SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 2020-12-25
त्रिपुरा रहस्य - दिवस 2

प.पू. श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजींचे प्रवचन - 2ऑक्टोबर,२०१६ | श्री देवी नवरात्र दिवस-2

ताडाच्या पानांवर लिहिलेली त्रिपुरा रहस्यावरील आणखी दोन हस्तलिखित पुस्तके आपल्यासाठी उपलब्ध नाहीत. फक्त आत्म तत्त्वावरील काही अध्याय सध्या उपलब्ध आहेत. श्री शंकर भगवत् पाद यांनीही याचे फारसे वर्णन केलेले नाही. श्री माधवाचार्य आणि श्री रामानुजाचार्य यांनीही या विषयाचा फारसा उल्लेख केलेला नाही. त्याचे फक्त काही अध्याय आहेत. आपल्याला हे समजून घेणे आणि आत्मसात करणे अवघड आहे. आपल्याला जे मिळत नाही ते आपण नेहमी शोधत असतो. पण मी असे सांगतो कि जे उपलब्ध आहे ते आधी शिका. काही पुस्तके उपलब्ध नसल्याचा मी उल्लेख केल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल माहिती मिळाली. मी त्याचा उल्लेख केला नसता तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात समजले नसते. जे उपलब्ध आहे ते सुद्धा शिकणे कठीण आहे. जे उपलब्ध नाही ते विसरा. पायऱ्या चढणे हे कठीण वाटत असताना आकाशाचे ध्येय का समोर ठेवायचे. घरातील माळ्यावरील सूटकेस काढण्यासाठी आपण शिडी ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपण धडपडतो आणि खाली पडतो. आपण स्वर्गाची शिडी कसे चढू शकू? अशक्य आहे. म्हणून जे उपलब्ध आहे ते आत्मसात करणे शिकले पाहिजे. तो आपला धर्म आहे. तेच त्रिपुरा रहस्यातील रहस्य आहे. जर कोणी कानात कुजबुजत असेल तर काहीच स्पष्ट समजत नाही. हे समजून घेण्यासाठी स्पष्टपणे बोलले पाहिजे. कानात सांगायचे रहस्य देखील स्पष्ट बोलले पाहिजे. येथे, जे आत्म रहस्य सांगितले जात आहे ते सुद्धा कानात कुजबुजल्यासारखे आहे, फारसे स्पष्ट नाही. वृद्ध लोक पुटपुटल्याप्रमाणे हे आहे. हा बहिरेपणाचा प्रश्न नाही. शब्दच स्पष्ट बोलले गेले नाहीत. जो बोलतो त्याला ते काय आहे हे माहित असते. परंतु तो ते स्पष्ट व्यक्त करू शकत नाही. आत्म रहस्य ही अशी गोष्ट आहे जी स्पष्टपणे समजू शकत नाही. म्हणूनच त्याला ‘रहस्य’ - गुप्त म्हणतात. हे असे काहीतरी आहे जे शिकले पाहिजे, परंतु सहजपणे शिकले जाऊ शकत नाही. जेव्हा आपण नंबराने लॉक केलेली पेटी पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की त्यात काहीतरी रहस्य किंवा गुपित आहे. जेव्हा आपण ती उघडतो तेव्हाच त्यात काय आहे हे आपल्याला समजते. पण बऱ्याचदा आपण ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करीत नाही आणि ती रहस्यमय आहे असे म्हणतो. होय असे असू शकते, कारण ती कधीच उघडलेली नव्हती. ज्याने तो लॉक केली तो तिथे नाही. आपल्याकडे पेटी आहे पण आपण ती उघडू शकत नाही. किंवा आपण ती तोडून, जाळून उघडू शकत नाही. आपल्याकडे चावीसुद्धा नाही. पेटी सुंदर आहे पण ती आपण उघडू शकत नाही. जर आपल्याला ती पेटी उघडण्यास सांगून त्यात काय आहे ते वाचण्यास /बघण्यास सांगितले तर मग आपली काय अवस्था होईल ? आपण याला रहस्य म्हणतो. नरकातील अहि रावण याचा जीव मधमाशीमध्ये लपलेला होता. त्याच्या बहिणीने हे रहस्य उघड केले कारण त्याने आपल्या बहिणीचाही छळ केला होता. त्याने आपल्या मुलाचाही छळ केला होता. अहिरावणाच्या बहिणीने त्याच्या जीवनाचे रहस्य प्रकट केले पण त्याला कसे मारायचे हे गुपित तिने उघड केले नाही. तर, मधमाशा अशाच मरत नाहीत. अहिरावणाचा जीव पाच मधमाश्यांमध्ये लपलेला होता. त्या मेल्यानंतरच ह्याचा मृत्यू होणार होता. अहिरावणाच्या बहिणीने या मधमाश्यांना मारण्याची पद्धत सांगितली नाही परंतु वेगवेगळे रूप धारण करून त्यांना मारले जाऊ शकते याचा संकेत दिला. पाचही मधमाश्या एकाच वेळी माराव्या लागतात. हे देखील एक गुपित होते. बुद्धिमान हनुमानाने हे रहस्य समजून घेऊन पाचही मधमाश्यांना पाच वेगवेगळी रूप धारण करून ठार मारले. हे रहस्यच होते म्हणून इतर कोणीही अहिरावणाला मारू शकले नाही.

येथे, आत्म तत्व देखील खूप रहस्यपूर्ण आहे आणि ते समजू शकत नाही. याचा खुलासा प्रत्येकास करता येतोच असे नाही. सर्व सामान्य लोक याबद्दल जाणून घेण्यास पात्र नाहीत. ज्यांना यात रस आहे त्यांनाच थोडी फार माहिती असते परंतु इतरांनाही तेवढीही माहिती नसते. याबद्दल कोणीही बोलत नाही किंवा हि माहिती सगळीकडे उपलब्ध पण नसते. येथे त्याचा रहस्य म्हणून उल्लेख करण्याचा आणखी एक हेतू आहे. त्याचे कारण ते कठीण आहे. म्हणून त्यास रहस्यमय - गुप्त आहे असे म्हणतात. त्यामुळे कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. संयोगाने आपण ते उलगडण्याचा प्रयत्न केल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक आहे असे सांगतात. याकारणास्तव कोणीही शिकण्याचा प्रयत्न करीत नाही. आत्म विद्या हा एक कठीण विषय आहे आणि तो भीतीदायक आहे. कोणीही हे शिकविण्याचा प्रयत्न करीत नाही आणि कोणीही ते शिकण्याचा प्रयत्न करीत नाही. तरीही, हे शिकणे सर्वात सोपे आहे. हे मिळवणे, प्राप्त करणे अवघड आहे. परंतु ज्यांना त्यात रस आहे त्यांनाच ते प्राप्त करता येते. हे काय चालले आहे? स्वामीजी दोन परस्परविरोधी गोष्टी का सांगत आहेत? जर एखादया व्यक्तीने औषध तयार केले तर तो त्याचे सूत्र(फॉर्म्युला) सांगत नाही. तो स्वत: चा ट्रेडमार्क नोंदणी करतो. अन्यथा, त्याची नक्कल केली जाते. हे देखील असेच आहे.

काल, आपण आपल्या सगळ्यांचे उदाहरण घेऊन बोललो. स्वामीजींना गुरुंचे उदाहरण म्हणून घेतले होते आणि तुम्हा सर्वांना शिष्याचे उदाहरण म्हणून घेतले होते. तुम्ही सगळ्यांनी थोडे फार ऐकले असेल. काही लोकांना समजले आणि काहींनी समजले नाही. काहींना वाटले की ते फक्त त्यांच्यासाठी आहे तर काहींना वाटले कि ते इतरांसाठी आहे. मूर्खांनो, हे तुमच्या सर्वांसाठी आहे. जे कोणी हे ऐकत आहेत त्यांच्यासाठीच आहे. हे माझ्यासाठी नाही, मी कोणी विशेष नाही असे वाटून घेऊ नका. तुम्ही कोणत्यातरी वेळी किंवा कोणत्यातरी प्रकरणात तिथे आहात. मी जे काही बोललो ते फक्त तुमच्यासाठी. हे माझ्यासाठी नाही असे म्हणून आपली सुटका करून घेऊ नका. निश्चितच ते तुमच्यासाठी आहे आणि ते मी तुम्हाला सांगितले आहे. माझ्या माध्यमातून इतर कोणीही हे प्रसारित करत नाही. हे माझे शब्द आहेत. हे कोणाला सांगितले होते? फक्त तुम्हाला. ते घ्या किंवा सोडा. तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगितले कारण मी मला तुम्ही हवे आहात नाहीतर सांगितले नसते. जर तुम्ही ८० % गुण मिळविणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यास ओरडलात तर त्याला १००% मिळेल. ज्याला शून्य गुण मिळतात त्याची तक्रार करून काय फायदा? उलट तोच तो शिक्षकालाच ओरडेल. जर तो कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा मुलगा असेल तर त्या शिक्षकाची बदली होईल. म्हणून शिक्षक खरोखरच अशा विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत.

काल आपण जमदग्नि महर्षीचा मुलगा परशुरामाबद्दल बोललो. तो नीतिमान, ब्रह्मचारी आणि धैर्यवान होता. आपण त्याच्याविषयी बर्‍याच गोष्टी ऐकल्या. त्याने दुष्टांना शिक्षा केली आणि चांगल्या लोकांचे रक्षण केले. त्याने पृथ्वीवर धर्म स्थापित केला. जर तुम्ही वाईटचा निषेध केलात तर तेच धर्मरक्षण असते. जर कोणी राम गोविंदाऐवजी ऱ्यामा गोविंदा म्हणून भजन गात असेल तर त्यांना सांगा की ते ऱ्यामा नाही तर राम आहे. ते ऱ्यामा ऱ्यामा गात राहतात….ऱ्यामा ऱ्यामा गोविंदा …. भजन व्यवस्थित गायले पाहिजे. आपण त्यांची चूक सुधारणे आवश्यक असते. सुधारणा करण्यात काहीही चूक नाही. त्यांना समजावून सांगा की त्यांनी कदाचित ते चुकीचे लिहिले असेल आणि मुद्रणात त्रुटी असू शकते. दुरुस्त करण्यात नक्कीच काहीही चूक नाही.

जेव्हा श्री रामाने शिवधनुष्य मोडले तेव्हा परशुराम पराभूत झाला. ही कहाणी आपल्या सर्वांना माहित आहे. श्रीरामांनी पराभूत केल्यानंतर परशुरामांना त्यांच्या चुका समजल्या. तोपर्यंत ते अहंकारी होते . जरी कश्यप महर्षींनी त्यांना पृथ्वी सोडायला सांगितले, तरीही त्याचे दुःख त्यांना झाले नाही. पण जेव्हा श्रीरामांच्या हाती पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा ते निराश झाले. त्यावेळी आपण ज्या मार्गाने चाललो होतो तो चुकीचा होता हे त्यांना जाणवले.आपल्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही अशी त्याची भावना होती. अशा व्यक्तीला श्री रामाने पराभूत केल्यानंतर त्यास स्वतः:ची चूक लक्षात आली. तोपर्यंत त्याने मिळविलेली सर्व संपत्ती वाया गेली होती आणि त्यांना आनंद मिळू शकला नाही. आपल्या बाबतीतही असेच घडते.

बरेच लोक बाजारात जातात आणि नंतर कधीतरी उपयोगात येतील या उद्देशाने नको असलेल्या बऱ्याच गोष्टी खरेदी करतात. जेव्हा मीठाच्या तुडवड्याबद्दल बातमी येते तेव्हा आपण २० किलो मीठ विकत घेतो. आम्ही मिठाच्या पिशव्यानी घर भरतो. आपण २० जन्मानंतरही तेवढे मीठ संपवू शकणार नाही हि सर्व केवळ विक्रीची तंत्र आहेत आणि आपण फसतो. कधीतरी अचानक बातमी झळकते ! ५ रुपये सेल ! मूर्ख! त्याची किंमत फक्त ३ रुपये आहे. आपण धावत पळत जाऊन ५ रुपयांना विकत घेतो. तुम्ही सेलमध्ये साडी ५ रुपयांना खरेदी करता . मच्छर दाणी म्हणूनही त्या साडीचा उपयोग होत नाही. तरीसुद्धा तुम्ही ती खरेदी करता. आपण भोक असलेल्या १० छत्र्या खरेदी करतो. एक देखील उपयोगी पडत नाही. तुम्ही २० जोड्या पादत्राणे खरेदी करता. आणि म्हणता की मला त्या स्वस्त किंमतीत मिळाल्या. शिवाय, त्यातील गोष्टी तुम्ही इतरांना भेट देता आणि ते तुम्हाला शाप देतात. त्याहीपेक्षा उत्सव आणि इतर प्रसंगी आपण सर्वांना भेटवस्तू दिल्या याबद्दल आपण अभिमान बाळगता. आपल्याला असे वाटते कि ह्या गोष्टी आपल्याला आनंद देतात आणि त्यामुळे आपण त्या गोळा करतो. त्याचा काही उपयोग नसतो. हे सर्व वाया जाते आणि आपल्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो. तुम्ही म्हणाल की तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केलात. आपल्या मुलांसाठी आपण नाही करणार तर काय दुसऱ्यांच्या मुलांसाठी संघर्ष करणार? तुम्ही असे सांगता की तुमच्या मुलीचे लग्न करून देण्यासाठी खूप धडपड केली . जर आपल्या मुलीसाठी नाही तर आपण कोणासाठी संघर्ष कराल? आपल्या शेजार्‍यांसाठी? ती तुमची मुलगी आहे आणि तुम्हाला तिची जबाबदारी घ्यायलाच हवी. बरेच लोक माझ्याकडे येतात, कृपया माझ्या मुलीचे लग्न जमवा. ते करण्यासाठी मी काय मध्यस्थ आहे? तुमच्यासाठी मी माझे सर्व कार्यक्रम रद्द करून तुमच्या मुलीसाठी नवरा शोधात बसू का? आणि काही काळानंतर, जर त्या दोघांनी भांडण केले तर आपण माझ्याकडे याल आणि आपल्या मुलीचे लग्न ठरविल्याबद्दल मला दोष द्याल. तर, आता मी ते सर्व करणे थांबविले आहे आणि ते दोघे सहमत झाले तर त्यांचा विवाह करून द्या असे मी सांगतो. मी फक्त आशीर्वाद देतो. लग्न जमविण्यात मध्यस्थ असण्यापेक्षा मोठे पाप नाही. आपण कधीही सक्ती करू नये. आपण केवळ परिचय करून देऊ शकता परंतु त्यापेक्षा पुढे काही करू नका. लोक माझ्याकडे परत येतात आणि म्हणतात की स्वामीजी तुम्ही हे लग्न ठरविले होते. त्यांना इतर लोक दिसत नाहीत. जरी दोन्ही कुटूंबातील बाकी सर्वजण गायब झाले तरी फक्त मी येथे हजर आहे. ते मला सोडू शकत नाहीत, परंतु ते मला वाईट वागणूक देतात. तर, आता मी अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. जर ते स्वतः या प्रकरणांमध्ये गुंतले असतील आणि काही चुकीचे घडले तर ते माझा आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे धाव घेतात. मी त्यांना आशीर्वाद देतो आणि धैर्य देतो. मग ते पुन्हा म्हणतात, कृपया आता दुसरा वर शोधा माझ्याकडे इतर कोणतेही काम नाही का ? लोक म्हणतात, स्वामीजी माझ्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे आता दुसरीसाठी शोधा मग तिसरीसाठी शोधा. कोणीही त्यांच्या मुलांना आणत नाही. ते फक्त त्यांच्या मुलीच आणतात. हे असे माझे जीवन आहे. काय करायचं ? ही जबाबदारी कोणाला हवी आहे? हे असे कार्य गुरूंवर सोपवू नये.. मध्यस्थ असण्यापेक्षा हे मोठे पाप आहे. या जोडप्याने मैत्रीपूर्ण रीतीने संसार करावा असा तुम्ही माझ्याकडून आशीर्वाद घ्या. ते पुरेसे आहे. लोकांची अपेक्षा असते की मी जोडीदार शोधला पाहिजे, तारीख निश्चित केली पाहिजे, लग्नाचे ठिकाण शोधावे, जेवणाची व्यवस्था करावी आणि मग जेव्हा हे सर्व काही संपेल आणि जेव्हा त्यांना बाळ होईल तेव्हा मी त्या बाळाचे नाव ठेवले पाहिजे आणि ते असे चालूच राहते… हे माझे कोणते कर्म आहे ? छी छी…. तिरुपतीला निघून जावेसे वाटते. गुरूंकडून या सर्व गोष्टींची अपेक्षा करणे हे सर्वात मोठे पाप आहे. तुम्ही फक्त स्वामीजींचा आशीर्वाद मागा. मी मध्यस्थ नाही, बरोबर ना? तर, तुम्हाला वाटते की साधन संपत्ती आपल्याला आनंद देते परंतु नाही,तसे होत नाही. परशुराम यांनाही हे जाणवले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकली पण ते एकाकी पडले. त्यांच्या आपल्या तपश्चर्येतून प्राप्त केलेली शक्ती त्यांच्या उपयोगात आली नाही आणि जेव्हा श्री रामांनी त्यास पराभूत केले तेव्हाच ह्याची जाणीव त्यास झाली. ज्या क्षणी त्यांनी संपूर्ण जमीन काश्यप महर्षींना दान केली त्या क्षणी, या जगाचा शासक होण्याची त्याची सर्व स्वप्ने धुळीत पडली. सर्व राजांचा वध करून त्याला राजा व्हायचे होते. पण काहीही झाले नाही. १४ लोक, राज्य, आपल्या शौर्यातून आणि तपश्चर्येतुन मिळवलेलेले पुण्य सर्व काही जाळून राख झाले आणि बचाव करण्यात त्यांना या कशाचाही उपयोग झाला नाही. त्यांना समजले की आपण जे काही मिळवले आहे ते कधीतरी, कुठेतरी गमावतो. हे कोणतेही सांसारिक सुख आपल्याला आनंद देत नाही. हि गोष्ट आपण ह्यातून शिकतो. आणि परशुरामांचा अनुभव आपल्याला ते स्पष्टपणे दर्शवितो. ज्याने आपल्या शौर्याने जग जिंकले आणि ज्यांनी आपल्या तपश्चर्येने स्वर्ग जिंकला त्यास आपल्या क्रोधावर विजय मिळवता आला नाही आणि पहिल्यांदाच परशुरामांना याची जाणीव झाली.

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील काही राजांवर जो राजा विजय मिळवितो त्यास सम्राट म्हणतात. परंतु परशुरामांना खऱ्या अर्थाने सम्राट म्हणता येईल कारण त्यांनी १४ लोक जिंकले होते. परंतु जेव्हा आपल्या रागावर आपण विजय प्राप्त शकत नाही हे त्यांना समजले तेव्हा त्यांनी हे पद आपल्या नावातून कडून टाकले. ते क्रोधाचे गुलाम झाले होते. त्यांना समजले की या क्रोधामुळेच मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी स्वतः:च्या संपूर्ण आयुष्याचे विश्लेषण केले. यज्ञ आयोजित करून, सहभाग घेऊन, भेटवस्तू देऊन, यज्ञ पाहून किंवा त्यात सेवा करून आपण आपल्या पापांचा नाश करू शकतो, आपले पापनाश करण्यासाठी यज्ञ आहेत परंतु आपला क्रोध दूर करण्यासाठी काहीही नाही. म्हणूनच श्रीरामांच्या हातून त्यास हार पत्करावी लागली. त्यांना स्पष्टपणे समजले होते की क्रोध ह्या शत्रूचा आपण पराभव करु शकत नाही. त्यांना समजले की जोपर्यंत ते त्यांच्या अंतर्गत शत्रूंवर विजय प्राप्त करू शकत नाहीत तोपर्यंत ते बाह्य जगावर विजय प्राप्त करू शकत नाहीत. परशुराम जरी श्री विष्णूचा अवतार असले तरी, त्यांस अजूनपर्यंत याची जाणीव झाली नव्हती. असे सर्व विचार परशुरामांच्या मनात येत होते आणि पश्चात्ताप झालेले परशुराम हळू हळू चालत होते, तेव्हा त्यांना एक तेजस्वी, मेधावी व्यक्ति दिसली. परंतु ती व्यक्ती थोडीशी वेडसर वाटत होती. त्याने परशुरामांवर दगड फेकण्यास सुरवात केली. परंतु परशुरामांनी त्याच्यातील देवत्व ओळखले आणि ते त्याच्या मागे चालू लागले. त्यांनी त्या व्यक्तीला थांबवले आणि त्याची चौकशी केली आणि त्यांनी त्यास दगडांनी का मारले असे विचारले.

त्या व्यक्तीने उत्तर दिलेः माझे नाव संवर्तक आहे आणि मी दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने या अवस्थेत आहे. या अवस्थेचे नाव आत्म विलास - आत्म आनंद आहे. यामुळे मी असा आहे. आत्म विलास जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःची माहित असली पाहिजे. बसून स्वतःबद्दल विचार कर. आपल्या जन्मापासून, आपण काय चुका केल्या आहेत आणि आपण कोणती चांगली कृत्य केली आहेत आणि त्याचा काय परिणाम झाला आहे याचा विचार कर. हा आत्म- विलास आहे.

संवर्तकाचे शब्द ऐकून परशुरामांनी उत्तर दिले - महात्मा, मला संसार, सांसारिक जीवनाची भीती वाटत आहे. येथे संसार याचा अर्थ कुटूंब परिवार नसून पीड़ा असा आहे आणि कोठलेही सांसारिक सुख किंवा संपत्ती त्यांना आनंद देऊ शकत नाही ह्या त्यांच्या भावनेविषयी आहे. मानसिक शांती मिळेल असे ज्ञान प्रदान करण्याची विनंती परशुरामांनी संवर्तकांना केली.

गुरूपादिष्ट मार्गेन

स्वात्म शक्तिम् महेश्वरीम्
त्रिपुरम् सम्यगरध्य

संवर्तकने उत्तर दिले: हे राम! गुरूंना शरण जा आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण कर आणि त्रिपुरा देवीची उपासना कर आणि तिचा आशीर्वाद घे. जो कोणी त्रिपुरा देवीची उपासना करतो त्याला आत्म विलास प्राप्त होतो आणि त्यांच्याशी संबंधित सर्व लोकांनाही याचा अनुभव येतो. माझ्यात वास्तव्य करणारा आत्मा सर्व व्यापक आहे आणि जे काही बाह्य आहे त्याचे प्रतिबिंब आत्म्यात आहे. या भावनेने, आपल्याला हे समजेल की प्रत्येक गोष्ट आपल्यात आहे आणि मर तुम्ही स्थिर आणि अचल व्हाल. गुरु तत्व जाणून घे आणि आनंदी रहा - संवर्तक म्हणाले. जेव्हा तुम्ही स्वतः:ची ओळख शरीराने करता तेव्हा ती खरी ओळख नसते. आपण म्हणजे आपण नसतो किंवा आपले शरीर देखील नसते. आपण सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहोत आणि प्रत्येक गोष्ट आपल्यात आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वात असता आणि संपूर्ण विश्व तुमच्यात असते. अशा भावनेने योगीस संपूर्ण ब्रह्मांडात स्वत: असल्याची जाणीव होते आणि श्वास सोडताना त्यास असे जाणवते की आपण संपूर्ण विश्वामध्ये तरंगत आहोत. ही आत्म दर्शनाची भावना आहे. मी विश्वामध्ये आहे आणि विश्व माझ्यात आहे याची भावना असू द्या, मी या विश्वामुळे अस्तित्वात आहे आणि माझ्यामुळे विश्व अस्तित्वात आहे. ही भावना संसाराची भीती दूर करते. संसारातील दोष व अधर्म सातत्याने ओळखाल तरच तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. संसारातील आनंदांची भावना तुम्हाला नरकाच्या दिशेने ढकलते. घर, मुले, कुटूंब इत्यादी सुख तुम्हाला नरकात नेतात. कौटुंबिक जीवन जगतानाही, त्याच्या सुखांपासून अलिप्त रहा आणि प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीत परमात्मा पहा. हे तुम्हाला आत्म तत्व देईल, अन्यथा तुम्ही कधीही त्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. स्वत: ला अलिप्त ठेवण्यासाठी संसाराच्या चुका आणि अधर्म याची सतत स्वतःला आठवण करून देत रहा. हे आपल्याला वैराग्यकडे घेऊन जाईल आणि योग्य मार्गावरून घेऊन जाईल. जो सतत यावर चिंतन करेल तो परमपदाच्या परमस्थानी पोहोचेल - परशुरामांना अवधूत संवर्धन शिकवित होते.

जर परशुराम, जे नीतिमान, ब्रह्मचारी आणि सर्व जगाचे शासक होते ते संसाराच्या भीतीपासून मुक्त होऊ शकले नाहीत तर आपली परिस्थिती काय असेल याची कल्पना करा. करा. आत्म तत्त्वावर विचार करण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा आत्म विलास आहे. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी परिस्थिती उद्भवू शकते. तर, आता जागे व्हा आणि आत्म तत्वांचा विचार करण्यास प्रारंभ करा.

त्रिपुरा मातेच्या आशीर्वादाने आपणा सर्वांचा कल आत्मतत्वाकडे झुकावा आणि भक्ती, ज्ञान आणि वैराग्य विकसित व्हावे यासाठी मी तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो!

त्रिपुरंबिकायै नम: !! श्री मात्रे नम: !!

नवरात्रीच्या या दुसर्‍या दिवशी आपण सर्वजण त्रिपुरा रहस्य शिकत आहोत. आज आपल्याकडे दत्ता स्वामी आणि त्रिपुरा मातेचे दर्शन होणार आहे. आज आपण दत्त स्वामींच्या मुखातून त्रिपुरा देवीचे शब्द ऐकणार आहोत. संवर्तक मुनींशी झालेल्या संवादानंतर परशुरामांची सांसारिक गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलली. ते सहिष्णू बनले. आपण ज्यांच्याबद्दल विचार करणे आवश्यक होते त्यांचा विचार केला नाही याचा त्यांना पश्चात्ताप झाला. मी सुख उपभोगत राहिलो आणि वेळ वाया घालवला आहे. ह्या गोष्टी मला माहित नव्हत्या. मी खाणे, झोपणे, भांडणे, घर, मुले, सुनेशी भांडणे इत्यादी गोष्टींत मी हे अनमोल आयुष्य वाया घालविले. माझे आयुष्य असे का आहे? आत्म ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने हे शरीर मला दिले गेले आहे आणि मी ते वाया घालविले. कौटुंबिक जीवन जगणाऱ्यांनी सुद्धा, आपले ७५% जीवन परमात्मा आणि २५ % आपल्या इच्छा अशी वाटणी करावी. पण आपण आपल्या इच्छांना ९९% वाटणी देतो आणि कुठल्यातरी भीतीने आपण १% वेळ गोविंदा गोविंदा म्हणण्यात घालवतो. मी तिरुपतीला गेलो आहे … शिवरात्रीला गेलो नाही तर प्रत्येकजण मला दोष देईल अशी भीती लोकांना वाटते. आपण कोणासाठी करत आहात? आपण तीर्थयात्रेला जाता आणि तिथे तुम्ही काय पाहता ते देव जाणे. तुम्ही कोठे जात आहात आणि का जात आहात हे तुम्हालाच माहिती नसते. केवळ दत्तात्रेय आपल्याला शिकवू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्या तीव्र इच्छेपोटी, तुम्ही हाती घेता आणि अडचणीत येता. हे शरीर आपल्याला दु: ख देते परंतु सुख देत नाही. शरीर हाच आत्मा आहे, असे ज्ञानी आणि अज्ञानी लोकांना वाटते आणि ते चुकीच्या गोष्टी करतात. जरी आपण इतरांना होणारा वृद्धत्वाचा त्रास पाहत असलो तरी आपल्याला असे वाटते की आपल्याला असे होणार नाही. शरीर आपल्याला वृद्धावस्थेचे संकेत देते. तरीही आपण ते ओळखत नाही. जर एखादा म्हातारा माणूस खाली पडला तर आपणही त्या अवस्थेतून जाऊ, हा आपल्यासाठी एक धडा असतो. जर एखादा मुलगा आपल्या आईला घराबाहेर हाकलतो तर त्या वृद्ध स्त्रीच्या रूपात परमात्मा आपल्याला धडा देत असतो की तुम्हीही त्या अवस्थेतून जाणार आहात. सावधगिरी बाळगा अशी ही एक चेतावणी असते. मनाला वरचेवर शिकवत रहा. गाढ झोपेमध्ये कोण आपले रक्षण करते? जर तुम्ही झोपेच्या वेळी श्वासोश्वास थांबवलात तर कडक सुरक्षा असण्याचा काय उपयोग? साप तुम्हाला चावू शकतो. झुरळ आपल्या नाकात जाऊ शकतो. ते आपल्या कानात जाऊ शकते. आपण आपल्या कानात कापूस घालू शकता परंतु आपण ते तुमच्या नाकात घालू शकता का? तुमचा मृत्यू होईल.

स्वामीजी अलीकडेच चीनला गेले. चीनमध्ये 7000 किलोमीटर अंतरापर्यंत एक भिंत बांधलेली आहे . या बांधकामादरम्यान बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला. त्यांना वाटले होते की मंगोलियन अतिक्रमण करतील. सम्राटांनी बांधलेल्या मोठ्या इमारती मी पाहिल्या होत्या. त्या आता कुठे आहेत? त्यांचा आत्मा देखील तेथे नाही. केवळ चित्रपटांमध्ये आपण भुतं पाहतो. पैसा आणि लोक सर्व मृत्यूच्या आवरणाखाली आहेत. हे कोठून येते हे आपल्याला ठाऊक नाही…. तोंड, नाक, कान, केस. आपण ज्या व्यक्तीशी काल संध्याकाळी बोललेले असतोतो आज सकाळी जिवंत नसतो. तुम्ही म्हणता .. अय्यो मी काल संध्याकाळी त्याच्याशी बोललो होतो. आम्ही एकत्र इडली खाल्ली. म्हणून, जो शांती मिळविण्याचा प्रयत्न करतो त्याने अशा सुखाच्या नादी लागू नये. जे तुम्हाला भय देत नाही ते शोधा. जो तुमची भीती दूर करतो त्या परमेश्वराचा शोध घ्या. जिथे डोकावू नका अशी पाटी असते तिथे डोकावण्यास तुम्हाला आवडते आणि तुम्ही शेवटी तुम्ही डोकावून बघताच.

म्हणून, परशुरामांनी आपले भय दूर केलेल्या परमेश्वराचा आश्रय घेण्याचे ठरविले, आणि गंदमाधन टेकडीवर एका कुटीरात त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी प्रार्थना केली.

दत्तात्रेय म्हणाले, हे राम, जे अंतिम, निर्वाणीचे आहे तुम्ही त्याचा शोध करीत आहात. त्रिपुरा मातेचा आशीर्वाद अंतिम आहे. तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे. त्रिपुरा माता चित् शक्ती आहे. जीवातील “स्व” द्वारे तिला ओळखले जाऊ शकते.

आपल्यातील कोण श्रेष्ठ आहे याबद्दल एकदा देवात चर्चा झाली. मोठ्या ध्वनीसह, त्रिपुरा देवी प्रकट झाली आणि तिने तिचे माहात्म्य सांगितले. ती म्हणाली, त्यांच्यापैकी कोणीही महान नाही. संपूर्ण विश्व तिच्या उर्जेमुळे गतिमान आहे. चितशक्तीच्या, देवीस्वरूपाच्या सहाय्याने शरीरातील सर्व अवयव कार्यरत आहेत. तिची लीला अशी आहे की तिच्या शक्तीच्या मदतीने आपण हालचाल करू शकतो. ती म्हणाली: मी त्रिमूर्तीस निर्माण करून त्यांच्यावर विश्वातील कामे सोपवली आहेत. माझ्या आदेशाचे अनुसरण करा आणि सोपविलेले केलेले कार्य करत रहा. असे सांगून त्रिपुरा देवी अदृश्य झाली. ती सर्व व्यापक आहे. संपूर्ण विश्व माया आहे. आपण त्याचे मोजमाप करू शकत नाही. किती ग्रह आहेत हे अजूनही आपल्याला ठाऊक नाही. दृश्यमान असलेल्या ग्रहावर जाण्यासाठी सुमारे ४० वर्षे लागतात. तेथे पोहोचण्यास सुमारे १२० वर्षे लागतात. तोपर्यंत आपण जिवंत असणार नाही. पूर्ण ब्रह्मांड काही भागांमध्ये विभागले गेले आहे आणि तिच्यामध्ये सामावले आहे. तेच विश्व चिदाकाशातही आहे - ते म्हणजे आपले मन. हे मन ब्रह्मात आहे. त्या ब्रह्मात सर्व काही आहे. तोच ब्रह्मा देखील त्रिपुरा परशक्तीचे रूप आहे. चिदानंद आणि अद्वय हि तिची रूप आहेत. ती आपले शब्द, शरीर आणि मन यांच्यापलीकडची आहे. ती सर्व गोष्टींचा आधार आहे. तिने अनेक स्वरूपं धारण केली आहेत आणि तिच्या भक्तांसाठी ती करुणामयी आहे. असे वर्णन करून दत्त स्वामींनी परशुरामांना त्रिपुरा मातेचे स्वरूप समजावून सांगितले. परशुरामांप्रमाणेच मनन, चिंतन करा आणि योग्य मार्गावर चाला आणि निर्भय रहा.

दत्ताच्या कृपेने त्रिपुरा मातेचे कृपाआशीर्वाद आपणा सर्वांवर नेहमीच राहोत.

Tags: