SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23-12-2020
पार्वती ग्वेन्टेनस्पेरेर, स्वित्झर्लंड

“मी दत्त आहे; मी सर्व लोक आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीचा शासक आणि साक्षीदार आहे! ग्रह माझे पहिले मदतनीस आहेत. मी खूप कंपाउंडर्स वापरतोय. मी फक्त काही छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करतोय आणि शेवटचे पॉलिश!”

श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी म्हणतात: “मी दत्त आहे; मी सर्व लोक आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीचा शासक आणि साक्षीदार आहे! ग्रह माझे पहिले मदतनीस आहेत. मी खूप कंपाउंडर्स वापरतोय. मी फक्त काही छोट्या छोट्या शस्त्रक्रिया करतोय आणि शेवटचे पॉलिश!”

३ जुलै १९८३ हा माझा खरा वाढदिवस आहे. त्यादिवशी स्वित्झर्लंडमध्ये मी ज्यांच्याकडे काम करत होते, त्यांच्या चेतनाच्या स्वयंपाकघरात प्रथम मला माझे सद्गुरू श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी भेटले,. मी अर्थशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यावेळी मी चेतनाच्या मालकीच्या कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. त्या सगळ्यांसाठी कॉफी आणि चहा तयार करण्यासाठी मी तिथे होते. श्री स्वामीजी स्वयंपाकघरात शिरले आणि एक शब्दही न बोलता माझ्याकडे पाहून हसले. पण त्या प्रथमदर्शनी मला असं दिसून आलं की मी एक असामान्य व्यक्तिमत्त्व पाहिलं आहे. काय कारण असेल ते मला समजले नाही पण मला असं वाटलं की मी त्यांना ओळखते. बऱ्याच काळानंतर एखाद्या जुन्या नातेवाईकाला भेटण्यासारखं ते होतं.

काही दिवसांनी हंगेरीत मला घोडेस्वारी करताना अपघात झाला. मला खात्री होती की, भगवान शंकरांनी सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक मार्ग निवडण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे माझ्या आयुष्यात एक निर्णायक टप्पा निर्माण झाला. माझ्या मनाचा तो आध्यात्मिक कल माझ्या कुंडलीत स्पष्टपणे लिहिलेला आहे. १०जुलै १९८३ रोजी असलेली ग्रहस्थिती एका अपघाताकडे बोट दाखवत होती. ग्रहस्थितीची तुलना श्री स्वामीजींच्या कुंडलीशी करून पहिली. ते खरोखरच भगवान शंकराचे बोलावणे होते. १९८४ साली मी श्री स्वामीजींना पुन्हा भेटले. १९८४ साली मी माझी इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी एका छोट्या सेमिनारमध्ये सहभागी झाले होते . तिथे मला त्यांच्या देवत्वाचे आणखी अनुभव आले. श्री स्वामीजींनी डाव्या अंगठ्यातून स्फटिक-मोती तयार केला आणि मला बोलावून त्यांनी विचारले , “सेक्रेटरी, तुझ्या स्वप्नात मी असा दिसतो का? मला उत्तर देता आलं नाही कारण त्यावेळी मला त्यांची स्वप्नं पडली नव्हती! अर्थात या प्रश्नामागे आणखी एक अर्थ होता.

तेव्हापासून मी म्हैसूर आश्रमाला भेट देऊ लागले. १९८५ साली मी पहिल्यांदा क्रिया-योग अभ्यासक्रमात भाग घेतला आणि अद्भुत शिवरात्री उत्सव पाहिला. जेव्हा श्री स्वामीजी अग्निकुंडात शिरले, तेव्हा मी भक्ती आणि आदरात हरवून गेले होते. क्रिया-योग अभ्यासक्रमादरम्यान श्री स्वामीजींनी मला “पार्वती” हे आध्यात्मिक नाव दिले होते. श्री स्वामीजींच्या रूपात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाल्याचा मला खूप आनंद झाला.

१९८८ साली मी हॉलंडमधील बोव्हेंडोर्फ येथे श्री स्वामीजींना भेटले. तिथे मला त्यांना माझी नीलम-अंगठी द्यायची होती, ती मी अनेक वर्षे घातली होती. ती त्यांची इच्छा होती. संन्यासीभाषेत ही एक प्रकारची मूक दीक्षा होती. मी श्रीलंकेत विकत घेतलेला हा सुंदर नीलम याचे एक गुपित आहे, मला त्याची खात्री आहे. श्री स्वामीजींनी मला ते कधीच सांगितलं नाही. नऊ दत्त मंदिरांच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी दररोज एक वर्षाहून अधिक काळ ही अंगठी घातली होती. १९८९ साली माझ्या जीवाला धोका होता. मला एका खूप तुफानी वादळाचे स्वप्न पडले आणि तेरा नंबर दिसला. श्री स्वामीजींनी असेच काही भविष्यसूचक शब्द उच्चारले: “तू जगाच्या शांतीसाठी आणखी काही दिवस काम कर; तू तुझ्या भावासाठी, मुलासाठी आणि गुरूंसाठी कर!” श्री स्वामीजी/दत्त हे या जगातील घडामोडींचा समतोल साधत आहेत.

नोव्हेंबर १९८९ नुझिविडुमध्ये बाराव्या दत्तात्रेय-मंदिराच्या प्रतिष्ठापने दरम्यान श्री स्वामीजींनी माझे प्राण वाचवले. १३ नोव्हेंबर १९८९ हा पौर्णिमेचा दिवस होता त्या दिवशी ग्रहण नक्षत्र होते. एक मोठं वादळ त्या ठिकाणाला त्रास देत होतं (अर्ध्या वर्षापूर्वी मला पडलेला माझं स्वप्न आठवत होतं). श्री स्वामीजींना सर्दी आणि ताप आला. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, या भागाच्या संरक्षणासाठी चक्रीवादळाचा काही भाग मी शरीरात घेतला असून दुसरा भाग त्यांनी समुद्रात पाठवला. त्याने घोषणा केली: “मी यमाचा सुद्धा स्वामी आहे."!

त्या काळात मंगीनापुडीयेथून आणलेल्या समुद्रात जन्मलेल्या ‘मूल विराट-वेंकटेश्वरमूर्तीचे श्री स्वामीजींनी स्वागत केले. ते आता म्हैसूरच्या दत्त व्यंकटेश्वर मंदिरात ठेवण्यात आले आहे. चौदा इंचाच्या काळ्या दगडी बालाजी मूर्तीचे आगमन हे १९९९ साली म्हैसूर आश्रमातील महाकाय दत्त व्यंकटेश्वर मंदिर परिसराचे उत्पत्ती स्थान होते.

जीवन वाचवण्याच्या कथेकडे परत येऊ या. हैदराबादला जाण्यासाठी पाच परदेशी भक्तांनी रात्रीच्या बसचे आरक्षण केले होते. निघण्याच्या थोड्याच काळाआधी श्री स्वामीजींनी फोन केला आणि मला प्रवासाचा कार्यक्रम बदलण्याची विनंती केली. तुम्ही टॅक्सीने विजयवाडाला जा ; एक रात्र गुरू निलयममध्ये घालवा आणि दुस-या दिवशी मंदिर उद्घाटनासाठी रेल्वेने हैदराबादला जा. प्रवासाची तारीख आणि वाहन बदलण्यात त्यांनी माझा आणि इतरांचा जीव वाचवला याची मला खात्री होती. ती श्री मातांची कृपा होती! श्री स्वामीजींनी त्यांच्या जीवनदानाच्या चमत्काराला दुजोरा दिला. ते म्हणाले: “पार्वतीने जगावे अशी माझी इच्छा होती!” आता त्या चमत्काराला बावीस वर्षे झाली आहेत, माझ्या लाडक्या सदगुरूंनी दिलेली ती देणगी!

नंतरच्या काळात मी नियमितपणे वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी श्री स्वामीजींच्या आश्रमात जात होते. मी ‘एंजल निवास’ विभागात काम करत होते आणि सर्व प्रकारचे योग, वेद आणि उपनिषद यांचा अभ्यास करत होते. पुरुष-प्रकृतीच्या परस्परसंबंधाचे तत्त्वज्ञान आणि त्रिगुणांच्या लीला असलेल्या सांख्य-योगावर मी खासकरून चिंतन करावे अशी श्री स्वामीजींची इच्छा होती. भगवान दत्तात्रेयाच्या तत्त्वज्ञानाशी त्याचा संबंध आहे. मला अंतर्बाह्य खूप अनुभव आले होते. इतके अनुभव आले होते कि ते मला वारंवार प्रकट करून सांगत होते कि ते साक्षात परब्रम्ह, सत्- चित्-आनंद तत्व स्वरूप आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाची आणि संरक्षणाची मला नेहमीच जाणीव असते. देवाची सृष्टी, देवत्व, परिपूर्णता आणि सौंदर्य यांवर प्रचंड प्रेम असलेले, सगळ्यात करुणामयी व्यक्ती म्हणून मी त्यांना पहाते. प्रत्येक अणूमध्ये आणि प्रत्येक कृतीत देवत्वावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे . माझ्यासाठी ते ऋग्वेददातील भगवान इंद्र आहेत , अज्ञानाच्या अजगराचा वध करणारे आहेत .

श्री दत्ताबरोबरच्या माझ्या नात्याबद्दल मला आश्चर्य वाटायचे. १९८७ साली नव्वद वर्षांच्या ताडपत्र ज्योतिष सांगणाऱ्या एका ऋषींबरोबर मी सल्लामसलत केली. त्यांनी मला सांगितले की, फार पूर्वी माझे ऋषिवंशात अनेक जन्म झाले होते. नंतर मी श्री स्वामीजींना विचारलं आणि त्यांनी त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी सात हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर होतो. त्यावेळी श्री दत्ताचा (श्री स्वामीजी) त्रेता युगातील पहिला अवतार होता. श्री स्वामीजींनी अलीकडेच बेंगळुरूमध्ये घोषणा केली: “स्वामीजी सात हजार वर्षांहून अधिक काळ या जगभर प्रवास करत आहेत!

त्याच्या पवित्र ओठांमधून माझ्यासाठी बाहेर पडलेले काही चांगले शब्द. “पार्वती आणि आश्रम परस्पर संबंध आहे. स्वित्झर्लंडसाठी परवानगी नाही, फक्त पैसे आणि व्हिसासाठी जा, हा एक नित्य क्रम आहे. प्रसादीला ते म्हणाले: “माझी पर्वती नेहमीच निरोगी असते, कधीकधी तिची तब्येत चांगली नसते, पण ती काळजी करत नाही! पुन्हा एकदा ते म्हणाले, “तू इंद्र- लोकातुन आली आहेस, तू फक्त स्वामीजींच्या मदतीला आली आहेस, एक दिवस आपण आपल्या ग्रहावर परत जाऊ.” यापुढे असेही म्हणाले: “तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे, देव नाही, स्वामीजी नाहीत!” मी म्हणाले: “माझ्यासाठी फक्त श्री दत्त , आदिपराशक्ती आणि परमात्म्याचे रूप असलेले श्री स्वामीजी आहेत आणि पूर्ण शरणागती आहे, जी पूर्ण स्वातंत्र्य देते.

शेवटी १९८७ साली माझा घटस्फोट झाला. माझे आईवडील त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानी आहेत, माझा भाऊ, बहीण आणि त्यांची कुटुंबं खूप चांगली स्थायिक झाली आहेत. अशा प्रकारे मी निवडलेल्या माझ्या आध्यात्मिक मार्गाचे पालन करण्यास आणि माझे गुरू श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींच्या प्रेरणा (बहुतेक अंतर्प्रेरणा)ऐकण्यास मुक्त आहे.

जय गुरु दत्ता.

Tags: