SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23-12-2020
उर्सुला शबरी होनेगर, जर्मनी

“श्री स्वामीजींनी गाजर मागितले आणि स्वयंपाक सुरू करतांना आमच्या लक्षात आले की आमच्याकडे गाजर नाही. रविवार असल्याने आम्हाला कुठेही काही मिळू शकले नाही, म्हणून आम्ही श्री स्वामीजींकडे गेलो. अत्यंत शांतपणे ते म्हणाले , “काळजी करू नका, ती येतील ’ आणि मग तुम्ही अशी सुंदर गाजरं घेऊन आलात.”

व्यवसायाने मी एक मानसशास्त्रज्ञ आहे, परंतु मी नृत्य देखील शिकले आहे. मी दोन्ही शाखा एकत्र करून ‘नृत्य उपचार (Dance therapy)’ नावाचे तंत्र विकसित केले. हे करत असताना, कधीकधी मला असा अनुभव आला की मी रुग्णाच्या शरीरात जाऊन त्यांचा आजार समजून घेऊ शकते. हे नवीन ‘जग’ मला समजावून सांगण्यात मदत करणारे माझ्याबरोबर कोणी नसल्याने काय करावे हे मला कळत नव्हते. मी भारत आणि तेथील गुरूंविषयी पुस्तके वाचण्याकडे मी आकर्षित झाले. मला वाटले की, कदाचित मला गुरु मिळाले तर माझी ही शंका होईल. मी स्वत: शीच म्हणाले, मला याची गरज आहे: ह्या न दिसणाऱ्या जगात मार्गदर्शन करणाऱ्या गुरुची गरज आहे. .

मी दोन वर्ष प्रार्थना केली आणि या गुरुंच्या येण्याची वाट पाहिली. त्यानंतर १९८३ मध्ये, एके दिवशी पीटर नावाच्या एका मित्राने मला सांगितले की त्यांचे गुरु, श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी स्वित्झर्लंड आणि जर्मनी येथे येत आहेत. मी त्यांना भेटायला जावे की नाही ह्याचा मनातल्या मनात मी विचार करत होते. एके दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले की एक भारतीय संत चर्चमध्ये पियानो वाजवत होता. पीटर शेजारी उभा होता. मलाही संगीताची आवड होती, म्हणून या स्वप्नामुळे माझी खात्री झाली की मी जर्मनीमध्ये श्री स्वामीजींना भेटायला जावे.

ज्या ठिकाणी श्री स्वामीजी राहत होते त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्यांबरोबर बसलो. मी त्यांना किंवा त्यांचा फोटो यापूर्वी पाहिला नव्हता त्यामुळे काय अपेक्षा करावी हे मला समजत नव्हते. काही वेळाने श्री स्वामीजी खोलीत आले, ते थेट ग्रँड पियानोकडे गेले आणि वाजवू लागले. या घटनेने मी आश्चर्यचकित झाले, सगळे अगदी मला पडलेल्या स्वप्नासारखेच होते. मी तिथे बसले आणि एखादा भारतीय गुरू पारंगत असल्यासारखा पियानो कसा वाजवू शकतो याबद्दल मला आश्चर्य वाटले. ही माझी पहिली भेट होती.

यानंतर, पुढच्या रविवारी स्वित्झर्लंडमध्ये श्री स्वामीजीं करणार असलेल्या होमासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आले होते. मला जायचे होते आणि फुले घेऊन जायची प्रथा आहे हे मला माहित होते. मी माझ्या बागेत शोधली पण खरोखरच सुंदर फुले मला सापडली नाहीत. परंतु मी या वर्षी मी लावलेली खूप छान गाजरं होती, ती मी घेऊन गेले. श्री स्वामीजींशी माझी मुलाखत होती आणि मी त्यांना गाजरं अर्पण केली. त्यांनी ती घेतली आणि त्यांच्या सहाय्यकाकडे दिली आणि कशाचातरी उल्लेख केला.

एका आठवड्यानंतर मी दुसर्‍या कार्यक्रमात गेले आणि परत तेच घडलं. मी त्यांना गाजरं दिली आणि पुन्हा त्यांनी त्या सहायकला बोलावून सांगितले, “कृपया काय झाले ते हिला सांग.” सहाय्यक रमेश यांनी सांगितले की, “स्वामीजींनी गाजर मागितले आणि आम्ही स्वयंपाक सुरू करतांना आमच्या लक्षात आले की आमच्याकडे गाजरं नव्हती. आज रविवार असल्याने आम्हाला कुठेही काही मिळू शकले नाही, म्हणून आम्ही श्री स्वामीजींकडे गेलो. अत्यंत शांतपणे ते म्हणाले , “काळजी करू नका, ती येतील’ आणि मग तुम्ही अशा सुंदर गाजरांसह आलात. ” रमेशने बोलणे संपवल्यावर श्री स्वामींनी मोठ्याने हसत माझ्याकडे पाहिले आणि विचारले, “तुला भारतात यायला आवडेल”, अतिशय आनंदाने मी म्हणाले , “हो! मला यायला आवडेल ”.

माझी पहिली भारत यात्रा निश्चित झाली, त्यानुसार मी म्हैसूर आश्रमात गेले आणि सहा महिने राहिले. त्या काळात श्री स्वामीजींसोबत आश्रमाबाहेरच्या त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत प्रवास करण्याचे मला भाग्य लाभले. ख्रिसमस जवळ येत होता आणि मला तो वेळ श्री स्वामीजींबरोबर घालवायचा होता. कधीकधी श्री स्वामीजींसह छोट्या खेड्यांतून प्रवास करणे माझ्यासाठी कठीण जात होते परंतु मी ते कसेतरी जुळवून घेतले. एके दिवशी श्री स्वामीजींनी मला बोलावले आणि म्हणाले, “मला वाटते की तू घरी परत जावेसे, या सहली तुझ्यासाठी खूपच कठीण आहेत”. मी उत्तर दिले, “नाही नाही! स्वामीजी, मला तुमच्याबरोबर ख्रिसमस घालवायचा आहे. ” त्यांनी उत्तर दिले, “ठीक आहे, परंतु तक्रार करू नकोस.” त्यावर मी फक्त “होय स्वामीजी” म्हणाले.

दुसर्‍या दिवशी एक तरुण मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली की श्री स्वामीजींनी मला तिच्या घरी घेऊन जाऊन माझी सोय बघण्यास सांगितले होते. मी हेलावून गेले; ते मातेसमान काळजी घेत होते, ते मी अनुभवत होते. त्यांनी सांगितले होते की मी तक्रार करू नये, तरीही ते मला सर्व सुखसोई देत होते. जिथे जिथे आम्ही गेलो; तिथे तिथे स्थानिक लोक माझी काळजी घेत होते.

ख्रिसमसच्या आदल्या दिवशी हा गट श्रीगुरू दत्तात्रेयांचा यापूर्वीचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिराजवळ, पीठपुरम येथे तळ ठोकून होता. तेथील मंदिरात दत्तात्रेयांची खूप जुनी मुर्ती स्थापित करण्यात आली होती. मला दुग्धाभिषेकम् पहाण्यासाठी मूर्तीसमोर बसण्यास आमंत्रित केले होते. मी या विधीवर ध्यान करत असताना, मला प्रभु येशू ख्रिस्तांचा अनुभव आला. हा अनुभव खूप खरा होता. त्यांच्या अस्तित्वाच्या जाणिवेने माझ्या जीवाने उसळी मारली: ओह, ते खरोखर अस्तित्वात आहेत! मी ख्रिश्चन धर्मात वाढले आणि माझ्या धार्मिक शिक्षणातून ख्रिस्ताविषयीच्या सर्व कथा ऐकल्या, परंतु श्री स्वामीजींनीच मला त्यांच्या खऱ्या उपस्थितीचा अनुभव दिला. या अनुभवाने परम सत्य जाणून घेण्याचे माझ्यातील अनेक प्रवाह उघडले.

मी श्री स्वामीजींना भेटल्यानंतर माझे शरीरातून बाहेर पडण्याचे अनुभव थांबले होते, त्याऐवजी त्यांनी मला नवीन अनुभव दिले आणि आध्यात्मिक जीवनाचे बीज पेरले. एकदा एक पुजारी श्री स्वामीजींच्या भजनांचा अर्थ सांगत होते आणि त्यांनी आम्हाला बसून परम पूज्य स्वामीजींवर ध्यान करायला सांगितले. त्या क्षणी श्री स्वामीजी आमच्या बाजूने चालत होते. ते माझ्यामागे आले आणि त्यांनी माझ्या डोक्याच्या वरच्या बाजूला , सहस्त्रार चक्रावर एक हळूच टपली मारली ताबडतोब मी जवळजवळ दोन तास खोलवर ध्यानात गेले. ही माझी पहिली दीक्षा होती.

रोपलेल्या बीजामधून नुकतेच अंकुर फुटू लागल्यासारखे वाटले. श्री स्वामीजी आपल्या आध्यात्मिक क्षेत्राचे प्रवेशद्वार उघडत होते. मी त्यांच्याबरोबर क्रिया योगाचे वर्ग केले, आजही मी ते करते आणि मी शिकवायलासुद्धा सुरवात केली आहे. पहिल्यांदा आश्रमात जाण्यापूर्वी माझा विचार होता कि दिवसभर फक्त ध्यान करायचे, दुसरे काहीच करायचे नाही. पण श्री स्वामीजींनी स्पष्ट करत ते म्हणाले, “अर्धे, अर्धे ”, अर्धे चिंतन, अर्धे काम. ज्याने मला ‘ओरा एड लेबोरा’ (प्रार्थना आणि काम करा) या लॅटिन वाक्यांशाची आठवण करून दिली.

माझ्या आश्रमामधील मुक्कामात योगाव्यतिरिक्त मी भजन, कन्नड, तेलगू भाषा , पूजा आणि हार्मोनियम कसे वाजवायचे हे शिकले. या सर्व कौशल्यांनी माझ्या आध्यात्मिक ध्येयात आणि ‘मानसिक शांती’ मिळविण्याच्या प्रयत्नात मला आधार दिला आहे. त्यांच्या कृपेने, माझ्या आव्हानात्मक वेळापत्रकांव्यतिरिक्त, झ्यूरिक विद्यापीठात इंडोलॉजिकल अभ्यासाची पदवी पूर्ण करण्याची शक्ती मला मिळाली. त्यांच्या दत्त योग सेंटर स्वित्झर्लंड येथे व्यवसाय सल्लागार म्हणून काम करत आश्रमाच्या सेवेत मी सहभागी झाले. माझ्या दैनंदिन जीवनात त्यांचे प्रेमळ आणि सूज्ञ मार्गदर्शन अनुभवण्यास मिळाल्याने मी स्वतः:ला खूप भाग्यवान समजते.

श्री स्वामीजींनी केलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी माझ्यामध्ये आणि माझ्या सभोवतालच्या भक्तांमध्ये केलेले परिवर्तन. आई, वडील, मित्र आणि शिक्षक या नात्याने त्यांनी मला अनुभव दिले आहेत. दैनंदिन जीवनात एकत्र असलेल्या दु: ख आणि आनंद यांच्यातून विकसित होण्यासाठी भावनिक पातळीवर मदत करून त्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रत्येक गुणांची विशेषता दर्शवून दिली. त्यांनी माझ्यावर मातेसमान अतुलनीय करुणा दर्शविली आणि माझा आत्मविश्वास वाढविण्यात मदत केली. भक्तांच्या सर्व समस्यांना ते अदृश्य, सूक्ष्म मार्गाने हाताळतात. अनेकदा आव्हानात्मक परिस्थिती संपल्यानंतरच त्या अडचणीत ते माझ्यासोबत कसे होते हे माझ्या लक्षात येत असे. हे अचानक उमगत असे . वेळोवेळी गुरु नावाच्या बोटीतुन जीवनाच्या खवळलेल्या समुद्रातुन सुरक्षितपणे पलीकडे नेले जाणे म्हणजे खरोखरच काय आहे हे मला अजून उमगले नाही.

मी जवळजवळ तीस वर्षे मी त्यांच्या छत्राखाली आहे आणि मला अजूनही आश्चर्य वाटते; स्वामीजी, आपण कोण आहात? आपण काय आहात? मी जेव्हा प्रत्येक वेळी म्हैसूर आश्रमाला भेट देते , किंवा त्यांना पाहते तेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहल्यासारखे वाटते. माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत, मी फक्त अनुभवते. ते ज्या गोष्टी करतात त्या कशा करतात ? हे समजणे माझ्या मानसिक क्षमतेच्या पलीकडे आहे. मी फक्त त्यांच्या ऊर्जेचा आनंद घेते आणि त्याचा उबदारपणा अनुभवते. ते सत्य आहेत , खरं तर, ते माझे जीवन आहेत .

मौनपणे, निरपेक्षतेने ते काळजी घेतात. श्री स्वामीजी मला सांगत असत की माझे अनुभव मी लिहावेत जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल. १९९५ मध्ये ‘सायलेंट टीचर ’ हे माझे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात श्री स्वामीजींबरोबर आलेले अत्यंत सूक्ष्म अनुभव आहेत. त्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “स्वामीजी या अनुभवांमधून शिकवतात”.

ते आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. आपले आरोग्य आणि संपत्ती, आपले आचरण आणि कार्य याबाबतीत सूचना देतात. त्याच वेळी ते कोट्यवधी लोकांसाठी गुरु आणि मार्गदर्शक असतात परंतु त्याबरोबरच आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करतात. ते म्हणतात, “कोणीही माझ्याकडे येत नाही, त्यांना आणण्याची माझी जबाबदारी आहे, हा माझा संकल्प आहे”. जेव्हा ते बोलावतात तेव्हा सहसा त्यामागे त्यांचा लपलेला हात असतो जो एखाद्याला अचानक भेटण्यासाठी मार्गदर्शन करतो, एखादा माणूस अचानक दिसतो आणि सांगतो की, ‘अरे, मला पण तिथेच जायचे आहे, कृपया माझ्यामागे या.’

म्हैसूर आश्रमात जास्त काळ मुक्कामाच्या वेळी श्री स्वामीजींनी विनंती केली की आश्रमात येणाऱ्या महिलांसाठी मी योगाचे वर्ग घ्यावेत. श्रीमती. गायत्रीने मला श्री स्वामीजींनी विकसित केलेल्या प्रथम आणि दुसर्‍या पातळीचे हठ योग शिकविले आणि ते मला शिकवायचे होते. श्री स्वामीजींनी सूचना केली होती की मी लवकर वर्गात यावे, आणि तिथे जरी एकजण आला किंवा बरेच जण आले किंवा कोणीही आले नाही तरी मी शेवटपर्यंत तिथे थांबावे जर कोणीहि आले नाही तर मी बसून हठयोग आणि क्रिया योगाचा अभ्यास/सराव केला पाहिजे. बर्‍याच वेळा वर्गात कोणीही नसायचे म्हणून मी बसून सराव करू शकले . मला असे वाटायचे की मी स्वर्गात आहे. दुपारच्या वेळी मी बागकाम किंवा इतर कोणतीही कामे करायचे . बर्‍याचदा मी स्वत: ला सांगायची- स्वर्ग असाच असला पाहिजे.

त्यांनी सांगितले होते , “पुन्हा पुन्हा अनुभव मागू नका, तुमच्याकडे असलेल्यां अनुभवांवर जरा मनन, चिंतन करा, ते तुम्हाला पुन्हा सामर्थ्य देतील.” तरीही ते अनुभव देत राहिले ; पुन्हा पुन्हा आणि पुन्हा. ते जे काही बोलतात किंवा करतात ते माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. मी सामान्यपणे प्रत्येक गोष्ट तपशीलवार लिहिते आणि त्यावर मनन ,चिंतन करते. मी त्यांचे निरीक्षण करते आणि मला अजूनही आश्चर्य वाटते की ते समाजातील विविध स्तरातील इतक्या लोकांना कसे आकर्षित करू शकतात. त्यांच्यातील काहीजणांना आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस नसेल, परंतु त्यांना ते किमान नकारात्मक कर्मामध्ये गुंतण्यापासून रोखतात.

श्री स्वामीजी आधुनिक जीवनाचे पालन करीत आहेत. त्यांनी पुट्टुगम् नावाचे एक फेस-बुक खाते तयार केले आहे. आपल्या बहुसंख्य मुलांना गुंतवून ठेवण्याची त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी हे खाते तयार केले. ते आपल्या भक्तांसोबत संवाद साधतात. त्यांना ते प्रेमपूर्वक आपली मुले म्हणतात. वय, रंग, पंथ, वंश, सामाजिक स्थिती, शैक्षणिक यश आणि समाजातील सर्व मतप्रणालीची लोक यांच्यात ते भेदभाव करत नाहीत. प्रत्येकजण त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त करतो.

आपली अध्यात्मिक शिस्त वाढीस लागण्यासाठी ‘सेवा’ ही आपल्याला दिलेली एक संधी आहे. श्री स्वामीजींनी असे वातावरण तयार केले आहे जेथे ते भाविकांना सेवेत सहभागी होऊ देतात. ते उपदेश करतात, ‘मानव सेवा हि माधव सेवा आहे. ते विशिष्ट प्रकल्प विशिष्ट लोकांना देतात जेणेकरून ते त्यांच्या कर्माचे ओझे कमी करु शकतील.

जय गुरु दत्ता

Tags: