श्री स्वामीजींना पाहिल्यानंतर मला त्यांच्यात माझ्या सर्वात आवडत्या देवाचे, श्रीकृष्णाचे दर्शन झाले. मला वाटले कि गुरूंच्या रूपात श्रीकृष्णच प्रकट झाले. अशा प्रकारे मी त्यांच्या पहिल्याच दर्शनाने आकर्षित झालो होतो. अजूनही मला तसेच वाटते. .
१९६७ मध्ये मी माझ्या पदवीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत असताना माझे सद्गुरुदेव , श्री श्री श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी मला भेटले. मी माझे वडील आणि त्यांची सहकारी पी. मैत्रेयी यांच्या बरोबर होतो; ते सुरुवातीच्या भक्तांपैकी एक होते , ते स्वयंपाकघरातील कामांची देखभाल करीत असत. तिने ,माझ्या वडिलांना, तिच्या गुरूंच्या स्वरूपात एक अतिशय थोर आणि पवित्र व्यक्तीला भेटण्यास प्रोत्साहित केले. आमची मने उत्कंठेने भरुन गेली होती , काय अपेक्षा करावी हे आम्हाला कळत नव्हते.
ही माझी पहिली भेट होती, भक्तांची भक्ती पाहून मलाआश्चर्य वाटले; प्रत्येकजण डोळे बंद करत होते. त्यांच्या दर्शनाने आणि त्यांच्या तेजाने मंत्रमुग्ध झालेले दिसत होते. आपला श्वास त्यांच्यापर्यंत पसरू नये म्हणून ते तोंडावर हात ठेवत होते. त्यांचे ते विशेष लक्ष आणि ते घेत असलेली काळजी पाहून मला आश्चर्य वाटले. मीसुद्धा मंत्रमुग्ध झालो. मी परम आनंद आणि आशीर्वादाचा आनंद घेत होतो. ते देव आहेत किंवा मनुष्य हे मी जाणू शकलो नाही. फक्त त्यांच्याकडे टक लावून पाहण्याखेरीज मी काही केले नाही. दहा वर्षानंतर, १९७७मध्ये मी वेगळ्या परिस्थितीत पुन्हा श्री स्वामीजींना भेटलो. माझे वडील आजारी पडले होते आणि अंथरुणाला खिळले होते म्हणून मी त्यांच्या आजारावर काही औषधोपचार होतील का हे पाहण्यासाठी गेलो होतो, मात्र काही काळानंतर लगेचच त्यांचे निधन झाले.
एका वर्षानंतर मला हायस्कूलमध्ये शिकवण्याची तात्पुरती नोकरी मिळाली. त्या काळात श्री स्वामीजी विजयवाड्यात एका वेळी कमीत कमी चाळीस दिवस राहायचे. नशिबाने त्यांच्या भेटीसाठी मला सुट्टी मिळाली आणि मी दिवसभर तिथे राहून सर्व कार्यक्रमात भाग घेऊ शकलो. हे असे दहा दिवस चालले, दहाव्या दिवसाच्या शेवटी श्री स्वामीजींनी मला विचारले, “तू कोण आहेस? तुला काय हवे आहे? ” या शब्दांमुळे मी भावुक झालो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मला वाटले की माझ्या वडीलांचे नुकतेच निधन झाले असले तरीही मला त्यांच्याकडून करूणा. प्रेम मिळाले नाही.
मी असे म्हणालो की “मी काही आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी आलो आहे; मोक्ष.” थोड्या वेळाने श्री स्वामीजींनी मला विचारले “तू कुठे काम करतोस?” मी म्हणालो, “मी हायस्कूलमध्ये तात्पुरता शिक्षक म्हणून काम करत आहे.” मग त्यांनी वचन दिले की ते माझ्या नोकरीची काळजी घेतील. त्यावेळेस माझ्या नोकरीचे ते बघून घेतील असे ते म्हणाले, त्यांना नक्की काय म्हणायचे होते ते मला समजले नाही. मी माझा कमकुवतपणा देखील कबूल केला. नंतर, त्यांच्या आशीर्वादाने मी माझ्या अडचणींवर मात केली.
मी एक तात्पुरता कर्मचारी असल्याने शैक्षणिक वर्षाच्या शेवटी माझी सेवा संपुष्टात आली होती. नंतर मला औपचारिकरित्या पुन्हा अर्ज करावा. लागणार होता. आश्चर्याची गोष्ट अशी घडली कि माझ्या एका सहकाऱ्याने शाळा सोडून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे मला कायमस्वरूपी नोकरी प्राप्त झाली. तेव्हाच मला श्री स्वामीजींचे शब्द समजले “मी तुझ्या नोकरीचे बघेन.” . हा त्यांच्याबरोबरचा माझा पहिला अनुभव होता. त्यानंतर, दरवर्षी, शिवरात्रीच्या वेळी मी म्हैसूर आश्रमाला भेट द्यायचो आणि जेव्हा जेव्हा मी त्यांचे दर्शन घेत असे तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्यात बरेच सकारात्मक बदल होत असत.
माझ्या आध्यात्मिक जीवनातही मोठे बदल झाले. जेव्हा मी ध्यान करण्यास सुरवात करत होतो तेव्हा पहिल्या काही मिनिटांसाठी मी सचेत असायचो परंतु नंतर मी पूर्ण समाधी अवस्थेत जात असे. माझे गुरु श्री स्वामीजींच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हते. १९८२ मध्ये त्यांच्याकडून मला मिळालेले हे वरदान आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांचे स्मरण करायचो किंवा दर्शन घ्यायचो मला आशीर्वाद प्राप्त व्हायचे , असे आशीर्वाद जे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
मी एक शिक्षक म्हणून काम करत असताना एक असे पद होते कि ज्यासाठी मी आणि माझ्या सहकार्याने अर्ज केला होता. आमच्यासाठी हि एक पदोन्नती होती. हे पद आम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणारे असल्याने आम्ही दोघांनीही या पदासाठी जोरदार प्रतिस्पर्धा सुरू केली. शाळा व्यवस्थापनाने आम्हालाच हा गुंता सोडवण्यास सांगितले, अगदी जरी न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी तसे करून सोडविण्यास सांगितले. मला ती कल्पना आवडली नाही म्हणून मी श्री स्वामीजींना भेटायला गेलो आणि ती परिस्थिती त्यांना सांगितली. ते म्हणाले, “तुला न्यायालयात जाण्याची गरज नाही, तुला पदोन्नती मिळेल.” आश्चर्याची गोष्ट अशी कि पंधरा दिवसानंतरच मला पदोन्नतीची ऑर्डर मिळाली. माझ्या गुरूंनी मला दिलेली ही भेट होती. न मागताही ते आपल्याला सर्व काही देतात. गुरुंचे भक्ताप्रती असलेले प्रेम हे असे असते. माझ्यावर श्री स्वामीजींची कृपा अनेक प्रकारे झाली. ते आपल्याला केवळ प्रशिक्षणच देत नाही तर ते आपल्याला आशीर्वादही देतात.
माझा एक पुतण्या काकीनाडा येथे रहात होता. लग्नानंतर पाच वर्षे होऊन गेली त्याला मूलबाळ नव्हते. आवश्यक ते सर्व उपचार त्यांनी केले आणि वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयत्न केला; शेवटी सर्व प्रयत्न सोडून जसे होते तसे समाधानी राहू लागले. काही कार्यक्रमासाठी श्री स्वामीजी मच्छिलीपट्टनम येथे आले होते आणि मी माझ्या पुतण्याला सांगितले की मनःशांतीसाठी त्यांच्याकडे प्रार्थना कर. माझ्या पुतण्याने श्री स्वामीजींची भेट घेतली आणि मनःशांतीसाठी प्रार्थना केली. श्री स्वामी म्हणाले, “या वयात तू हे विचारत आहेस ?” आणि त्यांनी त्याच्या पत्नीला प्रसाद म्हणून फळ दिले. काही काळानंतरच त्यांना मुलाचा आशीर्वाद मिळाला आणि बाळाच्या जन्मानंतर ते श्री स्वामीजींचे आशीर्वाद घेण्यासाठी श्री स्वामीजींकडे आले.
माझ्या वडिलांचे मित्र, श्री एन.व्ही. राजाराव हे तपस्या करणारे योगी होते, त्यांनी १९४४ पासून त्यांच्या तपस्येस प्रारंभ केला ते दररोज किमान चार ते पाच तास ध्यान करीत असत. मी माझ्या बालपणातच त्यांना भेटलो आणि त्यांनी मला स्वामीजींना भेटण्यास प्रभावित केले. मी त्यांना योग आणि ध्यानाबद्दल बरेच प्रश्न विचारत होतो, म्हणून त्यांनी मला श्री स्वामीजींकडे पाठवले. श्री स्वामीजी पाहिल्यानंतर मला माझा सर्वात आवडता देव श्री कृष्ण त्यांच्यात दिसले. मला वाटले की श्रीकृष्ण स्वतः गुरु रूपात माझ्यासमोर प्रकट झाले आहेत. अशा प्रकारे मी त्यांच्या पहिल्याच दर्शनात आकर्षित झालो होतो. अजूनही मलाही तसेच वाटते.
हे माझे अनुभव आहेत आणि माझ्या आयुष्यात आणखी बरेच काही अनुभव आहेत. मी आश्रम प्रशासनात सेवा करीत आहे आणि सर्व काही माझ्या क्षमतेपेक्षा अधिक चांगले घडत आहे. ही माझी क्षमता नाही हे खरे आहे. मी साधन आहे आणि श्री स्वामीजी हे सर्व करीत आहेत. माझ्या मते श्री स्वामीजी दुसरीकडे कुठेही नाहीत; ते माझ्यामध्ये आहेत. अध्यात्मिकतेत मला त्यांच्यामुळे ज्ञान प्राप्त झाले. श्री स्वामीजींनी मला साधन बनवून मला काही हातांची मदत देऊन माझ्याकडून मच्छलीपट्टणमच्या आश्रमाचे काम करून घेत आहेत. ते माझी काळजी घेत आहेत; केवळ आध्यात्मिकतेतच नाही तर सांसारिक जगात देखील. जय गुरु दत्ता
श्री स्वामीजी म्हणतातः
स्वतःला आणि स्वतः:चे कपडे स्वच्छ ठेवणे चांगले. शुद्ध विचार निर्माण होण्यास ते हातभार लावतात. तथापि, केवळ हेतू आपल्याला चांगले शब्द उच्चारण्यास आणि चांगले करण्यास प्रवृत्त करतात. चांगले ध्यान करण्यासाठी मन स्थिर असले पाहिजे. चंचल मनाने आपण परिपूर्णतेचा मार्ग चालू शकत नाही. आपण आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल समाधानी राहून ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करू या. मुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण शांतीने त्याची प्रार्थना करूया.
सूर्य, चंद्र, निसर्गातील पंचतत्त्व - पृथ्वी, जल, अग्नि ,आकाश आणि तसेच आंतरिक चैतन्यापासून प्रत्येकाचे विचार, बोलणे किंवा कृती लपू शकत नाही. हे सर्वज्ञानी परमेश्वराचे विविध पैलू आहेत. ते परम चैतन्य आहे: म्हणजे, “शुद्ध चैतन्य”