती करण्याची आवश्यकता नसते. ही एक स्वयंचलित संगणकीय प्रणाली असल्याप्रमाणे आहे. जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत हा बंधनात अडकलेला आत्मा (जीव) आपोआपच जन्म घेत राहील. आपण देवाच्या योजनेमध्ये क्षुल्लक कीटकांप्रमाणे आहोत. आपल्या तीव्र कर्म वासना (आपल्या प्रवृत्ती, विकार) आपल्याला वारंवार आणि पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतात. जर अशा प्रवृत्तींचा आपण समूळ नाश करू शकलो, तर जीव जन्म घेणे थांबवतो.

(प्रश्नोत्तर सत्र १९ मार्च २०१७)

Tags: