SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin-Ma on 21-12-2020
श्रीनिवास कल्याणम् 0१: परिचय

श्री गणेशाय नम:। श्री सरस्वत्यै नम:। श्री पाद वल्लभ नरसिंह सरस्वती, श्री गुरु दत्तात्रेयाय नम:।। ओम नमो व्यंकटेशाय आपल्याला इथे प्रवचन करण्यास, ऐकण्यास मिळत आहे हे आपले भाग्य आहे . आपल्या पूर्वपुण्याईमुळे आपल्याला हे ऐकायला मिळत आहे. भागवतम्, श्रीनिवास कल्याणम, रामायण, महाभारत आणि सूक्ति - हे सर्व हजारो वेळा ऐकण्यासारखे आहे. हे ऐकण्यासाठी आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील, एक जीवन काल पुरेसा नाही. “मी कोण आहे?” तुम्ही कोण आहात? मी तुमच्यात आहे किंवा तुम्ही माझ्यामध्ये आहात आणि आपण दोघेही एक आहोत” ह्या विचारांची चर्चा आपल्या मनात सतत चालू असते. जो हे “ऐक्य”अनुभवतो त्याला दिव्यत्वाचा अनुभव येतो. भागवतातील गोष्टींचा हा आत्मा आहे. ही खरोखर कथा नाही. ह्या गोष्टी आपल्या मनातील व्यथा दूर करतात. भागवतात भगवान श्रीकृष्णाच्या कथेद्वारे आध्यात्मिक तत्वज्ञान शिकविले आहे. आपण भगवान श्रीकृष्णाची कथा ऐकत आहोत असे म्हणण्याऐवजी आपण स्वतःची कथा ऐकत आहोत आणि त्या कथेत आपले स्थान किंवा अस्तित्व शोधत आहोत असे समजून आपण त्यावर चिंतन केले पाहिजे. त्या कथेतील आपले अस्तित्व आपण शोधले पाहिजे. आपण ज्या पानावर स्वतःला पाहू शकतो त्या पानाचा विचार करत ते पान शोधणे आवश्यक आहे. अशी दिव्य कथा जी आपल्याला आध्यात्मिक तत्व शिकवते ती म्हणजे श्रीनिवास कल्याणम्. मन आणि बुद्धीचे ऐक्य म्हणजे कल्याणम्. श्रीनिवास कल्याणम ऐकून आपल्यातील गंगा नदीच्या पाण्याने अरिषद् वर्गाचा नाश होतो. भागवताचे प्रवचन ऐकून आपल्या मनातील सर्व नकारात्मक कंपन निघून जातात. आपले अज्ञान दूर करण्यासाठी, भगवान श्रीनिवास दु: ख सहन करतात आणि अज्ञानी असल्याचे दर्शवितात. आपल्याला आपले अज्ञान किंवा जीवनातील धडे शिकवण्याकरिता ते आपल्यात एकरूप होतात आणि आपल्याला आपले दोष समजून घेण्यास प्रवृत्त करतात. आपल्याला आरसा दाखवून, आपण कसे आहोत आणि आपले तत्व काय आहे ह्याचा ते आपल्याला उपदेश करतात. आपण पुन्हा आरसा बाजूला ठेवतो. शेवटी आरसा तो आरसाच राहतो. तिथे जे अस्तित्वात असते, तो परमात्माच असतो. परमात्मा आरशाच्या स्वरुपात आपली प्रतिमा दाखवितो. शेवटी तो आपल्याला आपले स्वतःचे स्वरूप समजून घेण्यास भाग पाडतो. हे एखाद्या आरशातील प्रतिबिंबसारखे आहे. आपण त्याच्याकडे केवळ आरसा म्हणून दुर्लक्ष करतो. आरशामागे पारा असल्याने प्रतिमा तयार होते असे आपण मानतो. ती उर्जाच परमात्मा असतो. अशी दैवी उर्जा, जी दिसते पण अदृश्य असते, ती उपयुक्त वाटली तरी खरोखर उपयुक्त नसते, ती चवदार दिसते पण खरोखर चवदार नसते, सगळीकडे गोचर असते आणि अगोचर स्वरूपात प्रतिबिंबित होते. आपला चेहराच हाच परमात्म्याचा चेहरा आहे. आपण म्हणतो की हा माझा चेहरा आहे हे अज्ञान आहे. ह्या कथांचा प्रवाह ही भावना खोडून टाकते. आज आपण अशा कथांच्या प्रवाहात प्रवेश करीत आहोत. भजनः पल्लवि: श्रीकरा धीकरा श्री गणपति देवरा भयहरा जयकरा लंबोदर कावरा देव आहे का? आहे तर मग तो कुठे आहे? जे लोक अशा प्रकारे खूप प्रश्न विचारतात त्यांना श्रुती, स्मृती, उपनिषद, तर्क, वेद, शास्त्र आणि पुराण सांगण्याची किंवा त्याचा आधार दाखविण्याची, सिद्ध करण्याची गरज नाही, कोणत्याही चर्चेची गरज नाही. अशा लोकांना समजावून सांगण्याची गरज नाही. त्यांच्याशी हट्टीपणाने वाद घालण्याची गरज नाही. ज्यांची खरोखरच उत्तरे नाहीत अशा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही, अशा सर्व लोकांसाठी आपण तिरुपतीच्या टेकड्या आपल्या हातांनी दाखवू शकतो. वास्तवात घडलेली कहाणी आपण जर त्यांना सांगितली तर त्यांचा विश्वास बसेल. आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी भगवान वेंकटेश्वराच्या वैभवाची साक्ष पाहात आहोत. मानव ज्या गोष्टी करू शकत नाही अशा काही क्षुल्लक गोष्टींबाबत अनावश्यकपणे आपण भगवंताबद्दल बोलतो. मानव ज्या गोष्टी, जे चमत्कार करू शकत नाही त्या गोष्टी, ते चमत्कार जेव्हा घडतात, तेव्हा आपण असे म्हणतो की इथे देव आहे. पण आपण सिद्ध करण्यात अपयशी ठरतो. परंतु तिरुमला हा ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. सूर्यासारखा नित्य तेजस्वी भगवान वेंकटेश्वर आपल्याला पाहावयास मिळतो. जे ह्यास मूर्ती म्हणतात ते मुर्ख आहेत. आपल्या दत्त व्यंकटेश्वराच्या वैभवाचे फक्त स्मरण करा. दररोज, वेद आणि नादाने वातावरण दुमदुमत असते. सुंदर सजववलेलया तेजस्वी मूर्तीतच स्वामी प्रत्यक्ष विराजमान आहेत असे वाटते. परमेश्वर तिरुमलावर प्रकट झाले. प्रत्येकाला त्यांच्या शक्तीचा आणि दिव्यत्वाचा अनुभव आला. भगवान वेंकटेश्वरांचे तेज आणि दिव्यत्व अतुलनीय आहे. जेव्हा आपण आपले डोळे बंद करुन प्रार्थना करतो तेव्हा ती मंगल मूर्ती डोळ्यासमोर प्रकट होते. ते प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. ते या पृथ्वीवर प्रत्यक्ष प्रकट झाले. आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो असे ते परमात्मा आहेत. प्रत्येकाला भगवान वेंकटेश्वराच्या कृपेचा अनुभव येतो. परमेश्वराचे अनुभव आपले औत्सुक्य वाढवितात आणि आपल्याला अधिकाधिक ऐकण्याची आवड निर्माण होते. परंतु आपण दिव्य स्वामींचे वर्णन शब्दात पूर्णपणे करू शकत नाही. वेंकटेश्वर भगवान कोण आहेत? त्यांचे तत्व काय आहे? आपल्याला सर्वसाधारण/अनभिज्ञ माणसाला परमेश्वराचे तत्त्व समजावून सांगावे लागते. जर कोणी विचारले की मूर्ति कोणती आहे? कुठला पर्वत आहे? आणि तेथे सात टेकड्या का आहेत? तर आपल्याला परमेश्वराचा महिमा सांगावा लागेल. आपण सात टेकड्यांवर चढून दर्शन घेतल्यावर माझे काम संपले किंवा जर आपण असे म्हटले तर बऱ्याच वेळ प्रार्थना केल्यावर शेवटी मुलीचे लग्न झाले.असे सांगून आपले काम संपत नाही. हे चमत्कार नाहीत. आपल्याला सर्वांना सांगायला पाहिजे की ऐहिक सफलता/ प्राप्ती हे परमेश्वराचे चमत्कार नाहीत. तो गोविंदा आहे. तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे. हा परमेश्वर आपला रक्षणकर्ता आहे हे आपल्याला सांगावे लागेल. तोच परमेश्वर उपनिषदांमध्ये आहे.

Tags: