SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 23-11-2014
जोगी सिद्धया - म्हैसूर

“हे दत्ताचं निवासस्थान आहे, तुम्ही लोक दत्ताला तुमच्या हृदयात निवास का करू देत नाही?”

पस्तीस वर्षांहून अधिक काळ सरकारी सेवेत काम केले, त्यापैकी दहा वर्ष नुझिविडू मध्ये घालविली - मी निवृत्त झालो आणि १९९७ पासून मी म्हैसूरमध्ये राहत आहे. माझा मोठा मुलगा डॉ. वंशी कृष्ण घनापाठी म्हैसूर आश्रमात वैदिक विद्वान आहे. माझा दुसरा मुलगा चंद्रा अमेरिकेतील नेब्रास्का येथील ओमाहा येथे राहतो. त्याचे लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगा आहे.

१९७० साली होमिओपथीचे डॉक्टर डॉ. एन.व्ही. राजाराव यांनी आम्हाला विजयवाडाला भेट देणाऱ्या एका योगीची माहिती दिली. मी माझ्या वडिलांबरोबर आणि इतर दोन जणांबरोबर तिथे गेलो. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा योगी अर्धवट उजेड असलेल्या खोलीत होम करताना दिसले. नंतर आम्हाला कळलं की त्यांना श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजी म्हणतात. त्या काळात विजयवाडामध्ये आश्रम नव्हता, त्यामुळे एका भक्ताच्या घरी त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. नंतर मी त्याच भागात भजनाच्या कार्यक्रमासाठी गेलो.

यानंतर दहा वर्षे माझा त्यांच्याशी संपर्क नव्हता. त्यानंतर ते नुझीविडू जवळ एका भक्ताच्या आंब्याच्या बागेत तळ ठोकून होते. मी त्यांना भेटायला गेलो आणि ते तिथे होम करत होते. होमानंतर माझी त्यांच्याबरोबर मुलाखत झाली आणि मी त्यांना विचारलं, “आपण फक्त शहराबाहेर असलेल्या या बागेला का भेट देता ? शहरात राहणाऱ्या लोकांचं काय?” ते म्हणाले , “त्याची चिंता करू नकोस, तसे लवकरच घडेल.” मी त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते अतिशय निर्विकार होते आणि त्यांनी माझ्या विनंतीची दखल घेतली नाही.

माझ्या नुझिवडू ऑफिसमध्ये माझं काम पूर्ण झाल्यानंतर चाळीस दिवस मी विजयवाडा येथे रोज संध्याकाळी त्यांना भेटायला जात होतो. नुझिविडुत राहणाऱ्या लोकांबरोबर मी आणि माझ्या पत्नीने मिळून शेकडो अनघा व्रत पूजा केली, फक्त एक गुरु कटाक्षाची इच्छा ठेवून हे करत होतो. त्यानंतर १९८७ साली श्री स्वामीजी नुझिविडुला आले आणि तेथील लोकांवर त्यांचा खूप प्रभाव पडला. जानेवारी महिन्यात झालेल्या या भेटीदरम्यान कृषी विज्ञानी अकुला दुर्वासराव आपल्या मानसिकदृष्ट्या अपंग मुलाला घेऊन श्री स्वामीजींच्या भेटीस आले. श्री स्वामीजी म्हणाले की, मी जादूने कोणालाही बरे करत नाही, त्यामुळे त्यांनी त्या मुलाला मदत केली नाही, पण दुर्वासरावांच्या मनात श्री स्वामीजींच्याप्रती खोलवर भक्ती विकसित झाली आणि नुझिविडु आश्रमाच्या बांधकामासाठी त्यांनी त्यांची जागा दान केली.

त्या वर्षाच्या उत्तरार्धात, सप्टेंबर महिन्यात श्री स्वामीजींनी पुन्हा नुझिविडुला भेट दिली. जागा ताब्यात घेताना श्री स्वामीजींनी दुर्वासरावांना सांगितले की, त्यांनी मनात कोणतीही इच्छा न बाळगता हे समर्पण केले पाहिजे .हा व्यवहार सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे या भक्ताने श्री स्वामीजींना दिली. हळूहळू आश्रमाचा विकास झाला आणि तिथे देव देव अवतार दत्त मंदिर बांधण्यात आले आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. कालांतराने त्या मुलाचा मृत्यू झाला पण आईवडील दुःखाने कोलमडून गेले नाहीत. ते मानसिकदृष्ट्या विकसित झाले होते आणि जे काही घडले आहे ते त्यांच्या भल्यासाठी आहे असा त्यांचा विश्वास होता.

१९९३ साली श्री स्वामीजींनी आश्रमाच्या विश्वस्तांना सांगितले की, या माणसाकडून मला काही काम करून घ्यायचे होते आणि ते पूर्ण झाले आहे; आता त्याला या ठिकाणाहून निघायचे आहे. त्यानंतर काही काळातच अर्ज न करता माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, आपल्याकडून श्री स्वामीजींचे काम पूर्ण करून घेण्यात श्री स्वामीजींनाच त्यात रस असायला हवा. नुझिविडु आश्रमात माझे योगदान देण्यासाठी त्यांनी मला ज्ञान आणि शक्ती दिली.

१९८५ साली शिवरात्रीच्या काळात आम्ही आमचा पहिला मुलगा वंशी कृष्णाला श्री स्वामीजींच्या सेवेत अर्पण करण्यासाठी घेऊन गेलो. श्री स्वामीजींनी आम्हाला म्हैसूर आश्रमात येऊन अर्पण करण्याची सूचना दिली आणि आम्ही त्यांच्या सल्ल्याचे पालन केले. हळूहळू आम्ही म्हैसूर आश्रमातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहू लागलो. श्री स्वामीजी आम्हाला गंमतीने विचारायचे की, आमच्या भेटीचा उद्देश काय आहे? आमच्या मुलाला भेटणे कि श्री स्वामीजींना भेटणे? तो आता आश्रम रहिवाशांपैकी एकआहे. श्री स्वामीजींनी दूरदर्शीपणे आम्हाला वैराग्य विकसित करण्यास सक्षम केले. त्यांच्या शिकवणी सर्वात महत्त्वाच्या आहेत. आता तो मुलगा आश्रमात राहतोय आणि श्री गणपती सच्चिदानंद स्वामीजींचे ज्ञान समजून घेण्यात इतरांना तो मदत करत आहे.

माझा दुसरा मुलगा चंद्रशेखर हासुद्धा श्री स्वामीजींचा कट्टर भक्त आहे. एकदा तो म्हैसूरमध्ये श्री स्वामीजींकडे गेला आणि तिथे राहून सदगुरूंची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली, पण श्री स्वामीजींनी त्यास शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत पाठवलं. नंतर त्याला अमेरिकेला पाठवण्यात आलं, पण श्री स्वामीजींनी त्यांना सांगितलं, “मी तुला जेव्हा सांगीन तेव्हा तुला परत यावं लागेल.’ आता तो अमेरिकेत व्यवस्थित स्थायिक झाला आहे आणि श्री स्वामीजींना त्याच्यासाठी एक चांगली जोडीदार शोधली आणि त्यांना एका मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. माझी आई १९८३ साली वारली. हळूहळू माझे वडील श्री स्वामीजींचे भक्त बनले, त्यांचे १९९६ साली निधन झाले. पिढ्यान् पिढ्या आम्ही श्री स्वामीजींचे भक्त आहोत. माझे आईवडील, मी, माझी मुलं आणि आता माझा नातू, आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत. श्री स्वामीजींना समर्पित असे शेकडो परिवार आहेत.

माझ्या ओळखीच्या अनेक भक्तांनी आपल्या वाईट सवयी सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. आध्यात्मिक विकास शक्य आहे आणि त्याचा निर्णय केवळ श्री स्वामीजींचे घेऊ शकतात. आपण त्याचे मूल्यमापन करू शकत नाही. जेव्हा आपण आपल्या वाईट सवयी सोडून प्रामाणिकपणे त्यांचे अनुसरण करतो तेव्हाच ते आपल्याला ती जागृतता देऊ शकतात. पीठमला दिलेलय देणगीचे दोन उद्देश असतात. त्याने केवळ पापच धुतली जात नाहीत तर आपण चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त होतो. हळूहळू आपण कमी पापी बनतो आणि परमेश्वरावरील भक्ती विकसित करून समाजासाठी चांगल्या गोष्टी करू लागतो. अशा प्रकारे अनेक लोक चांगली व्यक्ती बनताना मी पाहिले आहे.

अनेक भक्तांना आणि कुटुंबीयांना श्री स्वामीजींच्या संगीतातुन आशीर्वाद मिळाला आहे आणि आम्ही असेच एक कुटुंब आहोत. त्यांचे संगीत अद्भुत आहे. विजयवाडाच्या दुस-या भेटीदरम्यान मी श्री स्वामीजींना ‘विठ्ठल विठ्ठला ‘हे गाताना ऐकले. त्यांचा आवाज घुमत होता आणि तो अतिशय उत्कट होता; मी त्यात देवाबद्दलची तळमळ पाहिली. मी इतक्या संगीतकारांना ऐकलं होतं, पण त्यांच्या आवाजात ती योगशक्ती नव्हती. श्री स्वामीजी केवळ संगीतकार नाहीत, तर त्यांनी आपल्या संगीतात योगाचे एकत्रीकरण केले आहे . अशा प्रकारे ते प्रत्येक जीवीत शिरकाव करू शकतात. ते नाद ब्रह्म आहेत. १९८५ साली मी आणि माझी पत्नी श्री स्वामीजीं शिकवत असलेल्या क्रिया योग वर्गाला उपस्थित राहिलो. त्यांनी आम्हाला क्रिया योग शिकवण्यात कित्येक तास घालवले. शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्याची ही एक अद्भुत प्रक्रिया आहे.

श्री स्वामीजी म्हणतात की, ‘केवळ आश्रमातच राहूनच नाही किंवा श्री स्वामीजींसाठी शारीरिक सेवा करून नाही, तर बाहेर राहून आपण ही सेवा करू शकता. काही लोकांना आश्रम रहिवाशांचा हेवा वाटू शकतो, पण आपण आपल्या मनाचा समतोल साधला पाहिजे, त्या अंतराने काही फरक पडत नाही. मानसिकदृष्ट्या आपण शक्य तितक्या सर्व प्रकारे त्यांची सेवा केली पाहिजे. मगच आध्यात्मिक विकास शक्य आहे.

मला असं वाटतं की प्रत्येकाचे आयुष्य हा एक चमत्कार आहे. पृथ्वीवर जन्माला येणे, श्री स्वामीजींच्या समकालीन असणे, त्यांना ओळखणे आणि त्यांचे दर्शन घेणे हा खरोखरच एक चमत्कार आहे. या डोळ्यांनी आपण प्रत्यक्ष परमेश्वराला पाहू शकतो. हे आश्चर्य नाही का? जेव्हा मी श्री स्वामीजींची कोणतीही सेवा करायचो तेव्हा मला असे वाटायचे की , तेच मला हि सेवा करायला लावतात. मी कधीतरी परदेशी भक्तांसाठी त्यांच्या प्रवचनाचा अनुवाद करायचो.

एकदा दत्ताच्या मंदिराकडे बोट दाखवत श्री स्वामीजी म्हणाले, “हे दत्ताचे घर आहे, तुम्ही लोक तुमचे हृदय दत्ताचे निवास स्थान का होऊ देत नाही?.

जय गुरू दत्ता.

Tags: