ॐ नमो हनुमते नम:। आपण आजपासून वानर गीतेबद्दल बोलणार आहोत, थोडा परिचय करून घेणार आहोत. प्राणदेव हनुमंताची स्तुती कितीही केली तरी ती नेहमीच अपुरी असते. देवांच्या देवांनीही वानरांचे रूप धारण करून प्राणदेव हनुमानाची स्तुती केली. भगवान इंद्र आणि इतर देवतांनीसुद्धा हनुमंताची अनेक प्रकारे स्तुती केली आहे. अंजनेय वायु रूपात असले तरी ते भगवान सदाशिवाचे प्रतिरूप आहेत. तसेच, भविष्यात ते ब्रम्हरूपात दिसणार आहेत. अशा दिव्य स्वामींची स्तुती कितीही केली तरी कमी पडते. आपण बर्याचदा ऐकतो की हनुमानाची मनापासून खूप स्तुती केली की तो आपले विश्वरूप दाखवितो आणि भक्तांचे रक्षण करतो. होय हे खरे आहे. परंतु येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की हनुमानाला कोणत्याही स्तुतीची गरज नाही. त्याचा अर्थ असा आहे की त्याची स्तुती, माहात्म्य गायले जावे आणि ते ऐकून तृप्त होऊन, तो संकटात असलेल्या आपल्या भक्ताच्या बचावासाठी लगेचच धावून यावा. अशा महान भगवान हनुमानाचे संदर्भ सर्व पवित्र पुराणांमध्ये तसेच पराशर संहिता या पवित्र ग्रंथात आढळतात. रामायणात या भगवानांचा उल्लेख बर्याच ठिकाणी आढळतो. चला या महान भगवानांचा संदर्भ असलेल्या वानर गीतेबद्दल थोडक्यात चर्चा करूया. भगवान राम यांच्या ह्या आदर्श भक्ताचे उदाहरण सर्वांसमोर आहे. तो एक महाभक्त, ज्ञान पंडित आहे. भक्तीच्या नऊ प्रकारांमध्ये (नवविधा भक्ती) प्रभुत्व मिळविल्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की तो भक्तीच्या शिखर स्थानावर पोहोचला आहे. तो योगब्रम्हा असल्याने त्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही . शिवाय तो या सृष्टीचा भावी ब्रह्मा आहे. तरीसुद्धा, तो नम्रपणे,विनयाने आपल्या गुरूंच्या भगवान श्री रामांच्या चरणी बसणे पसंत करतो आणि अज्ञानाचे नाटक करतो. . हनुमानाचे श्री रामांकडे एकटक पाहणे हे बुद्धी आणि मनाचे ऐक्य दर्शविते. अशा हनुमंताची संपूर्ण एकाग्रता सदैव परमात्म्यावर स्थिरावली आहे. प्रत्येक मनुष्याचे लक्ष केवळ आपल्या प्रभुवरच कायम असले पाहिजे असा बोध आपण ह्यातून घेतला पाहिजे. जेव्हा कर्मरुपी बुद्धी परमात्म्याकडे वळविली जाते तेव्हाच त्या व्यक्तीस आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते. अन्यथा हे अशक्य आहे. आपल्या प्रभुच्या पायाशी ते ज्या नम्रतेने, विनयशीलतेने बसतात त्यामुळेच त्यांना अशी महानता प्राप्त झाली आहे. देवतांच्या उपस्थितीत किंवा त्याच्या भक्तांच्या उपस्थितीत त्याने कधीही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन किंवा प्रसिद्धी केली नाही. अहंकारी होणे त्यांना ठाऊक नाही. त्याने स्वतः:ला अशा अवस्थेस नेले आहे कि त्यामुळे महानातल्या महान लोकांनासुद्धा त्यांची स्तुती करण्याची गरज वाटली! प्रत्येक रचनेत त्याच्या अफाट भक्तीआणि विनयशीलतेचा उल्लेख आहे. जे सर्वांना सहजपणे समजेल अशा पद्धतीने तो वागतो . त्याच्या सर्व कृतीत तो मनाची परिपक्वता दर्शवितो. त्याने युद्धात राक्षसांच्या संहारावेळीसुद्धा अत्यंत कुशलतेने दानवांना हाताळले. त्यांना माफ करत त्यांना स्वत: चा बचाव करण्याच्या पद्धती अप्रत्यक्षपणे शिकवत, तो संहार करत गेला. आपल्या कौशल्याने (युक्तीने )त्यांना जीवन मुक्ती दिली. परमेश्वर श्री रामांनी त्याचे गुणगान केले यावरून त्याचे माहात्म्य समजू शकते! सीतादेवींनीही त्याची स्तुती केली आणि कार्य (रामाबरोबर पुनर्मीलनाचे ) पूर्ण करण्याची त्याच्याकडे याचना केली- त्वमस्मिन कार्य निर्योगे प्रमाणम् हरी सत्तमा। हनुमन् यत्न मास्थाय दुःख क्षय करो भव ।।
त्याचप्रमाणे सीता मातेने सुद्धा तिचे वैश्विक रूप दाखवावे अशी विनंती हनुमानाने सीतेला केली. हनुमान असा एक देव आहे कि ज्याची प्रत्येक देवाने आणि देवाच्या प्रत्येक अवताराने स्तुती केली आहे. हि अशी सर्व स्तुती वानर गीतेत संग्रहित केली आहे. चला संपूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने वानर गीता ऐकू या.
ॐ नमो हनुमते नम:।