ते परमेश्वराचे प्रकट स्वरूप आहे. परमेश्वर तिरुमलावर प्रकट झाले . प्रत्येकजण त्याची शक्ती आणि दिव्यत्वाचा अनुभव घेतो. आपल्याला त्याचे तत्त्व आणि चमत्कार ऐकावेसे वाटतात. असे दिव्य व्यंकटेश्वर स्वामी कोण आहेत? त्यांचे तत्व काय आहे? परमेश्वराचे तत्त्व सामान्य माणसाला समजावून सांगावे लागेल. जर कोणी विचारले की मूर्ति कोणती आहे? आणि टेकडी कोणती आहे? आणि तेथे सात टेकड्या का आहेत? त्याचे समाधान करण्यासाठी आपल्याला त्यास परमेश्वराचे माहात्म्य सांगावे लागेल. आपण सात टेकड्यांवर चढून दर्शन घेतल्यावर आपले काम संपत नाही. बर्याच वेळ प्रार्थना केल्यानंतर, शेवटी मुलीचे लग्न झाले किंवा 30 वर्षांच्या संघर्षानंतर कोर्टाचा खटला संपला इतके सांगून आपले काम संपत नाही. हा महिमा नाही. आपल्याला सर्वांना सांगण्याची गरज आहे की ऐहिक प्राप्ती,यश हा परमेश्वराचा चमत्कार नाही. तो गोविंदा आहे. तो प्रत्यक्ष देव आहे. तोच आपला रक्षणकर्ता आहे हे आपल्याला सांगावे लागेल. उपनिषदांमध्ये असलेला परमेश्वर आहे. व्यंकटेश्वर हे नाव किती योग्य आहे. आपण कित्येकदा उपनिषद, तर्क, शास्त्र ह्यावर चर्चा करतो, भगवान वेंकटेश्वर हे या सर्वांमध्ये लपलेले ब्रह्म स्वरूप आहे. ते परमेश्वराचे प्रकट स्वरूप आहे. परमेश्वर तिरुमलावर प्रकट झाले . प्रत्येकजण त्याच्या शक्तीचा दिव्यत्वाचा अनुभव घेतो. त्याचे तत्त्व आणि चमत्कार आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात
परमेश्वर निराकार आहे परंतु आपले अज्ञान दूर करण्यासाठी वेंकटेश्वराने हे स्वरूप धारण केले. ज्योतीतील चैतन्याने सगुण स्वरूप धारण केले आणि परमेश्वराच्या रूपात प्रकट झाली. स्वरूप धारण केलेला निराकार असतो. परंतु, आपल्यासारख्या सजीवांच्या हितासाठी, त्याने या कथेत एक रूप धारण केले. जेव्हा कोणतेही रूप नसते तेव्हा ते केवळ तेज, प्रकाश स्वरूप असते. आपण ज्योतीरुपाचा मंत्र आणि ज्योतिमध्ये लपलेले चैतन्य याची तुलना विश्वातील अस्तित्वात असलेल्या कोणत्याही स्वरूपाशी करीत आहोत. ज्योति रुपाची पूजा करण्याचे कारण हेच आहे. त्या ज्योति स्वरूपाने आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हितासाठी एक रूप धारण केले आहे. जे निर्गुण आहे त्याची सगुण होण्याची क्षमता आहे. परमात्मा सगुण स्वरूपात प्रकट होतो. परमात्म्याचे गुण कसे असू शकतात याबद्दल आपण वाद घालत राहतो आणि प्रश्न विचारत राहतो. परमात्मा निर्गुण आहे. तो सगुण दिसल्यामुळे, तो गुणांसह आल्यामुळे ,त्यास सगुण मानले जाते. सगुण आहे तर परमेश्वर कुठेआहे? असे प्रश्न लोक विचारतात. जो सगुण दिसतो तीच निर्गुण मूर्ति आहे. आणि निर्गुण रूप गुणासहित आहे, जे सगुण स्वरूपी आहे ते निर्गुण स्वरूप म्हणून बघितले जाते. जर मी असेच बोलत राहिलो तर तुम्ही मला वेडा म्हणाल कारण मी काय बोलतो हे तुम्हांला समजत नाही. तुम्ही वेडे आहात कारण तुम्हाला मुळीच समजत नाही. मी तुमचे वेड घालवू शकत नाही, म्हणून मी वेडा आहे. अशाप्रकारे आपण दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे वेडे लोक आहोत. पण आपल्या दोघांमध्ये एकच तत्त्व आहे आणि ते म्हणजे वेडेपणा. वेडेपणा हा एक प्रकारचा भावातिरेक आहे. ज्योति रूप ही मन व्यापुन टाकणारी कल्पना आहे. आपले अज्ञान आणि त्यांचे ज्ञान एकत्र येऊन निर्गुण स्वरूप निर्माण होते.
एका ताकाच्या थेंबामुळे दुधाचे दही बनते. दह्याच्या एका थेंबाने एवढ्या शक्तिपूर्ण दूध आपले गुणधर्म गमावते. दुध आपली द्रव स्थिती गमावून पूर्णपणे भिन्न स्वरूपात, घन स्थितीत रूपांतरित होते. दुधापासून दही, दह्याचे ताक, ताक घुसळले कि त्यातून लोणी येते. लोणी उकळल्यावर तुम्हाला तूप मिळते आणि वाफ निघून जाते. सतत दुधाच्या स्वरुपात बदल होत त्याचे वाफेच्या स्वरूपात रूपांतर होते आणि ती वाफ अदृश्य स्वरूपात वातावरणाशी एकरूप होते. जेव्हा आपण आपल्या केसांना तेल लावतो तेव्हा तेल शरीरात शोषले जाते आणि आतील उष्णता बाहेर टाकली जाते. प्रत्यक्षात तेल टाळू किंवा त्वचेत शोषले जात नाही. पण लोक म्हणतात की तेल उष्णता शोषून घेतो. पंचकर्म ह्या आयुर्वेदिक उपचारात असेच काही दिसून येते, जिथे शरीरात अस्तित्वात असलेले विकार दूर करण्यासाठी सूक्ष्म छिद्रांद्वारे तेल शोषले जाते. शोषण्यापेक्षा बहुतेक तेलाचे बाष्पीकरण होते. हे तेल शरीराच्या बारीक छिद्रांमध्ये जाऊन शरीराचा तो भाग बरा होतो. शंख आणि चक्र नसलेली विष्णू मूर्ती, माया मूर्ती, डमरू, त्रिशूळाशिवाय असलेली शिव सांब मूर्ती , वेलायुधाशिवाय कुमारस्वामी. विष्णु, कुमार स्वामी, बाल देवी आणि शिव यांच्या सर्व शस्त्रास्त्रांचा संकेत आम्ही देत आहोत. बाला देवी स्पष्ट दिसत नाहीत पण व्यंकटेश्वर स्वामी बालाजी आहेत! तुम्ही बाल त्रिपुरा सुंदरीसारखे दिसत असला तरी पण आम्ही तुम्हाला तसे म्हणू शकत नाही. व्यंकटेश्वर स्वामी हे परमेश्वराचे किती मोठे प्रकटीकरण आहेत. आपल्या रूपाचे वर्णन मी कसे करू? तुम्ही विष्णू आहात? शिव आहात?आपण एकीकडून पाहिले तर शिव, दुसरीकडून पाहिले तर विष्णू, कुमार स्वामीसारखे दिसता, बालात्रिपुरा शक्तिरूपात दिसता. जो निराकार आहे अशा स्वामीस परब्रह्म म्हटले आहे. पुरूषै वेदं सर्वम्। म्हणजे हा पुरुष परब्रम्ह , सगळ्या रूपात विहार करणारा. अन्नमाचार्य परमेश्वराचे दर्शन घेऊ शकले परंतु परमेश्वराच्या गोचर स्वरूपाचे वर्णन करु शकले नाहीत. ‘शिरी लेनी अभय हस्तमुन गंठी’, अन्नमय म्हणाले. त्यांना अद्भुत अनुभव आले. अन्नामय्यांनी असंख्य कीर्तन लिहिली त्यात परमेश्वराचे वर्णन केले होते आणि ते त्यात पूर्णपणे बुडून गेले, त्यांनी बरेच चिंतन केले आणि शेवटी भगवंताला “परब्रह्म” म्हणून जाणले. परंतु अन्नामय्या स्वत:च्या अनुभवाचे स्पष्ट वर्णन करू शकले नाहीत. शेवटी त्यांना वैराग्य आले. त्यांनी त्रिशूल, नामा, शंखू, चक्र इत्यादींची स्तुती केली आणि त्यांना समजले की वेंकटेश्वर परब्रह्म आहे. तो टप्पा गाठण्यासाठी आपल्याला बरेच प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि बरेच धडे शिकावे लागतील. आपण त्या भावनेचा अनुभव घेतला पाहिजे आणि परब्रह्म नाम, सतत घेत राहिले पाहिजे. आपल्याला “परब्रह्म” समजलेल्या सर्व विद्वानांची नावे घ्यावी लागतील आणि मग त्यांचे अनुसरण करावे लागेल. अन्नामय्या, ज्यांनी असंख्य महासागर आणि अनुभवांचे, अडचणींचे पर्वत ओलांडले आणि मग त्यांना परमेश्वराचे खरे स्वरुप कळले तसेच आपण बाल्यावस्था पार करुन वृद्धावस्थेत पोहोचलो आहोत. अध्यात्मातही ह्या अवस्था पार कराव्या लागतात. व्यंकटरमणा संकटहरणा असे म्हणत दिव्य अनुभव घेऊ या. ध्यान, मनन, चिंतन करून आपल्याला खूप अभ्यास करून परब्रह्मांचा अनुभव घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण त्या अवस्थेचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण परब्रह्म हे नावही उच्चारू नये. ज्यांनी परब्रह्म अनुभवला आहे ते आनंदात असतात. त्या सर्वांनी व्यंकटेश्वर स्वामी यांना परब्रह्म म्हटले. व्यंकटेश्वर स्वामी परब्रह्म असल्याने ते कोणत्याही नावाला प्रतिसाद देतात. वेदांनी गोविंदा म्हणून त्यांची स्तुती केली. त्यांच्यापाशी अफाट ज्ञान आणि ऐश्वर्य आहे .. म्हणून त्यांना ज्ञानेश्वर्य असे म्हणतात काहीजण त्यांना श्रीनिवास म्हणतात तर काहीजण गोविंदा म्हणतात. ते ज्ञान आणि ऐश्वर्याचा खजिना आहेत.
आपण जरी परमेश्वराचा फक्त एक सेकंदासाठी विचार केला तरी सर्व पापं नष्ट होतील. तरीही ब्रह्मण पर्यंत पोहोचण्याइतकी उच्च पातळीची चर्चा आपण करू शकत नाही. श्रीनिवास… .गोविंदा….