सुरुवातीला आपण चर्चा केली होती की, प्रत्येक श्लोक/मंत्र ह्याचा उपयोग तीन हेतूंसाठी करता येतो – ऐहिक, आमुश्मिक आणि पारमार्थिक. ह्या श्लोकात जे ऐहिक परिणाम मिळू शकतात आणि ते त्या व्यक्तीस सर्वोच्च पारमार्थिक अवस्थेत कसे घेऊन जातात ह्याचे सविस्तर वर्णन दिले आहे.
**सर्वानर्थ हरम् देवम् सर्व मंगल मंगलम्। **
**सर्वक्लेश हरम् वंदे स्मर्तुगामी सनोवतु।। **
वरवर पाहाता सर्वानर्थ हरम्’ आणि
सर्व क्लेशहरम्’ ह्या समान स्वरूपाच्या वाक्यांशाची पुनरावृत्ती झाली आहे असे वाटते आणि तो गंभीर अडचणीतून सुटका करतो असा अर्थ त्यातून सूचित होतो. परंतु दोन्ही शब्दांचा हेतू वेगळा आहे.
सर्वानर्थ हरम् देवम् सर्व मंगल मंगलम: अनर्थ म्हणजे ज्या गोष्टी निरुपयोगी/फायदेशीर नसलेल्या/ अयोग्य आहेत. त्यांच्याप्रति इच्छा विकसित करणे. त्यांच्याकडे कल असणे हे सर्व दु:खाचे मूळ आहे. त्या काढून टाकणे अत्यावश्यक आहे.
सर्वसाधारणपणे लोक जगातील निरुपयोगी आणि अपव्ययी म्हणता येईल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतात. जगातील वस्तूंपैकी काही त्यांना आवडत नाहीत आणि काही त्यांच्या मते पवित्र आणि मंगल असतात. उदा. वासरू किंवा मंदिर हे पवित्र मानले जाते. ह्या गोष्टींना पवित्र का मानले जाते? त्यांना पावित्र्य कोणी दिले?
ह्या वस्तूंना / गोष्टींना मांगल्य प्रदान करणारी शुभशक्ती म्हणजेच सर्व मंगल मंगलम्’. जेव्हा ह्या शक्तीवर लक्ष /ध्यान केंद्रित होते तेव्हा सर्व अनर्थ आपोअप धुऊन जातात. माणूस आपले ध्यान / लक्ष परमपावित्र्यावर कसे केंद्रित करू शकतो? तो हे योगातून करू शकतो. आता योगमार्गातही काही अडचणी आहेत. योग साधनेतील अडचणींना
क्लेश’ म्हणतात. ते पाच आहेत.
-
अविद्या 2) अस्मिता 3) राग 4) द्वेष 5) मरण भय वरील पाचही प्रकारचे क्लेश (सर्व क्लेश हरम्) परमेश्वर नाहिसे करतो आणि आपली योग साधनेच्या मार्गात प्रगती होईल ह्याची खात्री करतो. योग साधनेच्या प्रगतीत आपले लक्ष निरुपयोगी अयोग्य गोष्टींऐवजी (सर्वानर्थ हरम्) परिपूर्ण सत्याकडे (सर्व मंगल मंगलम्) परिवर्तीत होण्याचे कारण तो असतो.
वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार स्मर्तुगामी सनोवतु - स्मरण करताच तत्क्षणी येणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो. !