SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
दत्त स्तवम्‌ – श्लोक ७

सर्व रोग प्रशमनम्‌ सर्व पीडा निवारणम्।
विपदुद्धरणम्‌ वंदे स्मर्तृगामी सनोवतु ।।

मानवी इच्छांचे सामान्यपणे दोन विभागात वर्गीकरण होऊ शकते.

  • नवीन सुखसोयींचा आनंद घेण्याची इच्छा
  • असलेले दु:ख दूर व्हावे.

प्रत्येक मिनिटास मानव नवीन सुखसोयींच्या शोधात असतो. त्यांना कधीतरी नवीन खाण्यासाठी हवे असते किंवा नवीन चैनीची वस्तू पाहिजे. ह्या सर्व गोष्टींची किंमत मोजावी लागेल ह्याची भीती त्यांना नसते. त्याच वेळी ते आपल्या दु:खातून लवकरात लवकर सुटका मिळविण्याचा प्रयत्न करतात. ह्या दोन्हीपैकी दुसऱ्याची इच्छा खूपच जास्त असते. सुरुवातीच्या काळातील महान संतांनी स्पष्ट केले होते की आपली दु:खातून सुटका ही मानवाची सगळ्यात मोठी इच्छा असते.

प्रभू ह्या समस्येचे निराकरण कसे करतो ह्याचे स्पष्टीकरण स्वामी वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.

सर्व रोग प्रशमनम् : शारिरीक, मानसिक आणि साधनेशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या रोगाचा नाश करतात.

ह्यात शारीरिक आजार, मानसिक आजार आणि साधनेशी संबंधित आजारांचा समावेश आहे. शरीराचे विकार / आजारपण ह्या शब्दांशी सर्वजण परिचित आहेत. मानसिक आजार म्हणजे मनाची चंचलता आणि ज्ञान / सापत्नभाव ह्यांचा अभाव. अशा लोकांना ते काय करत आहेत हे समजत नाही. अहंकार (स्वत:चे महत्त्व) वगैरे साधना संबंधित रोग आहेत.

साधना अहंकार म्हणजे काय? याचा अर्थ आध्यात्मिक यशात अभिमान बाळगणे. मी साधनेतील विशिष्ट स्तरावर पोहोचलो आहे. मी आता भविष्य सांगू शकतो. माझी चक्र तरंगत आहेत.मला विस्मयकारी प्रकाश दिसतो . मला आता सर्व काही ज्ञात आहे. आता मी उपदेश सुरू करू शकतो.’’ असा विचार हाच एक रोग आहे. ह्या अहंकाराने नम्रतेस वाट करून द्यायला पाहिजे.

माणसात विनम्रता जसजशी वाढते तसतसा साधना अहंकार नाहिसा होतो. जेव्हा साधना अहंकार हा रोग नाहिसा होतो तेव्हा शरीराचे रोग नाहीसे होतात. जेव्हा शरीराचे रोग नाहिसे होतात. तेव्हा मानसिक रोग नाहीसे होतात. हे तिन्ही एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत.

“मला माहीत आहे, मला माहीत आहे.’’ हा अहंकारच सर्व रोगांचे मूळ आहे. बुद्धी अकार्यक्षम होण्याचे हे कारण आहे. जेव्हा मन विचलित होते तेव्हा शारीरिक आजार दिसून येतात. ह्या कारणांसाठी अहंकार पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.

दत्त प्रभूंचा आश्रय घेतल्याने हे तिन्ही रोग नाहिसे होतात.

ह्या रोगांव्यतिरिक्त काही पीडा (अति यातना) आहेत की ज्या माणसाला त्रास देतात. त्या आठ प्रकारच्या असतात. म्हणूनच आपल्या अकल्पनीय यातना, कष्ट सांगण्यासाठी लोक `अष्ट – कष्ट’ ह्या शब्दाचा वापर करतात.

सर्व पीडा निवारणम्‌ - माणसाला सतावणारे अष्ट कष्ट तो दूर करतो.

  1. देश/मातृभूमि सोडून पळून जाणे.
  2. पती पत्नी यांचे विभक्त होणे.
  3. अति दारिद्र‍्य़ाने ग्रस्त असताना नातेवाईक दारात उभे राहणे.
  4. इतरांचे उरलेले अन्न खायला लागणे
  5. जबरदस्तीमुळे शत्रूशी मैत्री करावयास लागणे
  6. दुसऱ्यांच्या इच्छेनुसार दिलय गेलेल्या अन्नाची उत्सुकतेने वाट पाहणे.
  7. निराशा आणि अडचणी
  8. पूर्ण गरिबी

ह्याचे वर्गीकरण अष्टकष्टात केले आहे. मातृभूमी सोडून पळून जाण्यासाठी विविध कारणे असू शकतात. आपले नाव खराब होणे, कोणी प्रिय व्यक्तीने फसविणे, इतरांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ असल्यास, मुलांनी वाईट नाव आणल्यास वगैरे. हा खूप दु:खद अनुभव आहे.

पती पत्नी एकमेकांचे चांगले सहधर्मचारी असतात म्हणून विभक्त झाल्यास खूप वेदना होतात. जेव्हा गंभीर आर्थिक तणाव असतो. अशा वेळी नातेवाईक येतात किंवा मित्र कर्ज मागतो. यजमानासाठी ही एक खूप अवघड परिस्थिती असते.

जीवन काही वेळी माणसास अशा परिस्थितीत ढकलते की त्याला अन्नासाठी भिक मागावी लागते किंवा दुसऱ्याचे उरलेले अन्न खावे लागते, ही खूप मोठी समस्या आहे. शत्रूशी मैत्री करणे पण खूप कठीण असते. कुत्र्याप्रमाणे कोणीतरी येऊन खाण्यास देण्याची वाट पाहाणे ही आणखी एक भयानक परिस्थिती आहे.

गंभीर नैराश्यात जाऊन स्वत:चा द्वेष करणे ही आणखी एक गंभीर समस्या आहे. अशा व्यक्तीस स्वत:च्याच विरुद्ध पूर्वग्रह असतो आणि ते कायम असंतुष्ट असतात. शेवटी मी इतकी सुंदरही नाही, माझ्याकडे कोणी पाहिले तरी का? मी अकार्यक्षम आहे.

शेवटचे परंतु कमी नसलेले म्हणजे पूर्ण गरिबी. अशा वेळी मित्र त्या व्यक्तीपासून दूर जातात. गंभीर आजारामुळे कमी लेखले जाते, समाजाकडून देशद्रोही/ विश्वासघातकी म्हणून ओळखले जाणे, अभ्यास करण्यास असमर्थ, मंद बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान कष्टाने मिळविलेले सर्व पैसे गमाविणे ह्या सर्व गोष्टी अष्ट कष्टाचा भाग आहेत.

दत्त प्रभू सर्व अष्ट कष्टांचे निवारण करतो. म्हणून सर्वपीडानिवारणम्‌ अशी त्यांची स्तुती केली आहे.

दत्त स्तवम्‌ हा एक अतिशय कठीण आणि अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. कलीयुगात स्वत: दत्त भगवानांनी ह्या महान मंत्राचा उपदेश केला. हा मंत्र प्राप्त करणे सोपे नाही.

विपदुद्धरणम्‌ - सर्व प्रकारच्या भयंकर दुर्दैवातून तो त्या व्यक्तीस बाहेर काढतो.

जणू काही जीवनातील समस्या कमी होत्या म्हणून अगदी गंभीर परिस्थितीत आणखी थोड्या समस्या डोक्यावर येतात. ज्या माणसाचा हात जखमी आहे त्याच्याशी याची तुलना करता येईल. घाव अजून बरा होत असतो परंतु लोक येतात आणि त्याच ठिकाणी मारतात. मग त्याची अवस्था काय होईल? प्रत्येक कठीण परिस्थितीत दत्त भगवान त्या व्यक्तीस वाचवू शकतात. ते एकमेव आश्रय आहेत. ते त्याला हळूवारपणे समस्यातून बाहेर काढतील आणि त्याला अशा उंचीवर ठेवतील की तो ह्या सर्व गोष्टींपासून अप्रभावित राहील. म्हणूनच आपण जर त्यांची पूजा केली तरी पुरेसे आहे.

वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार

स्मर्तृगामी सनोवतु - स्मरण करताच जो तत्क्षणी प्रतिसाद देतो तो परमेश्वर सगळ्यांचे रक्षण करो.

Tags: