त्यांनी पूर्ण राजेशाही पोशाख घातला होता, त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कि मी माझ्या परमेश्वराचे दर्शन घेत होतो. माझ्यासारख्या साध्या माणसाला ही विलक्षण संधी कशी दिली गेली?
मी आंध्र प्रदेशात आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घेत मोठा झालो. मी आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात होतो. त्यामुळे मी बर्याच साधकांना भेटलो. १९९८मध्ये दत्त भक्तांना माहित असलेली दीक्षा - औदुंबर दीक्षा, करण्यास मी प्रारंभ केला. मी हे करण्यास सुरुवात केली कारण मला श्रीगुरू दत्तात्रेयांची कृपा हवी होती. त्याचवेळी गुरू दत्तात्रेयांचा अवतार श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी आपल्या वार्षिक दौर्यासाठी आंध्र प्रदेशात आले होते. मी त्यांच्या मागोमाग फिरत राहिलो आणि सुमारे वीस वेळा त्यांचे दर्शन घेतले.
जेव्हा मी दिक्षेस सुरुवात केली तेव्हा माझे स्वामीजींशी काही संबंध नव्हते, परंतु जेव्हा मी दीक्षा पूर्ण केली तेव्हा मला वाटले की त्यांची भेट होण्यामागे काही कारण असले पाहिजे. मला त्यामागचे कारण शोधायचे होते आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचे होते म्हणून मी शिवरात्री उत्सवासाठी म्हैसूरला गेलो. मी उत्सवात भाग घेतला, त्यांचे दर्शन घेत असताना मी त्यांचे निरीक्षण केले. त्यांच्याबद्दल सर्व काही कोड्यात टाकणारे होते आणि ते कोण आहेत किंवा काय आहेत हे मला समजू शकले नाही. या भेटीनंतर मी त्यांचा जीवन इतिहास वाचण्यास सुरुवात केली. हे इतके शक्तिशाली होते कि त्यामुळे माझ्या आयुष्यात अंतर्गत आणि बाह्य बदल घडून आले. त्यांच्या दर्शनाच्या तळमळीने, मी वारंवार मैसूर आश्रमात जात असे.
एकदा एका भेटीत माझी पत्नी माझ्याबरोबर मैसूर आश्रमात आली होती आणि श्री स्वामीजींनी तिला बोलावून मला तिथेच सोडून जाण्यास सांगितले. अंत:प्रेरणेने ती हो म्हणाली आणि निघून गेली आणि मी संस्थेचे कार्य शिकत राहिलो. एके दिवशी श्री स्वामीजींनी मला सांगितले की मी ऋषिकेश आश्रमात जाऊन तिथल्या आश्रमाचे व्यवस्थापन तसेच याजकांचे कार्य केले तर त्यांना आवडेल. मी ताबडतोब हा आदेश स्वीकारून तिथे गेलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. आजही मी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
२००१ मध्ये मी ऋषिकेश आश्रमात आलो. आश्रमाचे काम आणि पूजा केल्याने माझे आध्यात्मिक आयुष्य वृद्धिंगत झाले. मी माझ्या निवडलेल्या मार्गावर अविचलपणे काम करण्यास सक्षम झालो . मी माझ्या प्रगतीचा एक भाग म्हणून सर्व पूजा करत होतो आणि मी प्रत्यक्षात मुर्तीमध्ये प्रभूस पाहू शकलो. एका पौर्णिमेच्या रात्री मी मंदिरात दत्तात्रेयांच्या प्रत्यक्ष सगुण स्वरुपाचे दर्शन घेतले. माझी पूजा नुकतीच झाली होती आणि मी माझ्या खोलीत बसलो होतो. मी बाहेर पाहिले आणि मंदिरामधून एक आकृती बाहेर येताना दिसली आणि अंगण ओलांडून पुढे जात होती, ह्या कृपेने मी मंत्रमुग्ध झालो.
मी बसलो आणि अविचलपणे ह्या उदात्त स्वरूपाचे मी निरीक्षण करत होतो. असे वाटत होते की त्यांचे हेच निवासस्थान आहे. परत निरीक्षण करत मी माझ्या पूजनीय भगवान दत्तात्रेयांची पूर्ण वैशिष्ट्ये पाहिली. त्यांनी ऐश्वर्यपूर्ण पोशाख घातला होता आणि त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. माझा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी माझ्या परमेश्वराचे दर्शन घेत होतो. माझ्यासारख्या साध्या माणसाला ही विस्मयकारी संधी कशी प्राप्त झाली? काही वेळाने माझ्या आईलाही भगवान दत्तात्रेयांचे दर्शन झाले.
नंतर जेव्हा मी श्री स्वामीजींना भेटलो, तेव्हा मी त्यांना त्या घटनेबद्दल सांगितले आणि त्यांनी कोणतीही भाष्य न करता ते हसले. थोड्या वेळाने, त्यांनी मला सहजपणे सांगितले की २००१ मध्ये जेव्हा त्यांनी मला ऋषिकेशला पाठवले तेव्हा त्यांनी मला मृत्यूपासून वाचवले होते मला एक जीवन दान दिले होते . मला जेव्हा ऋषिकेशला पाठवले गेले तेव्हा मला परमपूज्य श्री स्वामीजींनी दिलेल्या सूचना आठवल्या.
ते म्हणाले होते की, कोणत्याही परिस्थितीत मी आश्रम सोडून बाहेर जायचे नाही, गंगा मातेत स्नान करण्यासाठी सुद्धा जायचे नाही मला प्रवेशद्वाराबाहेर जायची सुद्धा परवानगी नव्हती, मला कंपाऊंडच्या आत राहून पूजा आणि मंदिरात लक्ष केंद्रित करायला सांगितले होते. माझ्या कर्मामुळे मला तुरूंगात टाकले गेले असावे असे मला वाटायचे. त्यांची कृपा आहे आणि ते माझी काळजी घेत आहेत याबद्दल माझ्या मनात कधीच शंका आली नाही. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून ती मोडण्याचा प्रयत्न एकदाही केला नाही. त्यांची कृपा अशीच असते. मी न विचारता त्यांनी मला वाचविले. मी किती भाग्यवान आहे!
२००७ मध्ये माझी पत्नी खूप आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की यापुढे तिच्यावर करण्यासारखे काहीही उपाय उरले नाहीत. आणखी काहीही करू शकत नाही. मी म्हैसूर आश्रमाला फोन केला आणि श्री स्वामीजींना त्या परिस्थितीबद्दल सांगितले आणि त्यांनी लगेच तिच्यासाठी रक्षा पाठविली. मी ही रक्षा तिच्या मनगटाला बांधली आणि वीस दिवसात पूर्णपणे बरी होऊन तिने रुग्णालय सोडले, ती बरी झालेली पाहून रुग्णालयातील सर्व लोक, डॉक्टर चकित झाले.
त्यानंतर पुन्हा, २०१० मध्ये म्हैसूर येथे दसरा उत्सव साजरा होत असताना, श्री स्वामीजी नाद मंडपामध्ये श्री चक्र पूजा करत असताना ती आजारी पडली. डॉ.फणिश्रीने तिला आश्रमाच्या रुग्णालयात दाखल केले आणि त्यांनी मला सांगितले की ती आता या जगात नाही. त्याच वेळी श्री स्वामींनी तिच्यासाठी एक रक्षा पाठविली आणि तिने ती बांधून घेतली. हळू हळू ती बरी झाली आणि दवाखान्यातून बाहेर पडली. श्री स्वामीजींनी माझ्या पत्नीला दोनदा जीवनदान दिले आहे.
माझे दैवत आणि तारण कर्ता याबद्दल मी कृतज्ञ कसा राहणार नाही? २०१० मध्ये पुन्हा एकदा माझ्या नातवाला कावीळ झाल्याचे निदान झाले, त्याची अवस्था इतकी गंभीर झाली होती कि तो जगेल असे आम्हाला वाटले नव्हते. तथापि आम्ही त्याला दिल्लीतील मुलांसाठी असलेल्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांकडून होणारे निदान फारसे उत्साहदायी नव्हते. मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी उपचार करण्याची तयारी दर्शविली परंतु उपचाराचा खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त होता. मी त्यांना सांगितले की आमच्याकडे सगळे मिळून फक्त पाच हजार रुपयांपेक्षा कमी पैसे आहेत, परंतु आम्ही मुलावर उपचार करू इच्छितो.
हा अधिकारी आमची वाईट परिस्थिती जाणत होता , परंतु व्यावसायिक जगात पैशाशिवाय काहीही होत नाही. अशा प्रकारचे कर्ज आणि इतक्या कमी वेळात देऊ शकणारे आम्हाला माहित असणारे लोक खूपच कमी होते. आम्हाला सांगण्यात आले की कोणताही उपचार सुरू होण्यापूर्वी आम्हाला कमीतकमी तीस हजार रुपये जमा करावे लागतील. आम्ही अधिकाऱ्याकडे याचना करत राहिलो परंतु त्याला जणू काही काहीच ऐकावयास येत नव्हते. मग ते म्हणाले की आम्ही व्यवस्था करण्यासाठी खाते कार्यालयात जावे. त्यांनी मला कॅशियरकडे नेले आणि आश्चर्याची गोष्ट अशी कि आवश्यक रक्कम आधीच आमच्या खात्यात जमा केली गेली होती. हे कसे काय घडले हे कोणालाही समजले नाही.
माझे जीवन म्हणजे श्री स्वामीजी आहेत . कोणत्याही कामास सुरुवात करण्यापूर्वी, मी त्यांची प्रार्थना करतो आणि सर्वोत्तम काम करण्यास ते मला मार्गदर्शन करतात. एकदा श्री स्वामीजींनी मला सांगितले की, “ गुरू तुमच्यावर जे काम सोपवतो ते मनापासून करा आणि तुम्हाला मोक्ष मिळेल.” हे शब्द माझे जीवन आहेत कारण ते माझा मार्ग आणि माझे लक्ष्य आहेत.
जय गुरु दत्ता
श्री स्वामीजी म्हणतातः लोक म्हणतात की गंगेत सर्व पापं धुतली जातात परंतु गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतरही त्यांचा विश्वास बसत नाही की ते शुद्ध झाले आहेत. जर खरा विश्वास नसेल, तर गंगाच काय, गंगा मस्तकावर धारण करणारा शिव भगवान सुद्धा तुम्हाला शुद्ध करू शकणार नाही.