SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25 Dec 2020
वानर गीता ०३: ध्यान श्लोक

वानर गीता स्तोत्रात, अगस्त्य महर्षी हे ऋषि आहेत, जगती हा छंद आहे; हनुमान देवता आहेत ‘मारुतात्मज:’ हे बीजाक्षर आहे; ‘अंजना सुनू:’ हि शक्ती (ऊर्जा) आहे; ‘वायू पुत्र’ म्हणजे कीलकं आहे. हे वानर स्तोत्र भगवान हनुमंताचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी पठण करत आहे असा संकल्प केला पाहिजे. संतांनी रचलेली सगळी स्तोत्र म्हणजे आपल्या मनोरंजनासाठी, झाडाच्या सावलीखाली आरामात बसून पक्षांचा किलबिलाट ऐकत,आकाशातून पाण्याचे थेंब पडताना, सूर्योदय पाहत केलेली सर्वसाधारण काव्य नाहीत . हि सर्व स्तोत्र तपोबल, ज्ञानदृष्टीने ऋषी, देवता, महात्म्यांच्या मुखातून गंगेच्या प्रवाहाप्रमाणे पूर्ण शक्तीने बाहेर पडले लया अमृतकलाशां समान आहेत. हि काव्य नसून वेदवाक्य, महामंत्र आहेत असे स्पष्टपणे सांगता येते. अशा सर्व रचना जगाच्या कल्याणासाठी असतात; जन्ममृत्यूच्या चक्रात सापडलेल्या या संसार सागरात बुडणाऱ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी, संकटात असलेल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी या रचना आहेत. त्या जीवन मुक्ती देतात. या कारणास्तव, जेव्हा जेव्हा एखादे स्तोत्र वाचले जाते, तेव्हा त्याचे रचनाकार (ऋषि), तिचे अधिष्ठात्री देवता त्याची शक्ती (ऊर्जा) इत्यादी सर्व काही आठवणीने पठण केले पाहिजे. अशाप्रकारे पठण केल्याने लवकर फलप्राप्ती होते. तसेच रचनाकार आणि इतरांबद्दलची आपली कृतज्ञता प्रतिबिंबित होते. म्हणून अशा पठणात कोणतीही चूक होऊ देऊ नये.

या वानर गीतेमध्ये, अगस्त्य महर्षी यांनी ध्यान श्लोक तयार केले आहेत. या ध्यान श्लोकाच्या योग्य आकलनानंतर आपल्याला हे समजू शकतो की वानर गीता हा महा मंत्र आहे. ध्यान श्लोकाच्या प्रारंभी अंगन्यास आणि करन्यास आणि सर्व विधींसह पठण केलेले कोणतेही स्तोत्र एक महान स्तोत्र असते. ध्यान श्लोकाचा भाव खालीलप्रमाणे आहे: ज्याने आपल्या डाव्या पायावर डावा हात ठेवला आहे, उजवा हात ज्ञान मुद्रेत आहे, सर्व महान संतांनी ज्याची विपुल स्तुती केली आहे, जो सर्व प्रकारच्या ज्ञान शिखरावर पोचला आहे, जो केळीच्या बागेत मणिमय पीठावर बसला आहे, जो कोट्यावधी बाल सूर्यासमान तेजोमय आहे आणि जो सदैव परब्रम्हाचे ध्यान करत आहे तो हनुमंत मला मनशुध्दी प्रदान करू दे! वरील स्वरूपावर ध्यान करून हनुमंताचे स्मरण केले पाहिजे. त्यामुळे मनशुद्धी प्राप्त होते. संजीव पर्वतोद्धार मनो दु:खं निवारयाम् । प्रसीद सुम: बाहो त्रायस्व हरी सत्तमाम् ।। हा आणखी एक ध्यान श्लोक आपण पुढच्या भागात पाहू या. ॐ नमो हनुमते नम:।.

Tags: