SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23-12-2020
विवेकानंद पायडीमरी

श्री स्वामीजींनी सर्व भाविकांना या घटनेबद्दल सांगितले आणि त्यांनी सर्व गोष्टींचे वर्णन करून सांगितले की त्यांनी सर्व योजना तशी केली आहे. ते म्हणाले कि मी त्यांच्याबरोबर सात जन्म आहे म्हणून मी आता त्यांना सोडून जाणार नाही.

मी माझ्या सद्गुरु श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींना अभिवादन करतो. मी आंध्र प्रदेशचा आहे, माझा जन्म विजयवाड्यापासून पंचवीस मैलांच्या अंतरावर असलेल्या चिरीवाडा या दुर्गम गावात झाला. मी माझा अभ्यास केला आणि यांत्रिकी अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली. माझ्या अभ्यासादरम्यान भगवान श्री सत्य साई बाबा, (दुसरा अवतार) सात दिवस मुक्काम करण्यासाठी माझ्या गावी आले होते, त्यांचे आतिथ्य श्री वेलुरी नागेश्वर शर्मा आणि श्री वेलुरी शिवराम शास्त्री यांनी केले होते. त्यांचे भक्त श्री कस्तुरी यांच्या माध्यमातून मी त्यांना भेटलो, कस्तुरींना मी रेल्वे स्थानकावरून आणले होते. त्यानंतर, मला श्री साईबाबांचा मदतनीस होण्यास सांगितले गेले.

एक दिवस मी माझ्या भावासोबत बाबांकडे गेलो. तो भाऊ पोलिओमुळे अपंग झाला होता. मी बाबांना मदत करायला सांगितले. ते म्हणाले की त्याला पाय परत मिळणार नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारला की लोकांना वाटते की ते देव आहेत; ते त्यांची स्तुती करतात. जर ते आंधळ्यांना दृष्टी देतात तर माझ्या भावाला मदत का करू शकत नाही. त्यांनी मला सांगितले की हे त्याचे कर्म आहे हे कृपया समजून घे. मला समजू शकले नाही. त्या दिवसापासून मी जेव्हा जेव्हा संत लोकांना पाहिले तेव्हा मी नमस्कार करून माझ्या मार्गावरून पुढे जात असे. मला वाटले की ते फक्त त्यांच्या स्वतःच्या भक्तांसाठी येतात आणि खरोखरच ते भक्त भाग्यवान आहेत. या घटनेमुळे श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींबद्दल १९६८ साली ऐकले परंतु त्याकडे लक्ष दिले नाही. त्याचवर्षी माझे लग्न झाले होते.

१८ सप्टेंबर,१९८३ रोजी जेव्हा मी माझ्या मावशीला माझ्या नातेवाईकांकडे सोडण्यास गेलो होतो, तेव्हा माझा परिचय असलेल्या एका व्यक्तीने मला विचारले की मी तिला श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींच्या राहत असलेल्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो का? मग मी माझी पत्नी व मुलीसमवेत तिला घेऊन गेलो. मी तिला सोडत असतानाच मी त्यांचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी मी त्यांना बसून पेटी वाजवताना बघितले. मला वाटले की ते स्वामी नाहीत, कदाचित सहाय्यक असतील. म्हणून मी थांबलो आणि खर्‍या स्वामींच्या प्रवेशाची मी वाट पहात होतो. मग मी पाहिले की लोक त्यांच्याकडे जाऊन वाकून नमस्कार करीत होते. तेव्हा मला कळले की ते श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजी आहेत. मी नेहमीप्रमाणे नमस्कार करावयास गेलो. नमस्कार केला आणि नंतर श्री स्वामीजींना पाद्य पूजेसाठी माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. मी हे का केले हे मला माहित नाही. पाद्य पूजा कशी करायची ह्याची मला कल्पना सुद्धा नव्हती. हि केवळ स्वामीजींची इच्छा होती.

ते म्हणाले कि पाद्य पूजेसाठी ते दुपारी अडीचच्या सुमारास माझ्या घरी येतील आणि मी त्यांच्या सहाय्यकाला भेटून त्याला माझे नाव द्यावे. मी सहाय्यकाकडे गेलो पण त्यांनी मला सांगितले की श्री स्वामीजी खूप व्यस्त आहेत आणि यावेळी ते जमणार नाही. मला थोडासा राग आला आणि मी त्यांना म्हणालो की श्री स्वामीजींनी मला सांगितले आहे की ते माझ्या घरी येतील , कृपया त्यांना विचारून या कि ते माझ्या घरी येणार आहेत कि नाहीत. सहाय्यक स्वामीजीशी बोलून परत आला आणि म्हणाले की दुसर्‍या दिवशी श्री स्वामीजी माझ्या घरी येतील. त्यानंतर मी त्यांना विचारले, पाद्य पूजनासाठी मला काय तयारी करावी लागेल?

दुसर्‍या दिवशी मी पाद्य पूजेची सर्व तयारी केली आणि मी काही नातेवाईक आणि मित्रांनाही आमंत्रित केले होते. दुपारी दोनच्या सुमारास श्री स्वामीजींचे येण्याचे कोणतेही चिन्ह नव्हते म्हणून मी वाट पाहत राहिलो, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाट पहिली. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातून दोन लोक आले आणि म्हणाले की ते खूप व्यस्त आहेत आणि आज ते येऊ शकणार नाहीत. मी रागावलो आणि म्हणालो की तिथपर्यंत चालत जाईन आणि स्वतः: त्यांना घेऊन येईन. माझ्या घरापासून जरी साधारणतः सहा कि.मी. अंतरावर हे घर होते, मी चालण्यास सुरवात केली. थोडावेळ चालल्यानंतर ते लोक आले आणि त्यांनी मला आततायीपणा न करता त्यांच्याबरोबर जाण्यास सुचविले आणि श्री स्वामीजींना त्यांच्या घरी भेटण्यास सांगितले. मी घरी परतलो आणि तिथे जाण्याचा निश्चय केला. तथापि, मला कोणतीही ऑटो रिक्षा मिळाली नाही, सर्वसाधारणपणे नेहमी तिथे रिक्षा असायच्या. मग मी माझा स्कूटर घेतली आणि माझ्या कुटुंबातील दोन सदस्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा ते मला वाट बघण्यास सांगत राहिले. सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना माझ्या मनात येत होत्या.

मग एक माणूस आला आणि त्याने विचारले की श्री विवेकानंद कोण आहेत? मी स्वत: कडे बोट दाखविले आणि ते म्हणाले की मला समजले आहे कि तुम्हाला पाद्य पूजा करायची आहे, असे म्हणून त्याने पादुकाची एक जोडी (दत्ताची) आणली म्हणजे मी तिथेच पूजा करू शकेन. मला खूप राग आला. मला पाद्य पूजा करायची होती, पादुका पूजा नव्हे. मला या माणसाबद्दल किंवा त्या पादुकांबद्दल काहीही माहिती नव्हती म्हणून मी नकार दिला. माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता आणि गुरुंबद्दल नकारात्मक विचार येत होते पण कोठेतरी मला असं वाटत होते कि हे स्वामीजी वेगळे आहेत. मी माझ्या नकळत पूजा करत होतो. शेवटी श्री स्वामीजींनी येऊन माझ्यापुढे दोन्ही पाय ठेवले आणि दोन अश्रू त्यांच्यावर पडले. मग मला जाणवले आणि माझी खात्री पटली की ते माझे गुरु आहेत.

नंतर श्री स्वामीजींनी सर्व भाविकांना या घटनेबद्दल सांगितले आणि त्यांनी सर्व गोष्टींचे वर्णन केले आणि सांगितले की त्यांनी सर्व योजना तशी केली आहे. ते म्हणाले कि मी त्यांच्याबरोबर सात जन्म आहे म्हणून मी आता त्यांना सोडून जाणार नाही.

एकदा माझा मुलगा शाळेत इयत्ता नववीत असताना त्याला सायकल अपघात झाला. मी नुकतीच त्याच्यासाठी नवीन सायकल घेतली होती. तो एका लॉरीवर धडकला आणि रस्त्याच्या कडेला पडला. कसा तरी तो घरी पोहोचला मी काय म्हणेन याची भीती वाटल्याने त्याने याबद्दल मला कधीही सांगितले नाही. नंतर आम्ही म्हैसूरला गेलो आणि स्वामीजींनी संपूर्ण घटनेविषयी सांगितले, तेव्हाच मला कळले. ते म्हणाले अपघात झाला तिथे ते होते आणि त्यांनी माझ्या मुलाला वाचविले नाहीतर त्याचा मृत्यू झाला असता. आता तो मुलगा डॉ. फणिश्री श्री स्वामीजींची सेवेत आश्रमात आहे.

आणखी एक घटना घडली, मला समजले की माझ्या खूप रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत आणि यामुळे माझ्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. मी श्री स्वामीजींना काय करावे ते विचारले आणि ते म्हणाले की ते ठीक होण्यासाठी मी ऑपरेशन करून घ्यावे. ऑपरेशन थिएटरला जाताना ते आले आणि मला म्हणाले कि काळजी करु नकोस की तुला काहीही त्रास होणार नाही आणि ते नेहमी माझ्याबरोबर राहतील. सुमारे दीड तास चाललेल्या संपूर्ण ऑपरेशन होईपर्यंत ते थांबले. त्यानंतर त्यांनी मला विश्रांती घेण्याची आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. आता मी ठीक आहे आणि आश्रमात त्यांच्या सेवेत रुजू आहे.

स्वामीजींना भेटण्यामुळे माझे मन आध्यात्मिक मार्गाकडे वळले आहे, कारण माझ्यासाठी तेच त्यांचे प्रयोजन आहे. ते मला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढत आहे. मी माझ्या आई आणि वडिलांना गमावल्यानंतर मी स्वामीजींच्या अधिक जवळ गेलो. आता ते माझ्यासाठी आई आणि वडिलांसारखे आहेत. जेव्हा जेव्हा मला कोणतीही अडचण येते तेव्हा मी त्यांची भजनं गातो किंवा ऐकतो आणि मला मन:शांती मिळते. त्यांचे भजन माझ्यासाठी मंत्र आहेत. मी त्यांच्या कृपाछत्राखाली आलो आहे म्हणून माझा राग नियंत्रणात आला. मी आता बरेच काही वाचतो. मी त्यांच्या शिकविणींची आणि इतर आध्यात्मिक पुस्तके वाचतो आणि शिकवणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. ते माझ्यासाठी सर्वकाही आहेत आणि माझे जीवन त्यांच्या हातात आहे.

जय गुरु दत्ता

Tags: