SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 23-12-2020
०१ अगस्त्य सैक्रीट

तुमच्या योजना आणि कार्यासाठी मी जे काही करणे तुम्हाला अपेक्षित आहे, ते सर्व मी करेन. मला हे माहिती आहे की तुम्ही फक्त मलाच नाही तर इतर अनेक लोकांच्या मदतीसाठी आला आहात. कदाचित आपण मला आपल्या कार्याचे साधन बनवाल जेणेकरून इतर लोकांनादेखील तुमची कृपा आणि प्रेम मिळेल. त्याचबरोबर तुमचे कार्यदेखील समजेल आणि ते आत्म बोधाच्या अवस्थेपर्यंत पोहोचतील. मी वचन देतो की जर मी काम करणे उचित असेल तर मी निश्चितच ते करीन.” मग मला पुन्हा झोप लागली आणि मला एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. माझ्या स्वप्नात श्री स्वामीजी आले आणि त्यांनी सुरी किंवा रुग्णालयामध्ये वापरले जाणारे तत्सम कोठलेही साहित्य, हत्यार न वापरता, स्वत:च्या हातांनी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. मला एकदम जाग आली, माझ्या शरीरातून एक शिरशिरी येऊन गेल्याचे मला जाणवले. स्वप्नात मला लाभलेल्या स्वामीजींच्या उपस्थितीमुळे मी अंतर्बाह्य आनंदी झालो होतो. मला त्यांचे अस्तित्व जाणवू शकत होते आणि मला निश्चित हे माहिती होते की ते खोलीत होते. त्यांच्या उपस्थितीने खोलीतले वातावरण इतके कमालीचे भारून गेले होते की हवेतील गंध हा रुग्णालयाचा न राहता संपूर्ण खोली ही दिव्य विभूतीच्या सुगंधाने भरून गेली होती. मी ती विभूतीदेखील पाहू शकत होतो. त्यावेळी मला वाटत होते की हा सर्व एक दृष्टीभ्रम आहे. तेवढ्यात एक नर्स माझ्या खोलीत आली आणि खोलीतील सुगंध आणि हवेत जाणवणारी धूळ बघून विस्मयचकित झाली. तिने मला याबद्दल विचारले. मी तिला समजावून सांगितले की मला अत्यंत प्रिय असणाऱ्या माझ्या सद्गुरूंनी मला आशीर्वाद दिला आहे आणि मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. त्यामुळे उद्याच मी येथून जात आहे. मी हे बोलत असताना माझ्या खोलीमध्ये पसरलेला गंध इतका सुवासिक होता की मी जे बोलतोय ते सत्य असावे याबद्दल तिची खात्री होऊ लागली होती. तसे तिने शब्दांत मान्यदेखील केले. दुसऱ्या दिवशी मला घरी घेऊन जाण्यासाठी मी माझ्या मित्राला बोलावून घेतले. तो मला माझ्या घरी घेऊन आला. मी माझ्या पलंगावर बसून जपजाप्य तसेच ध्यानधारणा करणार होतो. मला नैराश्य येऊ नये ह्याकरिता मी काहीतरी केले पाहिजे हे मला जाणवत होते. सतत भगवंताचा नामजप करणे माझ्या मनातील स्पंदने उच्च पातळीवर नेऊन माझ्यातील नकारात्मक विचारांना बाहेर काढण्याचा हा उत्तम मार्ग आहे असा मला विश्वास होता. मी उपवास करत होतो. अन्न न खाता मी फक्त पाणी पीत होतो. सर्वसामान्यपणे अशा प्रकारच्या उपासाने कोणताही माणूस कमकुवत होत जातो आणि मी तर आजाराने ग्रासलो असल्याने मुळातच कमकुवत झालो होतो. पण तरीदेखील काही दिवसानंतर हळूहळू मी कमी गतीमध्ये धावू लागलो. असे करताना मला अगदी सुरुवातीला अशक्तपणा जाणवला परंतु काही क्षणांमध्येच माझ्या शरीरात खूप जास्त ऊर्जा मला जाणवायला लागली. नंतर काही वेळाने मला खूप हलके वाटू लागले आणि एक वेळ तर अशी आली की मला इतके हलके वाटू लागले की मला या जड शरीराची जाणीवदेखील राहिली नव्हती. मी माझे देहभान पूर्णपणे विसरलो होतो. मी स्वत: कुठलेही प्रयत्न न करता माझे शरीर धावतेय अशी अनुभूती मी घेत होतो. हा निश्चितच श्री स्वामीजींचा आशीर्वाद असला पाहिजे असे मला वाटले. आणि मी मनातल्या मनात त्यांना प्रार्थना करण्यास सुरुवात केली. माझे पडणारे प्रत्येक पाऊल म्हणजे त्यांच्या चरणकमलांना केलेला प्रणाम आहे असे मी मानत होतो. त्यायोगे माझ्या सततच्या धावण्याने, माझ्याकडून श्री स्वामीजींना सतत प्रणाम केला जात होता. त्यामुळे आता मला अधिकाधिक हलके वाटू लागले होते आणि मी कमालीचा आनंदी झालो होतो. हा प्रकार मी सुमारे दहा दिवस सुरू ठेवला आणि दिवसागणिक मला अधिकाधिक ऊर्जा मिळत असल्याचे जाणवत होते. एकदा श्री स्वामीजी अमेरिकेत जाण्यासाठी निघाले असता हॉलंडमध्ये एका रात्री मुक्कामासाठी थांबले होते. मी त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळे मी आत शिरलो. मला स्वामीजींचे खूप सुंदर दर्शन झाले. स्वामीजी त्यांच्या पलंगावर फक्त लुंगी नेसून उभे होते. मला असे वाटले की मी त्याच्या एकांताचा भंग केला आहे. परंतु ते म्हणाले, “अगस्त्य, तू नंतर येऊन मला भेट.” नंतर मी तिथे गेलो आणि माझ्याशी बोलण्यासाठी त्यांनी मला बोलावले. ‘‘मी तुला काय सहाय्य करू शकतो?’’ असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना माझ्या कर्करोगाबद्दल सांगितले. मला उपचारार्थ केमोथेरपी करायची आहे आणि मला आणखी काही मोठे अनुभव आले होते त्याबद्दल मी त्यांना सांगितले. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि ते मला म्हटले की, ‘‘तुला कर्करोग नाही, तो कर्करोग विसरून जा.’’ हे ऐकून मी त्यांचे आभार मानले आणि त्यांना म्हटले की, ‘‘होय, मी तो कॅन्सर विसरून जाईन.’’ ‘मला कर्करोग झालाच नाही’, अशा भ्रामक, अवास्तव कल्पनांमध्ये मी वावरतो आहे, असे माझ्या मित्रमंडळींना आणि कुटुंबीयांना वाटत होते. माझा एक मित्र, जो चित्रपट निर्माता होता, त्याचा विविध क्षेत्रांमधल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींशी परिचय होता. त्याचा माझ्या दृढ निश्र्चयावर विश्र्वास होता आणि मला आलेले अनुभवदेखील त्याला मान्य होते. परंतु तरीदेखील कॅलिफोर्निया यू एस ए येथील एक सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ असलेल्या त्याच्या मित्राला मी भेटावे अशी त्याची इच्छा होती. त्याला आणि माझ्या सर्व कुटुंबीयांच्या मनात माझ्या कर्करोगाबद्दल जी भीती होती त्यातून त्यांना मानसिक आधार मिळावा यासाठी मी त्या डॉक्टरांना भेटावे असा त्याने आग्रह केला. ‘यू सी एल ए’ (UCLA )मध्ये भेट घ्यायचे ठरले होते. मी आश्रमातच राहून, तेथूनच माझ्या चाचण्यांसाठी यूसीएलएमध्ये जाण्याची योजना बनविली होती. त्या आश्रमातील वातावरणात एक अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाली होती. एका कार्यकमाच्या निमित्ताने तेथे संपूर्ण वेळ ‘ओम नम: शिवाय’ हा जप सुरू होता आणि तो सात दिवस अव्याहतपणे सुरू होता. मी त्या नामस्मरणातदेखील सहभागी झालो आणि माझ्या तज्ज्ञांसोबतच्या नियोजित भेटीदेखील घेतल्या. पहिल्या दिवशी संध्याकाळी मला माझ्या डॉक्टरांची भेट घेण्याची इच्छा नव्हती. मला असे वाटले की आता मी जर बरा झालो आहे आणि माझ्या शरीरावर दैवी कृपा झाली असेल तर मला खरेतर तेथे जाण्याची गरज नाही, परंतु माझ्या तब्येतीच्या बाबतीत काळजीत असलेल्या माझ्या कुटुंबासाठी आणि मित्रांच्या समाधानासाठी मी तिथे गेलो. मी सर्व तपासण्या करून घेतल्या. काही दिवसांनी डॉक्टरांनी आम्हाला बोलावून सांगितले की त्यांना माझ्या शरीरात कर्करोगाचा थोडादेखील अंश सापडला नाही. ते खूपच चकित झाले कारण मी त्यांना माझ्या पूर्वीच्या डॉक्टरांकडून आलेला रिपोर्ट दिला होता. ते दोघे एकत्र डॉक्टरी शिकले होते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. माझ्या शरीरात कर्करोगाचा अंशही न सापडल्याने त्यांना खूप आश्चर्य वाटत होते. ते म्हणाले की, “आम्ही डॉक्टर लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. पण ईश्र्वर हाच सर्वोत्तम वैद्य आहे. तो त्याच्या कृपेने आपल्याला बरे करत असतो. आपल्याला बरे करणारा ईश्र्वरच आहे, आम्ही डॉक्टर एक माध्यम आहोत. कधीकधी गोष्टी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित घडतात आणि कधीकधी मात्र तशा घडत नाहीत, त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी आमच्या हातात नसतात. लोकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही तंत्रज्ञान आणि निरनिराळ्या उपचारपद्धती विकसित करत असतो, संशोधन करत असतो परंतु अंतिमत: देवच निर्णय घेत असतो. तुमच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ईश्र्वराने त्याचा वरदहस्त तुमच्यावर ठेवला आहे या तिळमात्र शंका नाही. तुमचे खूप अभिनंदन. तुम्हाला आता परत आमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला केमोथेरपीची देखील आवश्यकता नाही. तुमचा रिपोर्ट बघता आता तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. तुम्ही तुमचे जीवन अगदी आनंदात व्यतीत करू शकता. “मी त्यांचे आभार मानले आणि तेथून निघालो. त्यानंतर मी अमेरिकेला जायला निघालो कारण श्री स्वामीजी त्यावेळी अमेरिकेच्या प्रवासात होते. पिट्सबर्ग येथे एक खडक तयार झाला आहे आणि ते तिथे भेट देणार आहेत असे मी ऐकले आणि मला त्यांना भेटायचेच होते. त्यावेळी मॅसॅच्युसेट्स येथील ‘सेंटर ऑफ लाईट’ येथे क्रिया योगाचा वर्गदेखील होता. मला तिथे जाण्याची इच्छा होती. मला आता माझ्या आयुष्यात यापुढे अंधार नको होता; मला प्रकाशाकडे जायचे होते. क्रिया योगाच्या वर्गात आल्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि मला श्री स्वामीजींना भेटून माझी संपूर्ण कहाणी सांगायची होती. तथापि, मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक कटाक्षदेखील टाकला नाही. मला खूप धक्का बसला. माझे त्यांच्यावर खूप प्रेम होते आणि ते मात्र माझ्याकडे बघतही नव्हते. मी प्रचंड निराश झालो, परंतु मला वाटले की कदाचित ते क्रिया योग वर्गाच्या कामकाजामध्ये खूप व्यस्त असतील. एका वसतिगृहात आमच्या सर्वांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. पण मला मात्र एकांत हवा होता. म्हणून मी माझी गादी घेऊन कंपाऊंडच्या आतील शेतामधील एका धान्याच्या कोठारात मी गेलो. माझ्या अंथरुणावर बसून मी माझ्या जीवनात नुकत्याच घडलेल्या घडामोडींचा विचार करत राहिलो. श्री स्वामीजी, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत श्रद्धा आणि प्रेम होते, त्यांनी मला साधी ओळखसुद्धा दाखवली नाही याचा मला प्रचंड त्रास होत होता. मी इतका निराश झालो होतो की मी ठरवले की दुसऱ्या दिवशी जर त्यांनी माझ्याकडे पाहिले नाही तर मी घरी निघून जाईन. दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये जात असताना व्हरांड्यामध्ये श्री स्वामीजी उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भूत हास्य होते. त्यांनी आपले हात माझ्यासमोर उघडले आणि म्हणाले, “अगस्त्य, ये. आता तुझे सर्व भोग संपले आहेत.” मला खूप आनंद झाला. माझ्या गुरूंनी माझी दखल घेतली होती आणि त्यामुळे आता मला घरी निघून जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी आपल्या हातांची काही हालचाल केली आणि रत्नांप्रमाणे दिसणारे काही सुंदरसे खडे त्यांच्या हातामध्ये दिसले. त्यांनी मला त्यातील एक खडा निवडण्यास सांगितले; मी श्री चक्राच्या आकारातील एक नीलम निवडला. त्यानंतर मी माझ्या वर्गासाठी सभागृहाकडे गेलो आणि श्री स्वामीजी देखील वर्ग सुरू करण्यासाठी पुढे गेले. माझा क्रिया योग वर्ग पूर्ण झाल्यानंतर मी काय करावे हे मला समजत नव्हते. श्री स्वामीजी काही खासगी कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे मी घरी निघण्याची तयारी करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात अचानकच एक स्वीस माणूस, ज्याने सुशीला नावाच्या अमेरिकन स्त्रीशी लग्न केले होते, त्याने मला पेनसिल्व्हानिया येथील त्यांच्या घरी बोलावले जेथे श्री स्वामीजी भेट देणार होते. मी ओल्डस्मोबाईल चालवत होतो, जी मी कोणाकडून काही दिवसांसाठी घेतली होती, त्या गाडीला बरेच पेट्रोल लागत होते. श्री स्वामीजींच्या मागोमाग पेनसिल्व्हेनिया पर्यंत जाताना मी गाडीमध्ये पेट्रोल भरण्यास विसरलो आणि अचानक पेट्रोलमीटर पेट्रोलची टाकी रिकामी झाल्याचे दर्शवू लागला. परंतु तेथे पेट्रोल भरण्यासाठी कोणतेही पेट्रोल स्टेशन नव्हते. यामुळे मी प्रचंड धास्तावलो होतो. पण सद्गुरूंच्या कृपेने गाडी पेट्रोल भरल्याशिवायच पुढे जात राहिली. या भेटीनंतर मला त्यांनी त्यांच्या पुढच्या ठिकाणी बोलावले याचा मला खूप आनंद झाला. त्या रात्री झोपेत असताना पहाटेच्या वेळी, मला एक स्वप्न पडले. श्री स्वामीजी आले, त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले ‘‘माझ्याबरोबर चल’’. आम्ही चालायला सुरुवात केली आणि चालता चालता आम्ही पृथ्वी सोडली. आम्ही शब्दशः ढगांवरून चालत होतो. त्यांनी माझा हात धरला होता आणि त्यामुळे मला अजिबात भीती वाटत नव्हती. मग ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले, “अगस्त्य, मी तुला पूर्णत्वापर्यंत नेईन.’’ माझ्या आयुष्यातले हे सर्वात सुंदर स्वप्न होते. मी उठलो. खोलीमध्ये सगळीकडे अंधार होता, मी तसाच हॉलमध्ये गेलो. एका कोपऱ्यात मला थोडासा प्रकाश दिसला. श्री स्वामीजींना तेथे ध्यान करत असलेले मी पाहिले. त्यांनी हळूवारपणे डोळे उघडले. मी गुडघ्यावर बसून त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. ते माझ्याकडे पाहून हसले. मी त्यांना विचारले की तुम्ही माझ्या स्वप्नात मला जे सांगितले ते सर्व खरे आहे काय? त्यावर ते म्हणाले, “हो! हे सत्य आहे.” मी तेथे शांतपणे बसलो आणि श्री स्वामीजींबरोबर ध्यान करू लागलो. त्या क्षणी मला जाणवले की ते मला कधीही सोडणार नाहीत. ते मला मोक्षापर्यंत, जे आत्म्याचे गंतव्य स्थान आहे, तिथपर्यंत अगदी निश्चित घेऊन जाणार आहेत. या ऐहिक जगातील खरा रोग हाच आहे की आपण आपल्या शरीरालाच आपली खरी ओळख मानतो. सभोवतालची माया, मोह, भ्रम हे सारे सत्य आहे असे मानतो. आपण कोण आहोत याचा, आपल्या आत्म्याचा आपल्याला विसर पडला जातो आणि त्यामुळेच आपल्याला विलग झाल्यासारखे वाटते.

Tags: