(व्हिडिओचा थोडा भाग गहाळ झाला आहे. भाषांतरात संपूर्ण भाग समाविष्ट आहे). कुजंतं राम रामेती मधुरं मधुराक्षराम आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलं अर्थ - मी वाल्मिकी नावाच्या गोड कोकिलेस नमस्कार करतो, जे स्वत: कविता नावाच्या शाखेवर बसले आहेत.आणि मधुर, गोड स्वरात ‘राम, राम’ गात आहेत. . अंजनानंदनं वीरं जानकी शोक नाशनम् कपिशं अक्षहंतारं वंदे लंका भयंकरम् अर्थ - जो अंजना देवीचा पुत्र आहे आणि सर्व वानरांचा नेता आहे , ज्याने अक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्याने सीतेचे (जानकी) दु: ख दूर केले आणि लंकेमधील सर्व राक्षसात भय निर्माण केले अशा हनुमानास मी नमन करतो. वेद वेदये परे पुमंसी जाते दशरथात्मजे वेद: प्राचेत दासीत साक्षाद रामायणात्मना रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नमः।
अर्थ- जो रामचंद्र आणि रामभद्र आहे, जो संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे. रघुकुळात सर्वश्रेष्ठ आहे, सीतेचा पती आहे, अशा रामचंद्रांस माझा नमस्कार
या प्रार्थनेनंतर आपण आता शतश्लोकी रामायणात प्रवेश करत आहोत. तपस्वाध्याय निरतं तपस्वि वाग्विदां वरम् नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनीपुंगवम। श्रीमद रामायण ही या सृष्टीतील सर्वात आरंभीची रचना (आदि काव्य) आहे. मंत्रांपैकी सर्वांत महान म्हणजे गायत्री मंत्र. हे रामायण गायत्री मंत्राएवढे शक्तिशाली आहे यावर जोर देण्यासाठी, महर्षि वाल्मीकी या रामायणाची सुरूवात अक्षर ‘त’ (त-कार) ने केली. गायत्री मंत्राची सुरूवातही ‘त ’ या अक्षरेपासून होते ह्याचे स्मरण आपण इथे करू या. जो व्यक्ती तपश्चर्येत आणि वेदांच्या अभ्यासामध्ये सदा मग्न असतो त्याला वैदिक विद्वानांपैकी सर्वात श्रेष्ठ म्हटले जाऊ शकते. मुनींत सर्वश्रेष्ठ नारद महर्षी, तपस्या संपन्न वाल्मिकी महर्षी, यांना तपश्चर्येची आवड होती, त्यांनी महर्षि नारदांकडे संपर्क साधला आणि त्यांना खाली सांगितलेल्या पद्धतीने विचारले. असा या स्तोत्रामागे अर्थ आहे. आपण आता या स्तोत्रातील अंतरार्थ समजून घेऊ या. रामायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाव्याची सुरवात तपश्चर्येसमयी सुरू झाली आणि ‘तपस’ या शब्दापासून सुरुवात झाली. प्रत्येकाला भगवंताबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने तपश्चर्या करावी. ज्यास अध्यात्मिक गुरूंकडून मंत्र दीक्षा मिळाली असेल त्याने त्याचा जप प्रत्येक दिवशी अनिवार्यपणे केला पाहिजे. या बाबतीत दुर्लक्ष स्वीकार्य नसते. ज्यांना आपल्या गुरूंकडून कोणतीही मंत्र दीक्षा प्राप्त झालेली नाही त्यांनी प्रत्येक दिवशी न चुकता परमेश्वर नामस्मरण केले पाहिजे.
‘जपतो नास्ती पातकम्’ म्हणजे नामजप आणि तप (तपश्चर्या) करणार्यांना पापं लागत नाहीत, असे सगळ्या शास्त्रात सांगितले आहे. ‘स्वाध्याय’ म्हणजे स्व अध्याय. ‘स्व’ म्हणजे स्वयं किंवा स्वतःशी संबंधित. ‘अध्याय’ म्हणजे अभ्यास. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने अनिवार्यपणे, कोणताही निष्काळजीपणा न करता, न चुकता आत्म-अभ्यासामध्ये व्यस्त रहावे. येथे अभ्यासाचा अर्थ पूर्वी शिकलेल्या गोष्टींचे पुन्हा स्मरण करणे इतकाच नसून नवीन ज्ञान प्राप्त करणे असा सुद्धा आहे. अत्यंत ज्ञानी संतांची संगत विकसित केली पाहिजे. जे शिकले आहे ते शक्य तितके इतरांना सांगावे. हे महत्वाचे धडे ‘तपस्वाध्याय निरतम्’ या वाक्यांशात लपलेले आहेत. स्तोत्रातील पुढील शब्द म्हणजे ‘तपस्वी’. वरचेवर पहाता असे दिसते की वाल्मिकी महर्षी स्वत: ला ‘तपस्वी’ म्हणून संबोधून स्वत: ची प्रशंसा करीत आहेत. परंतु ते तसे नाही. अपवादात्मकरित्या दीर्घ काळ प्रखर तपस्या केल्यावरच वाल्मिकी महर्षींना अद्भुत महाकाव्य रामायण लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले. श्री रामाची कृपा प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करणे अत्यंत आवश्यक आहे. नारद वाल्मिकींचे सद्गुरु होते. आपण बर्याच वेळा चर्चा केली आहे की गुरूशिवाय माणूस आपले ध्येय गाठू शकत नाही. प्रत्येकजण गुरु होऊ शकत नाही. नारद हे अफाट आणि असीम ज्ञानाचे भांडार होते. ते परमेश्वराचे एक निस्सीम भक्त असून विनम्र आणि निरहंकारी होते. महर्षि वाल्मीकी यांनी आपले प्रश्न महर्षि नारदांसमोर मांडले. आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या सगळ्यांसमोर आपली शंका मांडणे योग्य नाही. शंका समाधानासाठी आपण केवळ अशा व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे जी चांगल्या प्रकारे आणि पूर्णपणे शंकेचे निराकरण करू शकेल.
‘नारा’ म्हणजे सर्व जगात, लोकात ज्ञान प्रदान करणारा. म्हणूनच सर्व जगात,लोकात ज्ञान प्रदान करणारा तो नारद, असे नाव पडले. म्हणूनच सूज्ञपणे महर्षि वाल्मीकि नारदांजवळ आले. त्यांच्याकडे गेल्यावर, “तुम्ही नेहमीच सगळ्यांना ज्ञान देत असता. मलापण थोडे द्या” असा अनादर करणारा दृष्टीकोन वाल्मिकींनी दाखविला नाही,. उलट, नम्रता आणि भक्तीभावाने वाल्मिकी नारदांजवळ गेले. त्यांनी भक्तीभावाने नारदांची सेवा केली आणि मग आपले प्रश्न विचारले. या कारणासाठी, ‘परिप प्रच्छ’ हा शब्द वापरला गेला आहे. या महर्षींचे खरे नाव वाल्मीकी नव्हते.ही त्यांना दिलेली एक उपाधी होती. असे म्हटले जाते की जोपर्यंत ‘मी’ आणि ‘माझे’ ही भावना पूर्णपणे सोडून देत नाही तोपर्यंत गुरूंची कृपा प्राप्त होत नाही. ॥ ओम् सीता रामभ्याम् नम: ॥