SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 2020-12-21
त्रिपुरा रहस्य - दिवस १

प.पू. श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजींचे प्रवचन - १ऑक्टोबर,२०१६

  • श्री देवी नवरात्र दिवस-१ बऱ्याच लोकांना कायमस्वरूपी घर, गाडी, जीवनसाथी, मूल वगैरे बऱ्याच गोष्टी हव्या असतात. हे सर्व कायमस्वरूपी कसे असू शकेल? कोणीही कायमस्वरूपी भक्ती मागत नाही. कायम हा शब्दच अस्थायी आहे. इथे कायमस्वरूपी काहीही नाही. सर्व काही क्षणभंगुर असते. जे कायमस्वरूपी आहे, ते सत्य आहे म्हणून त्याची विचारणा कोणी करत नाही, कारण ते खरोखरच कायम स्वरूपी असते. आपण केवळ अल्पकालीन गोष्टींची हाव धरतो. मग, शाश्वत काय आहे? हे कायम स्वरूपी नाही हे जरी आपल्याला माहित असले की तरी आपण मायेत अडकतो. इच्छा, आस्वाद, सौंदर्य, रडणे किंवा स्मितहास्य - काहीही कायम टिकणारे नसते. कायमस्वरूपी दु: खाची कोणालाही अभिलाषा नसते. काही लोक जरी कोठलीही इच्छा बाळगत नसले तरी ते कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रडत राहतात. त्यांना हसणे आणि आनंद उपभोगणे माहित नसते. ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत नाहीत.

एखादी लहान मुलगी बाहुलीसाठी रडून हट्ट करते. एकदा तिला बाहुली मिळाली, ती तिच्याबरोबर खेळते, थोड्या वेळाने त्या बाहुलीचे एकेक भाग तोडून फेकून देते आणि खुश असते. पण, ती तिच्याबरोबर कायम स्वरूपी खेळात नाही. जर तिला खरोखर ती बाहुली हवी असती तर तिने तिची काळजी घ्यायला हवी होती. ती हट्टी मुलगी काही मिनिटांतच आनंदी होते. कशामुळे तिला आनंद झाला? तिच्यात असा तात्काळ बदल कशामुळे झाला ह्यावर आपण विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला कशामुळे समाधान मिळते आणि कशामुळे मिळत नाही? आपण हे जाणणे आवश्यक आहे. हे समाधान कोठे आहे? हे आपल्या मनात आहे का आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये? का आपल्या बुद्धी मध्ये? की आपल्या हृदयाचा ठोक्यात आहे? ते कोठे असते आणि कोठे जाते? काही काळानंतर, आपण आपली इच्छा विसरतो. मग, ती कुठे जाते ?

बर्‍याच लोकांची देवावर खूप भक्ती असते. अचानक त्यांना देवाचा विसर पडतो आणि वैर भावना निर्माण होते. मग ती भक्ती कुठे गेली? आपल्या मनात काल जी भावना होती ती आज का नाही? यामध्ये खरे काय आहे आणि खोटे काय आहे? काल मनात असलेली भक्ती - ती खोटी होती का? की आज निर्माण झालेली वैर भावना खोटी आहे? कशामुळे आपल्याला आनंद होतो आणि कशामुळे वैराग्य प्राप्त होते? हे मन शरीर नाही, बुद्धी नाही. मग ते काय आहे? आपल्याला भूक लागते. आपण अन्न खातो आणि आपली भूक भागल्यानंतर समाधानाने “आह” असे तृप्तीने म्हणतो. पुन्हा काही वेळाने आपल्याला भूक लागते. ही भूक कोणी दिली? या सर्वाबद्दल जाणून घेणे हे आत्म तत्व आहे आणि प्रत्येक मनुष्याने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्यासाठीच जन्म घेतला आहे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा जन्म दिला आहे. पण आपण त्याबद्दल विसरतो. हे अशाप्रमाणे आहे - एखादा विद्यार्थी विशिष्ट शिक्षणक्रमात प्रवेश घेतो, वाईट संगतीला लागतो आणि शिक्षणक्रमाकडे दुर्लक्ष करतो. प्रवेश घेण्यामागे त्याचा जो मुख्य हेतू होता त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते. त्याचा हेतू काय होता आणि त्याने कोणता मार्ग निवडला? त्याची शिक्षणक्रम पूर्ण करण्याची इच्छा खरी आहे की त्याचे वाईट संगतीत असणे खरे आहे? काय खरे आणि काय खोटे आहे यावर आपण विचार करणे आवश्यक आहे.

आपण फक्त लग्न, मुले ह्यांचा विचार करतो आणि एक दिवस आपला मृत्यू होतो. आपल्या आयुष्यात इतर कोणतेही ध्येय नसते. आपण लग्न करतो, मुले जन्माला घालतो, मग त्यांच्या शिक्षणाचा विचार करतो आणि ती मोठी झाल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा बाळगतो आणि मग त्यांचे लग्न करतो आणि मग त्यांची मुले…. हे असे चक्र चालूच असते. या प्रक्रियेत आपण काय गमावत आहोत? तुमचा मुलगा तुमच्या इच्छेनुसार जन्माला आला आहे का? तो त्याच्या इच्छेनुसार जन्मला आहे का? ही सर्व रहस्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रिपुरा रहस्य माहित असणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला ते समजू शकणार नाही.

ही रहस्ये जाणून घेण्यात केवळ गुरूच आपल्याला मदत करू शकतात. हे आत्म तत्व आहे. माणूस हे शिकण्यासाठी जन्माला आला आहे. आपला जन्म ते मृत्यू हे एक मोठे महाविद्यालय आहे. आपण सर्वजण या महाविद्यालयात शिकत आहोत. परमात्म्याने आपल्याला हे महाविद्यालय दिले आहे. ही कर्मभूमी आहे - हि अशी जागा आहे जिथे आपल्याला सर्व क्रिया/ कर्म करण्याची आवश्यकता असते. आपण फक्त एकत्र येत असतो परंतु आपल्या जन्माच्या मुख्य उद्देशाकडे लक्ष देत नाही. हे आत्म तत्व जाणून घेण्यासाठी आपण फक्त एकच जन्म नाही तर असंख्य जन्म घेतले आहेत. तरीसुद्धा आपण ह्या जन्मात ते शिकण्याचा प्रयत्न करत नाही.

आपण आपल्या मुलांची जबरदस्तीने लग्न करून देतो. नंतर काही चुकीचे घडल्यास आपण त्याकडे लक्ष देत नाही. प्रत्येकजण निसटण्याचा प्रयत्न करतो. लग्नाची इच्छा नसलेल्या मुलाला किंवा मुलीला कोणीही पाठिंबा देत नाही. लग्न केलेच पाहिजे आणि मुले जन्मायलाच हवीत, असे सगळ्यांचे म्हणणे असते. ते विचित्र परिस्थिती निर्माण करतात. गृहस्थाश्रम किंवा गृहस्थ असणं चुकीचं आहे का? नक्कीच नाही! पण ज्याला रस नाही अशा व्यक्तीवर जबरदस्ती का करावी? ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी ते करा. मुलंपण त्यांच्या जीवनाची निवड करतात. ह्याबाबत तुम्ही त्यांना त्रास का देता? त्यांना लग्न करण्यास भाग पाडणे हे पाप आहे. त्यांच्या समस्येंसाठी तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्हाला त्यास तोंड द्यावे लागेल. तुमची त्या त्रासातून सुटका नाही. म्हणून, असे म्हटले जाते की लग्न जमविण्यात मध्यस्थ असणे सगळ्यात वाईट असते. यापेक्षा मोठे पाप नाही. माझ्या मते, हे पाच ‘महापातकां’पैकी एक आहे. हरिश्चंद्र उपख्यान पुस्तकात कर्म उपासनेचा खंड जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला हे कळेल. आपण एखाद्यावर जबरदस्ती का करावी? त्यांना त्यांच्या नशिबावर आपण का सोडू शकत नाही का? त्या जबाबदारीतून बाहेर पडा आणि आनंदी राहा. त्यात गुंतून राहू नका. जग बदलले आहे. माणूस माणुसकीने वागत नाही. त्यांची मन, मतं बदललेली आहेत. आत्ता आलेला विचार अगदी पुढच्या क्षणी बदलतो. माणूस वासना, क्रोध, अहंकार, अभिमान आणि अपमानाने भरलेला आहे. आपण दिवसेंदिवस हे वाढवत आहोत. हे आपल्यातून बाहेर पडले पाहिजे. देवाला किंवा गुरूंना आपले जीवन समर्पित करण्याच्या अवस्थेस तुम्ही पोचणे आवश्यक आहे. रागाच्या भरात गुरूंनी काही सांगितले तर तुम्हाला अपमानित वाटते. जर तुम्ही हे समजून घेतलेत तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. पण नाही. तुम्हाला हा अपमान वाटतो. तुम्हाला हे जर समजले तर तुम्हाला त्रिपुरा रहस्य समजेल.

आतापर्यंत मी ज्याबद्दल बोललो ती परशुराम अवस्था आहे. मी जे बोललो त्यात नवीन असं काहीच नाही. परशुरामात हि प्रवृत्ती असल्याने त्याने पाप केले. त्याने आपल्या वडिलांच्या आज्ञा पाळल्या पण कर्मापासून तो वाचू शकला नाही. त्याने आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास प्राधान्य दिले आणि तो आपल्या कर्माचा सामना करण्यास तयार होता. आता आपण त्रिपुरा रहस्याबद्दल बोलू या. भगवान दत्तात्रेयांचा ह्यातील प्रवेश महत्त्वपूर्ण आहे. जरी ते प्रत्यक्ष सामील झाले नाहीत, तरी त्यांनी आपल्या शिष्याद्वारे आत्मज्ञान दिले.

आज देवीच्या रहस्याबद्दल थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. प्रत्येक अध्यायाची, प्रत्येक घटनेची स्वतःशी तुलना करा. तरच, आपण हे समजू शकाल. याला उपदेश किंवा दीक्षा असे म्हणतात. या कथा नाहीत. आपण ते अनुभवायला हवे, जाणून घ्यायला हवे आणि त्यातच जगले पाहिजे. प्रत्येक पात्रात स्वत: ला पहा. तरच, तुम्ही हे कायमचे लक्षात ठेवू शकता.

त्रिपुरा रहस्याची सुरवात एका प्रश्नाने होते - शाश्वत आनंद म्हणजे काय? धर्माचा प्रचार करण्यासाठी कोणीतरी धर्माच्या बाबतीत अपशब्दांचा वापर करायला हवा. तरच, कोणालातरी त्याबद्दल चीड येईल आणि तो प्रचार करण्यास सुरवात करेल. हे रिव्हर्स इंजिनियरिंग आहे. उत्तर प्रदेश ह्या राज्यात काही लोक रावणसुराचे कौतुक करतात मग इतर संतप्त होतात आणि रामाची स्तुती करण्यास सुरवात करतात. हे एक तंत्र आहे ज्याचा उपयोग सद्गुरूं आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी करतात. त्रिपुरा रहस्यामध्ये हे दिसून येते. हा खरा उपदेश आहे. मग सद्गुरूंच्या इतर अनौपचारिक शब्दांचे काय? ते देखील उपदेश आहेत.

माझ्यासाठी वेळ खूप अनमोल आहे. मला तो वाया घालवायचा नाही. जरी मी तुम्हाला ओरडलो तरी ते तुमच्या असंख्य जन्मांचे काही कर्म काढून टाकण्यासाठी असते. तुम्ही हे समजू शकत नाही. तुमचा अपमान होतो. म्हणूनच, तुम्ही माझे शिष्य होण्यास पात्र नाही. मी तेव्हाच या मतावर आलो. गोष्टी तुम्हाला कठोर वाटतील. परंतु मी तुमचे कर्म काढून टाकत असतो. तुमचे कर्म काढून टाकण्यासाठी मी स्वतःस तुमच्या पातळीवर येतो. हे माझे कर्म आहे. पण मी हे आनंदाने करतो कारण मला पराशक्तीने नियुक्त केले आहे. मी ते आनंदाने करत आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागला तरी मला त्याचे काही वाटत नाही. मला ते करावेच लागेल. मुलाचा ताप कमी व्हावा म्हणून इंजेक्शन द्यावे लागते. तुम्ही ते द्याल की नाही? हे देखील त्यासारखेच आहे. बरेच लोक म्हणतात स्वामीजी असे का बोलत आहेत? अशा लोकांना मी सोडून देतो. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी फक्त त्यांचे क्षेमकुशल विचारतो. मी त्यांच्याशी फक्त सामान्य मानवांप्रमाणेच वागतो. माझ्या हृदयात त्यांना स्थान मिळत नाही. या सर्वांवर त्रिपुरा रहस्यात चर्चा केली आहे. मला हे सर्व माहित असल्याने मी तुमच्याशी असे वागतो. भाऊ, बहीण, काकी, काका इत्यादी सर्वसामान्य मानवी नातेसंबंध असलेल्यांप्रमाणे मी वागत नाही. समाज, मित्र वगैरे माझ्या अजिबात जवळपास नसतात. मी फक्त तुम्हाला आणि मला पाहतो. फक्त आपल्या दोघांनाच पाहतो. जर तुम्ही हे स्वीकारले तर तुम्ही जिंकलात, नाहीतर तुम्हाला तुमचे पतन होत असल्याचे दिसेल. तरीपण मी तुम्हाला पहातच राहीन. तुम्ही एखाद्या विशिष्ट पातळीवर पोहोचल्यानंतर तुमचे अध:पतन होऊ नये. गुरूंच्या कथा वाचा आणि ऐका, मग तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील.

आई आपल्या मुलाला त्याच्या चांगल्यासाठीच ओरडते. मला छोटी छोटी उदाहरणे द्यायची नाहीत. गंगा नदीचे पाणी प्यायल्यानंतर, मी जर तुम्हाला सांगितले कि तुम्हाला मुक्ती मिळेल तर तुम्ही म्हणाल की त्यात रोगाचे सूक्ष्मजंतू आहेत? काही वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनीसुद्धा हे सिद्ध केले आहे की गंगा जलाने शुद्धी होते. जर ते चुकीचे असल्यास, कोट्यावधी लोक गंगा स्नान करतात. मग त्यातील जीवाणूचे प्रमाण किती असावे? हे समुद्राला विषारी बनवते. गंगेत आपली पाप धुवून काढण्याची शक्ती आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो. लक्षात ठेवा, आपण हि संधी गमावल्यास, ती परत मिळविणे अवघड आहे. मी तुमच्याबरोबर चांगले वागेन. मला तुमचे दोष दिसत नाहीत. माझ्यासाठी सर्वजण समान आहेत. मी सांगत राहतो कि त्यांच्यासाठी काही काळ वाईट असू शकेल परंतु त्यांना पुढे चांगला काळ येईल. जर तसे झाले नाही तर ते त्यांचे कर्म आहे. मी शाप का देऊ? मुलाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे फक्त आईलाच माहित असते. एखाद्या रुग्णाला काय आवश्यक आहे हे फक्त डॉक्टरांनाच माहिती असते. सोनार अग्नीत सोनं घालून एक चांगला अलंकार बनवतो, मला तुमच्या सर्वांचे सुंदर दागिन्यांमध्ये रूपांतर करण्याची इच्छा आहे. जर तुम्ही म्हणालात कि, माझा अपमान करु नका, तर मी तुम्हाला सोडण्यास तयार आहे. मी काय करू शकतो? मी तुम्हा सर्वांना माझ्यापेक्षा उच्च पातळीवर नेऊ इच्छितो. जर माझे शिष्य गैरसमज करून घेत असतील तर मी का त्रास करून घेऊ? मी एका चांगल्या शिष्याच्या शोधात आहे. मला अशी एकही व्यक्ती सापडली नाही. आपण सर्व फक्त भक्त, मित्र आणि नातेवाईक आहात. हे सर्व शब्द त्रिपुरा रहस्यामधील संवर्तन महर्षींचे आहेत.

ही आपली कथा आहे. त्रिपुरा रहस्य म्हणजे श्री गणपति सच्चिदानंद स्वामीजींचे रहस्य.आहे. बाकी काही नाही. फक्त नावं वेगळी आहेत आणि काळ भिन्न आहे. मला त्रिपुरा रहस्याच्या मूळ ग्रंथाबद्दल बोलायचे आहे.

देवी मातेबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला त्रिपुरा रहस्य माहित असणे आवश्यक आहे. देवी सप्तशतीदेखील तिच्याबद्दल बोलते. काही पुराणांत तिच्याबद्दल स्पष्टीकरण देखील दिले आहे परंतु जर आपल्याला याबद्दल विस्तृतपणे माहित हवी असेल तर ते केवळ त्रिपुरा रहस्याद्वारे शक्य आहे. हे दोघांमधील संभाषण आहे. हे एक रहस्य आहे. आपण यावर विचार केला तर आपण समजू शकू. पण आपण कोणामार्फत जाणून घेऊ शकतो? स्वामीजींनी तुम्हाला जर नवावरण पूजेचा परिचय करून दिला नसता तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असती का? आपल्या अडचणींवर तोडगा शोधण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आला आहात. स्वामीजींनी तुम्हाला त्यांच्याकडे वळवले आहे आणि पुजा वगैरे करून देवीमातेकडे आकर्षित करून देवी मातेचे तत्व सांगितले आहे. तर, आता तुम्हाला ते तत्व कसे कळले? ते तुम्हाला स्वामीजींच्या माध्यमातून कळले, बरोबर? मी तुमच्या समस्येवर उपाय सांगून तुम्हाला परत पाठविले तर तुम्हाला हे तत्व कळेल का? नाही. कारण, तुम्ही माझ्याशी जास्त संवाद साधत नाही. अशावेळी तुम्हाला तत्त्व कळेल का? भजन कळेल का? शिव कोण आहे ते तुम्हाला कळेल का? तुम्हाला पूजा कशी करायची ते कळेल का? तुम्ही फक्त आरती बघाल, घरी जाऊन जेवलं आणि झोपाल. त्याखेरीज आणखी काही घडणार नाही. जर मी हे सर्व केले नाही तर तुम्हाला आत्म तत्व कधीच कळणार नाही.

त्रिपुरा रहस्य कोणाच्यातरी संभाषणातून देखील अस्तित्वात आले. इतरजण स्वामीजींच्या तत्त्वाबद्दल शिकत आहेत. तुम्हा सर्वांना ठाऊक नाही. तुम्ही फक्त इथे बसला आहात. बस इतकेच. तुम्ही याबद्दल विचार करण्याचा प्रयत्न देखील करीत नाही. तुम्ही माझे मालक नाही. मी उठून गेलो तरी कोणीही मला प्रश्न विचारू शकत नाही. ही माझी इच्छा आहे. कोण अपमान करीत आहे? कोणाचा अपमान होत आहे? मला सांगा. गुरूंच्या निवासस्थानी अपमान कोणता? आपण येथे समाज स्थापन करत नाही. आपण गुरुच्या उपस्थितीत सर्वकाही विसरणे आवश्यक आहे. तरच, तुम्ही इथे असण्यायोग्य आहात. मला हे सर्व सांगण्याची गरज नाही. मूर्तिकारांकडून असंख्य वेळा ठोके बसल्यानंतरच ती मूर्ती योग्य स्वरूप धारण करते आणि मंदिरात पूजा करण्यास पात्र ठरते. आकार देण्यापूर्वी तो दगड तिथेच पडला होता. तुम्ही येथे येण्यासाठी किती जन्म घेतले हे तुम्हाला माहिती आहे काय? तुमच्या पापांची किती स्पंदन माझ्यापर्यंत पोचतात हे तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नमस्कार करता तेव्हा माझी जबाबदारी किती वाढते हे तुम्हाला माहित आहे का? इतके लोकं मला नमस्कार करतात ह्याचा मला आनंद होत नाही. जेव्हा कोणी एकाने नमस्कार केला नाही तेव्हा त्याची जबाबदारी मला घ्यायला लागणार नाही ह्याचा मला आनंद होतो. तुम्हाला माझ्या समस्या माहित आहे का? हे सर्व गुरु रहस्य आहे, हे त्रिपुरा रहस्य देखील आहे. आज सकाळी जेव्हा बाल स्वामीजी हा विषय घेऊन माझ्याकडे आले तेव्हा मला ह्याचे विवरण करण्याची संधी मिळाल्यामुळे मला आनंद झाला. मी अजूनपर्यंत या विषयाला स्पर्श केला नव्हता. आता देवी मातेने हि परिस्थिती निर्माण केली. चांगले आहे. ही फक्त एक निर्देशसूची आहे. जसे आपण आपले प्रतिबिंब आरशात पाहतो तसेच आपल्याला त्रिपुरा रहस्य समजण्यासाठी स्वतःला सर्व पात्रांमध्ये पहाण्याची आवश्यकता आहे.

तुम्हाला वाटते का स्वामीजींबरोबर असणे म्हणजे लहान मुलांच्या खेळासमान आहे? माझ्याशी बोलण्याचीसुद्धा तुम्हाला भीती वाटली पाहिजे. मी अग्नी आहे. मी या व्यासपीठावर बसून तुम्हाला सत्य सांगत आहे. मी ज्वालामुखीसामान आहे.. मी त्यास आत ठेवला आहे. मी तुमच्यासाठी जगतो आहे. मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. तुम्ही सर्वजण माझ्याकडे आलात. तुमच्या इतर इच्छा असू शकतात परंतु कमीतकमी काहींना तरी आध्यात्मिक इच्छा असणे आवश्यक आहे. मी तुमच्या प्रेमात अडकलो आहे. जरी मी त्यातून बाहेर पडू शकत असलो तरी मी त्यातून बाहेर पडणार नाही.

हे माते! तू त्रिपुरा रहस्यातून परिचित आहेस. तु शिव प्रिय आहेस. तू गौरी, लक्ष्मी, वाणीचे रूप आहेस. तिचे वर्णन फक्त अशा स्वरुपात केले आहे. ज्याप्रमाणे मुलाने जेवावे यासाठी त्याला प्रथम त्याच्या आवडीचा पदार्थ खाण्यास दिला जातो, त्याचप्रमाणेच देवीचे वर्णन देखील आपल्या आवडीच्या स्वरूपात केले आहे. पण ही तीन रूपं म्हणजे तिचे स्वरूप नाही. जे स्वभावाने सात्विक आहेत त्यांच्यावर ती दया दाखवते. भगवान शिव तसे असल्यामुळे तिला ते आवडतात. ते तुमच्या स्वामीजींप्रमाणे भोळे आहेत. त्याच्या मनात कोणतेही नकारात्मक विचार नाहीत. तुमच्या स्वामीजींच्या मनात काहीही नसते. मी लिहिलेले भजनदेखील विसरतो. मी नावं विसरतो. संपूर्ण रामायण मनात असले तरी मी रामाचे नाव विसरतो. माझ्या मनात मलिनता नाही. ती तुमच्यात असते. ती घाण आहे. स्वत: ला स्वच्छ करण्यासाठी मी तुम्हाला साबण देतो. मातांच्या लीलांमधून मांगल्य प्रकट होते. ती लीला प्रत्यक्ष दर्शवत नाही. हे माते! ज्यांच्यावर तुझी कृपा आहे, त्यांची सतत भरभराट होते. ही आर्थिक किंवा कीर्तीतील भरभराट नसून समाधानातील असते. हे गिरिजा माते! तू गुरु स्वरूपिणी आहेस. कृपा करुन माझ्यावर दया कर. माझी तुझ्यावरची भक्ती शेवटपर्यंत टिकू दे! आपण हे मिळविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपण फक्त मुले, पैसे, घरे, बढती वगैरे गोष्टी मागतो.. माते!,कोणत्याही परिस्थितीत माझे मन सतत तुझ्यावर स्थिर राहो. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस . मी तुझी सेवा करत आहे

जय त्रिपुरे माता:! जय बालांबिके परे! जय भक्त प्रिये नित्यम! जय कारुण्य विग्रहे! जय श्री त्रिपुरे माता:!

या नवरात्री दरम्यान भगवान दत्तात्रेयांनी शिकविलेले श्री त्रिपुरा रहस्य आपण सर्वजण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया!

आत्मा, बुद्धी, शक्ती, इंद्रीय आणि इतर सर्व ठिकाणी देवीमाता व्याप्त आहे. ती योगशक्तीच्या रुपात आहे. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडीत तिचा निवास असतो.

त्रिपुरा मातेवर चिंतन केल्याने आत्म ज्ञान आणि मुक्ती मिळते. आत्म ज्ञान प्राप्त केल्यानंतरच मोक्ष किंवा मुक्ती मिळते. बरेच लोक आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते मोक्षाची विचारणा करतात. हा कॅन्टीनमध्ये मिळणारा डोसा नाही. तुम्हाला मोक्ष कोठे मिळेल? तुम्हाला मोक्ष कसा मिळेल? अनेकांना मोक्षतत्व माहित नाही. आत्मसिद्धी नंतरच ते मिळू शकते.

देवीची उपासना केल्यास कल्याण होते हे खरे. परंतु ते पुरेसे नाही. तुम्हाला तत्व माहित असणे आवश्यक आहे. तिची सेवा केल्याने, तिची स्तुती केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या सर्व क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही ज्ञान मिळवा आणि तुम्हाला मुक्ती मिळेल. तिचा लिखित जप केल्याने चांगले शिक्षण प्राप्त होते. हे सर्व कर्माशी किंवा कृतीशी संबंधित आहे. तिची पूजा करणे देखील कर्म आहे. होम करणे हे पण कर्म आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तिन्ही रूपांमधील जीविंच्या उर्जेस त्रिपुरा शक्ती म्हणतात. तिच्याबद्दल जाणून घेणे आत्म ज्ञान आहे. हे सर्वात उत्तम शिक्षण आहे. कोणीही हे शिकवत नाही. आपण कर्म सिद्धांतात जगतो आणि त्यातच मरतो, त्यामुळे पुनर्जन्म होतो. म्हणून, ज्ञानींनी या कर्मांना नकार दिला परंतु प्रथम ते केल्यानंतरच. त्रिपुरा 3 प्रकारचे दु: ख दूर करते. हे शरीर लाखो जंतूंनी भरलेले आहे. हे कर्म शरीर आहे. त्यावर फक्त कर्मानेच मात करता येते.

उद्या आपण परशुरामांबद्दल बोलू.

Tags: