SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25-12-2020
श्रीनिवास कल्याणम् ०३: वेंकटेश्वर भगवान सर्वोच्च ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान करतात.

भगवान वेंकटेश्वर परब्रह्म असल्यामुळे जरी त्यांना कोणत्याही नावाने हाक मारली तरी ते प्रतिसाद देतात. ते परब्रम्हाचे प्रकट स्वरूप आहेत, आमच्या ऋषी मुनींनी स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही नावाला ते प्रतिसाद देतात. जेव्हा आपण व्यंकटरमणा म्हणाल, तेव्हा ते आपला त्रास दूर करण्यासाठी संकट हरण बनून धावत येतात. जेव्हा आपण नमः शिवाय म्हणाल तेव्हा ते त्रिशूल घेऊन येतात आणि आपले दुःख निवारण करतात. त्यांना बाला देवीचे नाव देण्यात आले आहे, ते बालाजी अशा नावाने बोलाविले तरी आपले रक्षण करण्यासाठी धावत येतात. प्रत्येक गोष्टीची एक व्यवस्था असावी म्हणून ‘गोविंदा’ असे म्हणत वेद स्तुतीगान करतात. ‘गोविंदा’ नावात विश्व्व्यापी आकर्षण असल्याने प्रत्येकजण त्यांना ‘गोविंदा’ म्हणू लागला. ज्ञानाचा खजिना आणि शाश्वत ऐश्वर्य त्यांच्यात आहे, म्हणून त्यांना ज्ञानेश्वर्य असे पण म्हणतात सर्व ऋषी आणि महापुरुषांनी त्यांना श्रीनिवास असे नाव दिले. ते परब्रह्म असल्याची पुष्टी झाल्यामुळे त्यांना गोविंदा संबोधले गेले. ते ऐश्वर्य आणि ज्ञानाचा मुख्य स्रोत आहेत. आपल्यातील बहुतेकजण ज्ञानाची चिंता करीत नाहीत परंतु ऐश्वर्याची आस धरतात आणि ते मिळविण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की आपण देवाला जे देतो त्याच्या कित्येक पटीने तो आपल्याला देतो. आपण भगवंतास व्यावसायिक अस्तित्व बनविले आहे. भगवान वेंकटेश्वर देखील व्यावसायिक दृष्टीकोनातून तयार आहेत कारण भक्त अज्ञानी आहेत आणि म्हणूनच त्यांना ज्या गोष्टी अर्पण केल्या जातात त्याच्या कित्येक पटीने भगवंत ते परत करतो. त्याच्या स्मरणाने सर्व पापं धुतली जातात. वेंकटेश किंवा गोविंदा अशी हाक मारुन, नामस्मरण करून लोकं पापमुक्त होतात. तर्क, शास्त्र आणि वेदात आम्ही निपुण नाही. आम्ही तार्किक वाद घालू शकत नाही, आम्ही फक्त नामस्मरण करू शकतो. अनिष्ट तार्किक विश्लेषणात गुंतल्यामुळे आपली भक्ती कमी होते. म्हणून आपला युक्तिवाद इथेच संपवू या. पालय गोविंदा शेषा चलपती गोविंदा !! कलियुगातील प्रत्यक्ष देव म्हणजे श्रीनिवास. तो गोविंदा आहे. तो कित्येक युगांपासून इथे आहे. तो अत्यंत सामर्थ्यवान आहे. त्याचे प्रकटीकरण अलौकिक आहे. भगवान विष्णूच्या इतर सर्व प्रकटीकरणाच्या तुलनेत हा अवतार खूप वेगळा आणि विशेष आहे. तो सात पर्वताचा ईश्वर आहे. अडचणीत असताना त्याची पूजा केली जाते. तिरुमलामध्ये राहणारा तो तिरुमल ,निवासी आहे. अनाथांचा रक्षक आहे. गोविंदा गोविंदा… पावलो पावली आपण त्याची कीर्ती गात राहतो . आपण आपल्या प्रत्येक श्वासामध्ये त्याचे नाव उच्चारतो. श्वास घेताना त्याचे नाव घेतो, श्वास सोडताना त्याचे नाव घेतो. पापणीच्या प्रत्येक उघडझापीला त्याचा नामजप करण्याचा अभ्यास करा. नामाने आपल्या शरीरातील प्रत्येक मज्जातंतू व्यापला पाहिजे आणि गंगेसमान शरीरातील रक्तप्रवाहाच्या बरोबर सतत त्याचे नाम प्रवाहित असावे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात गोविंदा असा नामजप चालू राहावा. माझ्या आयुष्यात मला चांगल्याशी किंवा वाईटाशी सामना करावा लागला तरी तू माझा प्रभु आहेस. वैकुंठातून खाली आलेल्या महाविष्णूचे स्वरूप भगवान वेंकटेश्वरशिवाय इतर कोणी नाही. आपण कितीही त्याची स्तुती केली तरी ती अपुरी ठरेल. ब्रह्मप्रमाणेच वेंकटेश्वर निर्मिती करत आहे, विष्णूप्रमाणेच तोही जगाचे पालन पोषण करत आहे आणि रुद्राप्रमाणे लय करत आहे. आपण ज्याप्रमाणे घरातील जुन्या वस्तूंची विल्हेवाट लावतो आणि नवीन वस्तू आणतो, त्याप्रमाणे तो सुद्धा सर्व काही काढून टाकत आहे. परंतु काही लोकांचा असा विश्वास असतो की गोष्टी जमा करणे, अगदी त्यांच्या पूर्वजांनी वापरलेल्या असल्या तरी ते त्यांचे सुदैव असते. परंतु वेंकटेश्वरने प्रत्येक अवतारात शरीराचा अंतही केला आणि त्याने त्या अवताराचाही शेवट केला. आपण स्वतः ह्या जगात कायमचे नाही हे समजून घेतले पाहिजे आणि नंतर ऐहिक संपत्ती गोळा करण्याच्या गरजेबाबत स्वतः:ला प्रश्न विचारला पाहिजे. आपण जमा केलेली घाण देव नाहीशी करू शकत नाही, म्हणून देव स्वत: त्या व्यक्तीचा शेवट करतो. काही लोक पूर्वजांचे मृतदेह जमा करतात. एकदा पेरूमध्ये लोकांनी स्वामीजींना त्यांच्या घरात देव आहे असे सांगून घरी बोलावले. खोल्यांच्या आत खोल्या होत्या. जेव्हा त्यांनी सर्वात आतली शेवटची खोली उघडली तेव्हा त्यांच्या पूर्वजांचे मृतदेह तेथेच होते. त्याची खूप दुर्गंधी येत होती. स्वामीजी लगेचच त्यांच्या घराबाहेर पडले. चैतन्य नसलेली शरीरं त्यांनी जतन केली होती. रुद्र म्हणतो की आपण जर ती टाकली नाहीत तर तो टाकेल.
प्रत्येक मनुष्याने अशा अद्भुत भगवान श्रीनिवासाची उपासना केली पाहिजे. प्रत्येक मनुष्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या जीवनाचे चार पुरुषार्थांचे आचरण करून जन्म सार्थक केला पाहिजे. जो असे आचरण करत नाही त्याचे जीवन व्यर्थ असते. परमात्म्याचे तत्व शिकण्याची एक सुवर्णसंधी ह्या जन्मात मिळाली आहे.. आपल्याला आपल्या वडिलधाऱ्यांनी सल्ला दिला आहे की आपण एक मिनिट, एक तास किंवा एक दिवसही वाया घालवू नये. पण आपण आपला जन्म वाया घालवत आहोत. खचितच हा अन्याय आहे. ह्या स्वामींचे तत्व, वैराग्य, रूप जाणून घेण्याच्या ह्या अद्भुत संधीचा लाभ आपण घेत नाही. आपला बहुतेक वेळ झोपेत, क्रोधात, आनंदात , अनावश्यक गोष्टीत/ लोकांत, जास्त विचार करण्यात वेळ घालवतो, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळांवर वेळ घालवतो - आपण संपूर्ण जन्म वाया घालवत आहोत. काही वेळाने, हे आपल्या लक्षात येईल आणि म्हातारपणात एक पुस्तक उघडाल. परंतु आपण एखादे पान वाचून कंटाळून जाल कारण तुम्हाला कधीच त्याची सवय नाही. आळस आणि अज्ञान हे आसुरी स्वभावाचे लक्षण आहे. ते आपले शत्रू आहेत. आपण प्रयत्न केला पाहिजे. परत परत प्रयत्न केला पाहिजे . महान कृत्ये करण्याचे आपण ध्येय ठेवले पाहिजे. जीवन वाया घालविणाऱ्या माणसापेक्षा जो मरण पावला किंवा जो जन्मलाच नाही तो खूप चांगला आहे. एखाद्याचा पुनर्जन्म का होत नाही? मुक्ती मिळवल्यावरच हे शक्य आहे. आयुष्यात काहीतरी प्राप्त करणे किंवा साध्य करणे हे माणसाचे ध्येय असावे. जो माणूस कोणतीही गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्नही करीत नाही त्याचा जन्म व्यर्थ असतो.

Tags: