“तू का घाबरतेस? मी इथे आहे, मी तुझी काळजी घेण्यासाठी इथे आहे आणि तू तुझ्या नातवंडांबरोबरही राहशील, ह्याला घाबरू नकोस.’
मी कल्याण दास , मी चार्टर्ड अकाउंटंट असून भारतातील हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे मी राहतो. एक व्यावसायिक या नात्याने मला हैदराबाद विश्वस्त सदस्यांद्वारे आयकर माफीच्या उद्देशाने ज्ञान बोध सभेची खाती तयार करण्यास सांगितले गेले होते , १९८६ पासून श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींबद्दल माहिती होती, पण त्यांना भेटण्याच्या संधीचा वापर मी कधीच केला नाही. त्या काळात कोणत्याही स्वामीजींवर किंवा त्यांच्या चमत्कारांवर माझा विश्वास नव्हता.
कर्मानुसार माझी पत्नी वसंता उच्च रक्तदाबाने ग्रस्त होती आणि १९८९ नंतर काही काळातच तिचे डायलिसिसचे निदान केले गेले कारण तिची दोन्ही मूत्रपिंडे नीट कार्यरत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करायचं ठरवलं आणि सर्व व्यवस्था करण्यात आली. तिच्या बहिणीने ठरवले की, जर सर्व काही जुळत/सुसंगत असेल तर ती मूत्रपिंड दान करेल, आणि शस्त्रक्रिया ऑगस्ट १९८९ मध्ये करण्याचे ठरवले.
शस्त्रक्रियेच्या दोन महिने आधी सुसंगततेचि तपासणी केली गेली. आणि दात्याच्या रक्ताशी माझ्या वसंताचे रक्त अर्धे जुळत असल्याचे आढळून आले, त्यामुळे प्रत्यारोपण करण्याचे नियोजन केले गेले. तथापि, प्रत्यारोपणाच्या नियोजित तारखेपूर्वी ही पुन्हा तपासणी करण्यात आली आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की, पूर्वी अर्धवट जुळलेले रक्त आता संवेदनशील झाले होते . शेवटी डॉक्टरांनी सांगितले की कि ऑपरेशन केले तरी शरीर ते स्वीकारणार नाही म्हणून आपण हे प्रत्यारोपण करू शकत नाही. या घटनेमुळे ऑपरेशन पुढे ढकलण्यात आले.
डॉक्टरांनी मला सल्ला दिला की रक्त जुळण्यासाठी मी आणखी काही नातेवाईकांची तपासणी करावी. कुटुंबातील अनेक सदस्य आणि नात्यात नसलेल्या अठरा जणांची चाचणी घेण्यात आली आणि एकही योग्य माणूस सापडला नाही. डॉक्टरांनी मला सल्ला दिला की रुग्णाच्या शरीरात पॅनल रीऍक्टिव्हिटी होत आहे आणि त्यामुळे तिच्यावर यापुढे शस्त्रक्रिया करता येणार नाही. तिला आयुष्यभर डायलिसिसवर राहावं लागेल. माझ्या भावांनी आणि इतर काही जणांनी स्वतंत्रपणे दोन ज्योतिषींचा सल्ला घेतला. मे१९९० पर्यंत माझ्या पत्नीच्या जीवनाचा शेवट होईल असं त्यांनी सांगितलं.
किडनीदान करणाऱ्या बऱ्याचजणांची तपासणी केल्यानंतर आणि इतक्या नैराश्येतून गेल्यानंतर डॉक्टर आणि विज्ञान अपयशी ठरल्यासारखं मला वाटलं. त्या क्षणी मी श्री स्वामीजींचा विचार केला. जर काही शक्य असेल तर ते केवळ आध्यात्मिक शक्तीनेच शक्य होईल. १९८९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात श्री स्वामीजींनी हैदराबादला भेट दिली तेव्हा माझी पत्नी डायलिसिसवर असतानाही आम्ही त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्याशी बोललो. त्या भेटीदरम्यान आमची कोणीही ओळख करून दिली नाही, पण त्यांनी स्वत: आम्हाला ऑडिटर आणि त्यांची पत्नी वसंता म्हणून ओळखलं. आम्हाला किती अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आणि किती लोकांची तपासणी करण्यात आली परंतु योग्य जुळणारा दाता सापडला नाही. हे सगळे आम्ही त्यांना सांगितले.
श्री स्वामीजींनी आमचं ऐकलं आणि त्यांनी आम्हाला म्हैसूरला येऊन पूजा, होम आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला सांगितलं. नंतर नवरात्री आणि दसरा उत्सवादरम्यान आम्ही दोघेही म्हैसूर आश्रमात गेलो आणि तेथे आम्ही पूजा आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो . त्या काळात आम्ही मंदिरांच्या बांधकामात सहभागी झालो आणि मला या उपक्रमांची आवड निर्माण झाली. मग मंदिराच्या कुंभ अभिषेकादरम्यान श्री स्वामीजींनी माझ्या पत्नीला सांगितले, “तू का घाबरतोस? मी इथे आहे, मी तुझी काळजी घेण्यासाठी इथे आहे आणि तू तुझ्या नातवंडांबरोबरही राहेशील, ह्याला घाबरू नकोस.’ मग मी श्री स्वामीजींना काय होत होते ते सांगितलं -, प्रत्येक वेळी रक्ताचे जुळवणे दात्यासाठी संवेदनशील होत चालले आहे, मग काय करायला हवं. ते म्हणाले , “तू पुन्हा एकदा मद्रासमधील अपोलो हॉस्पिटलला रक्त पाठव.” त्यावेळी हैदराबाद किंवा मद्रास अपोलो येथे किडनी प्रत्यारोपण करण्यात येत असे. म्हणून आम्ही पुन्हा एकदा मद्रास अपोलोला रक्त पाठवलं.
त्या काळात माझ्या पत्नीला एक स्वप्न पडलं. त्यात श्री स्वामीजी म्हणाले, “मी तुझ्यासाठी दाता पाठवला आहे.” दरम्यान, मद्रासमध्ये आम्हाला एक स्त्री सापडली, जिचं रक्त आणि पेशी माझ्या पत्नीशी जुळत होत्या. यापूर्वी आम्ही पेशींचे इतके जुळणे कधीच पाहिले नव्हते, ही पहिलीच वेळ होती. जेव्हा पेशी जुळत होत्या तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं आणि हा काही चमत्कार आहे असं त्यांना वाटलं. त्या दिवसापासून माझी पत्नी शक्य असेल तेव्हा श्री स्वामीजींचे दर्शन घेत होती आणि जरी तिचे डायलिसिस चालू होते तरी ती सामान्य जीवन जगत होती. तथापि, प्रत्यारोपणापूर्वीच श्री स्वामीजींच्या दर्शनामुळे तिच्यात सुधारणा दिसून येत होत्या. २२ डिसेंबर १९८९ रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
प्रत्यारोपणानंतर काही वर्षांनी माझ्या दोन मुलांचं लग्न झालं. १९९३ साली हैदराबादला आल्यावर त्यांनी तिला आठवण करून दिली की, “मी तुला सांगितलं होतं की तू तुझ्या नातवंडांबरोबर खेळशील आणि तू विसरलीस.” नंतर एका नातवाचा जन्म झाला आणि परिस्थिती तशीच चालू राहिली.
काही वर्षांनंतर माझ्या पत्नीला न्यूमोनिया झाला आणि तिला अपोलोमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी श्री स्वामीजींचे अनंतपूरचे भक्त तिरुपला रेड्डी मलेशिया भेटीसाठी श्री स्वामीजींसोबत जात होते. तिथून त्यांनी मला फक्त सहजच चौकशीसाठी फोन केला, मग मी त्यांना सांगितलं की, माझी पत्नी गंभीर अवस्थेत आहे आणि त्यांनी श्री स्वामीजींना कळवावं. श्री स्वामीजी श्री चक्र पूजा करत होते. हे ऐकल्यावर श्री स्वामीजी त्यांच्या खोलीत गेले, थोडा वेळ बसले आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा तिरुपला रेड्डींना म्हणाले, “त्यांना सांगा त्रास करून घेऊ नका किंवा काळजी करू नका; सगळं ठीक होईल आणि ती बरी होईल.’
वीस वर्षांपासून श्री स्वामीजी तिला आयुष्य वाढवून देत आहेत. श्री स्वामीजींसारख्या महान संतांच्या कृपेनेच हे घडू शकते. त्यांच्या कृपेने ती वाचली आहे. ती इतकी निरोगी झाली की आम्ही परदेशात सुद्धा जाऊ शकलो. सगळ्या मुलांची लग्न झाली आणि सगळं व्यवस्थित चालले आहे. कोणत्याही डॉक्टरांनासुद्धा हा चमत्कार समजून घेणे खूप अवघड आहे कारण पॅनल रीऍक्टिव्हिटी असलेल्या रुग्णाला प्रत्यारोपणासाठी मॅच मिळवणे अत्यंत अशक्य आहे. त्यांनी निदान केले होते की तिला आयुष्यभर डायलिसिसवर जगावे लागेल. ३०पेक्षा अधिक लोकांची तपासणी केल्यानंतर काही चमत्कार घडला आणि शेवटी डॉक्टरांनी कबूल केले की अशी काही शक्ती आहे ज्यामुळे तिला जिवंत राहण्यास मदत झाली आहे. वैद्यकीय शास्त्र आता आहे तितके १९८९ साली प्रगत झालेले नव्हते. त्या काळात प्रत्यारोपण झाले असले तरी श्री स्वामीजींच्या कृपेनेच हे शक्य झाले. प्रत्येक भक्तावर श्री स्वामीजींची कृपा आहे; दररोज आम्ही त्यांची प्रार्थना करतो आणि ते आम्हाला खूप आनंदी ठेवतात.
आमच्या आयुष्यात माझ्या मुलाबाबत घडलेला श्री स्वामीजींचा आणखी एक अनुभव आहे. माझ्या पत्नीची तब्येत चांगली नसताना माझ्या मुलाची एस एस सीची परीक्षा होती , पण तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नव्हता; तो अभ्यासात चांगला नव्हता. तो घर सोडून गेला आणि त्यावेळी तो परीक्षेला बसला नाही. शेवटी आम्ही त्याला शोधून त्याला घरी आणलं. एके दिवशी श्री स्वामीजी त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी एक पाटी आणि पेन्सिल घेतली आणि त्याला पाटीवरच लिहायला लावलं. या स्वप्नानंतर माझ्या मुलाचे जीवन इतके बदलले की बी कॉम च्या पदवी परीक्षेत त्याने पहिला वर्ग मिळविला. आता तो चार्टर्ड अकाउंटंट, लॉ ग्रॅज्युएट आणि कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे. जो मुलगा अभ्यास करत नव्हता, परीक्षा देत नव्हता, श्री स्वामीजींच्या कृपेने त्याच्यावर इतका चांगला परिणाम घडवून आणला. श्री स्वामीजींच्या सर्व चमत्कारांचे वर्णन आपण करू शकत नाही कारण ती अगणित आहेत. ते प्रत्येक भक्ताला वरदान देतात. त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पण करणे जरुरी आहे. एकदा का तुम्ही तसं केलंत की तुम्हाला आपोआप त्यांची कृपा प्राप्त होते. . एकदा माझी बायको म्हणाली एके दिवशी एक संत आला होता आणि तिला उद्देशून म्हणाला, “तू फक्त गुरूमुळेच जिवंत आहेस.” दुस-या एका दिवशी आम्ही अनघा व्रतम करत असताना एका सहभक्ताने मला सांगितलं की, जिथे अनघा व्रतम होत असेल तिथे श्री स्वामीजी त्या दिवशी कोणत्याही स्वरूपात त्या ठिकाणी भेट देतात . नंतर कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भक्त आणि निमंत्रित निघून गेले तेव्हा आम्ही गॅरेजमध्ये बसून त्यांच्या लीलांबद्दल चर्चा करत होतो. आमच्या घराजवळ सहसा आम्हाला गायी दिसत नाहीत, पण त्या दिवशी कशाम्बर रंगाची एक गाय आमच्या घराच्या छोट्याशा गेटमधून आली आणि ती जिन्याशी उभी राहिली. मला वाटलं, कदाचित श्री स्वामीजी असतील, माझ्या मनात विचार आला की, जर श्री स्वामीजीं गायीच्या रूपात प्रकट झाले असतील तर ती गाय माझ्या घरात यायला पाहिजे, ज्या क्षणी मी विचार करत होतो त्या क्षणी गाय घरात आली. .हे असे दर्शविते कि की तुम्ही जिथे असाल तिथे श्री स्वामीजी नेहमीच तुमच्यासोबत असतात आणि अशी ही श्रद्धा सतत आमच्या मनात असते. नेहमीच तुम्हाला संरक्षण दिले जाते फक्त एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे तुम्ही श्री स्वामीजींचे भक्त असले पाहिजे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचो तेव्हा ते माझ्या वसंताची चौकशी करायचे , “अम्मा कशी आहे?” ते इतक्या प्रेमाने,करुणेने विचारतात कि अगदी दगडाचे हृदय असले तरी ते विरघळून जाईल.
एकदा मी आणि माझा मुलगा म्हैसूर आश्रमात होतो आणि वसंता घरीच होती . काही काम करत असताना अचानक ती स्वयंपाकघरात खूप जोरात पडली. आश्रमात श्री स्वामीजी संगीत कॉन्सर्ट मध्ये होते आणि कार्यक्रम चालू असतं अचानक ते उठले. मी माझ्या मुलाला म्हणालो की श्री स्वामीजी सहसा असे मधेच उठत नाहीत; कदाचित एखाद्या भक्ताच्या बाबतीत काहीतरी घडलं असेल. पाच मिनिटांतच मला फोन आला की माझ्या पत्नीला गंभीर रित्या पडली , पण श्री स्वामीजींच्या कृपेनं तिला काहीही झालं नाही. श्री स्वामीजी इतक्या अचानक का उठले हे माझ्या लक्षात आलं. ज्या क्षणी भक्ताच्या बाबतीत काहीही घडतं त्या क्षणी ते ताबडतोब त्यांची काळजी ; म्हणूनच ते अचानक म्युझिक कॉन्सर्टमधून उठले असं मला वाटलं. त्यांच्या कृपेने