SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
दत्त स्तवम्‌ – परिचय

श्री गणेशाय नम:
श्री सरस्वत्यै नम:
श्री पादवल्लभ नृसिंह सरस्वती,
श्री गुरू दत्तात्रेयाय नम:

स्वामी वासुदेवानंद सरस्वती रचित दत्तस्तवम्‌ हा एक महान मंत्र आहे. हा मंत्र म्हणण्यापूर्वी प्रत्येकाने गुरू परंपरेचे स्मरण करावे. त्या स्मरणातूनच त्या मंत्रातील ऊर्जा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या सर्व गुरूंचे स्मरण करा – श्री गुरू, परम्‌गुरू, परत्परगुरू आणि त्यापुढील…..

ह्या मंत्रात प्रारंभी आपण जो ज्ञानदेवता आणि विघ्नहर्ता आहे त्या गणपती देवाचे स्मरण केले आणि त्या कारणासाठी श्री गणेशाय नम:’ असे उच्चारण केले. त्यानंतर ज्ञानदेवता आणि पीठासीन शक्ती देवतेचे चिंतन केले. ही देवी दुसरी कोणतीही नसून सरस्वती देवी आहे म्हणून आपण श्री सरस्वत्यै नम:’ असे म्हटले.

`सरस्वती’ ह्या शब्दाचे तीन अर्थ आहेत.

  1. ती ब्रह्माची पत्नी आहे. ती रजोगुण रूपिणि आहे. ब्रह्मा रजोगुण स्वरूपात आहे. ती सृष्टी विज्ञानाच्या ज्ञानाचा वर्षाव करते.
  2. ती पराशक्ती देवीचा अवतार आहे. पराशक्ति देवी तीन स्वरूपात प्रकट झाली, महाकाली, महास्वरस्वती, महालक्ष्मी. तिला १८ हात आहेत आणि ती दानवांचा नाश करते. ती रजोगुण स्वरूपात आहे.
  3. ज्ञान मार्गातील श्री विद्येच्या ज्ञानात ही देवीमाता `मंत्रिणी’ हे नाव धारण करते. जी सत्व गुण रुपिणि आहे.

जेव्हा आपण `श्री सरस्वत्यै नम:’ असे उच्चारतो तेव्हा ह्या सगळ्या अर्थांचे स्मरण करावे. आता आपण दत्तात्रेय मंत्राकडे जाताना ह्या पद्धतीनुसार आपण गुरू दत्तात्रेय परंपरेचे स्मरण करायला हवे. दत्तात्रेय परंपरेने कालानुसार आपल्याला सगळ्यात जवळ असलेला दत्त अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती. ते प्रामुख्याने महाराष्ट्रातील गाणगापूर येथे राहिले. त्यांचे पूर्वाअधिकारी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी होते. ते प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील पिठापूरम् येथे राहिले.

गुरू परंपरा खूप विशाल आहे. परंतु ह्या परंपरेत आपण फक्त ह्या दोन महान संतांचे स्मरण करतो. त्यानंतर आपल्याला हा मंत्र ज्या गुरूंनी दिला (मंत्रगुरू) त्यांचे स्मरण श्रीगुरू’ अशा शब्दांनी करतो. त्यांचे पूर्ण नाव स्मरण करण्याची आवश्यकता नसते. फक्त श्रीगुरू’ म्हटले तरी पुरेसे आहे. म्हणूनच गुरू परंपरेत असे शब्द आहेत. `श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती श्रीगुरू’

नियमितपणे आपण जरी बऱ्याच देवाची पूजा करत असलो तरी प्रत्येकाची एक प्रमुख पीठासीन देवता असते. आपण इतर सर्व देवतांना त्या प्रमुख पीठासीन देवतेचे अंग किंवा प्रकट स्वरूपात पाहावे. हे तत्व समाविष्ट करताना आपल्याला दत्तात्रेय भगवानाचे स्मरण होते. सर्व देवता आपल्या प्रमुख देवतेची अंग आहेत अशी भावना मनात आणून त्यांना आपण नमस्कार करतो, म्हणून आपण म्हणतो `दत्तात्रेयाय नम:’

`नम:’ शब्दाचे महत्त्व आणि गुरूंना नमस्कार करण्याची पद्धत – नम: हा शब्द असे सूचित करतो की आपण माझे रक्षणकर्ता आहात. मी आपला सेवक आहे.’’ अशा भावनेने त्या व्यक्तीने आनंदाने, प्रेमाने आणि पूर्ण विनम्रतेने परमेश्वरास शरण जावे.

जेव्हा ह्याचा खरा अर्थ कळतो तेव्हा थोडीसुद्धा लाज, शरम न वाटून घेता त्याने मनासापून साष्टांग नमस्कार घालावा. दुसरी लोकं आपल्याकडे पहात आहेत का ह्याची चिंता त्याने करू नये. आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांचे अस्तित्व विसरून जाऊन फक्त ह्या सृष्टीत मी आणि परमेश्वर आहे असे मानावे. `मी जीवात्मा आहे आणि तो परमात्मा आहे. आम्ही दोघेच फक्त अस्तित्वात आहोत. अशी प्रबळ भावना मनात आणावी. असं सांगितले जाते की नमस्कार करताना त्या व्यक्तीने आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना सुद्धा विसरावे. भक्ताने असे विचार करावा की इथे फक्त मी आणि माझे गुरू बसले आहेत. दुसऱ्यासमोर वाकल्याने आपला अधिकार, प्रतिष्ठा कमी होते असे वाटून असमंजसपणे वागू नये. ह्याचे प्रतिक म्हणून प्राचिन काळी राजे आपला मुकुट काढून, घोड्यावरून उतरून नंतर गुरूंना नमस्कार करायला जायचे.

नम: चा अर्थ इथे दोघे नसून, एकचजण अस्तित्वात आहे. माया अस्तित्वात नाही. जग हे दुसरे काही नसून फक्त माया आहे. जेव्हा ह्या अर्थाचा खोलवर ठसा उमटतो तेव्हा अशी भावना निर्माण होते. – हा जिवात्मा म्हणजे मी आणि परमात्मा म्हणजे तुम्ही आपण दोघे एकच आहोत. अशा भावनेने अद्वैत साधना करावी. केलेल्या नमस्कारात हे परमतत्त्व असते.

पुरुषांनी आठ अंग(अष्टांग) जमिनीस टेकवून साष्टांग नमस्कार घालावा. पाठीचा कणा आणि डोके सरळ रेषेत असावे. दोन्ही हात डोक्यासमोर पुढे नेऊन तळवे एकत्र जुळवावे. छाती जमिनीला टेकवावी. बायकांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने साष्टांग नमस्कार करावा. पुरुषांच्या पद्धतीने बायकांनी साष्टांग नमस्कार केला तर त्यास दोष मानतात. सर्वसाधारणपणे पुरुषसुद्धा बायकांच्या पद्धतीने नमस्कार करत नाहीत. परंतु निकडीच्या प्रसंगी ते बायकांच्या पद्धतीने नमस्कार करू शकतात.

एक कमळ डोक्यात/हृदयात असते. हात जोडून डोक्यावर नेणे हे दुसऱ्या कमळाचे प्रतिक आहे. ह्या नमस्कारात प्रतिकात्मक संदेश असतो - हे परमेश्वरा मी माझे हृदय तुझ्या हृदयात विलिन करत आहे. अशा प्रकारे मी तुझ्यात एकरूप होत आहे.

डावा हात जीवात्म्याचे प्रतिक आहे आणि उजवा हात परमात्म्याचे प्रतिक आहे. दोन्ही हात जोडून हृदयाशी धरणे असे सुचित करते की जीवात्मा आणि परमात्म्यातील विभक्तता नाहीशी झाली आहे आणि फक्त केवलात्मा (परम आत्मा) राहिला आहे. ` मी अस्त्विात नाही फक्त तूच अस्तित्वात आहे.’ सद्‌गुरूंना पाहिल्यावर खाली सांगितल्यापैकी एका प्रकाराने नमस्कार करावा. हात जोडून छातीशी धरणे हात जोडून डोक्यावर उचलणे साष्टांग नमस्कार दोन्ही हात डोक्यापुढे जोडून. (जमिनीवर पालथे पडून) इतर कोठलाही नमस्कार स्वीकार्य नसतो. एका हाताने नमस्कार करू नका. मिलिटरीच्या पद्धतीने सॅल्युट ठोकू नका. जरी ते आदराचे प्रतीक असले तरी त्याचा पूर्ण नमस्कार म्हणून स्वीकार होत नाही.

नमस्कार करताना व्यक्तीची आंतरिक भावना खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

नमस्कार करताना तुम्ही त्यांच्यात एकरूप होत आहात असे माना. अशी शुद्ध भावना मनात आणा – जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत. सद्‌गुरूस्वरुपात परमात्मा माझ्यासमोर बसले आहेत. मी जीवात्मा आहे. मी त्यांच्यात एकरूप होत आहे. आता फक्त परमात्मा अस्तित्वात आहे. तो केवलात्मा आहे. हे परमतत्व नम:’ ह्या शब्दात समाविष्ट आहे. असा अंतिम अर्थ नम:’ ह्या शब्दाला आहे.

नमस्कार करण्याच्या विविध पद्धतीतून तुमच्या हृदयास खोलवर स्पर्श करणारी पद्धत निवडा. तिन्ही पद्धतीतील एक पद्धत निवडण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. त्याच्यातील अर्थ तत्वाचे पालन करा आणि सर्व वेळ त्यावर मनन, चिंतन करा. प्रत्येक वेळी नमस्कार करताना मनात म्हणा, श्री गणेशाय नम:, श्री सरस्वत्यै नम:, श्री पादवल्लभ नृसिंह सरस्वती श्री गुरू दत्तात्रेयाय नम: अशा वेळी ह्या प्रार्थनेचे तत्व तुमच्या हृदयात भरू दे.

ही अंतिम देव–गुरू मूल परंपरा आहे. ह्यापेक्षा श्रेष्ठ परंपरा दुसरी कुठलीही नाही. ह्याचे कारण म्हणजे दत्त हा सर्व देवतांचा पण गुरू आहे. ह्या कारणासाठी दत्त परंपरेस देव गुरू मूल परंपरा असे म्हणतात. हा मंत्र म्हटल्यानंतर जर स्वत:ची दुसरी गुरू परंपरा असली तर त्याचे स्मरण करावे.

अशा प्रकारे आपल्या गुरूपरंपरेचे स्मरण केल्यानंतरच आपण मंत्राकडे वळावे.

प्रत्येक मंत्र तीन हेतू पूर्ण करतो.

ऐहिक – मंत्र सांसारिक हेतुसाठी वापरू शकतो. उदा. अडचणी, दु:ख दूर करणे, सुखसुविधा प्राप्त करणे. ``हे परमेश्वरा! आम्हाला या अडचणीतून बाहेर काढ. अशी प्रार्थना ती व्यक्ति करते. आमुश्मिक – भक्ति, धर्म भावना, अध्यात्मिक विचार वगैरे वाढण्यासाठी हा मंत्र म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपले रुपांतर अध्यात्मिक व्यक्तीत होते. पारमार्थिक – हा मंत्र निस्वार्थपणे म्हटला जातो आणि ज्या देवतेचा तो मंत्र असेल त्याच्याशी एकरूपतेच्या भावनेने म्हणला जातो. ह्या मंत्रपठणामागे परमेश्वराकडून काही मिळावे अशी अपेक्षा नसते.

ह्या सगळ्यात तिसरा सगळ्यात श्रेष्ठ असतो. परंतु जरी पहिल्या दोन पद्धतीचा अवलंब योग्य मार्गाने आणि योग्य हेतुने करत गेला तरी ते माणसाला हळूहळू तिसऱ्या टप्प्यावर घेऊन जाते. हळूहळू देवतेशी एकरूपतेची भावना निर्माण होते. म्हणूनच बऱ्याच स्तोत्रात उपासनेच्या तिन्ही पद्धती एकमेकांत गुंफून समाविष्ट केल्या आहेत. सोप्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक श्लोक/ स्तोत्र आपण ऐहिक अडचणी नाहिशा करण्यासाठी, भक्ती ज्ञान वाढविण्यासाठी म्हणू शकतो. तसेच निस्वार्थीपणे परमेश्वराशी एकरूप होण्याच्या भावनेने म्हणू शकतो.

पारमार्थिक अवस्थेत असलेली व्यक्ति प्रार्थना करते - ` हे परमेश्वरा! मी फक्त तुझ्या शोधात आहे. मला इतर काही नको. मला कोणतीही इच्छा नाही. जेवढ्या जास्त इच्छा, तेवढ्या त्या पूर्ण करण्यास मला जास्त जन्म घ्यावे लागतील, म्हणून कृपया मला तुझ्यात एकरूप होऊ दे. ह्या जन्मात मी जर माझ्या अडचणी दूर कर असे मागणे तुझ्याकडे केले तर माझे कर्म संपविण्यासाठी मला परत जन्म घ्यावा लागेल. मग तेव्हा मला अडचणींना तोंड द्यावे लागेल.

सूज्ञ माणसे कोणत्याही अडचणींतून सूटका मागत नाहीत. ते प्रार्थना करतात, ``हे परमेश्वरा! ह्या अडचणींना तोंड देण्याची मनशक्ति मला दे.’’ पलायनवाद त्यांच्यात नसतो. मूर्ख माणूस आपल्या सर्व प्रार्थना अडचणीतून सुटकेसाठी वापरतो. अध्यात्मिक बॅंकेतील शिल्लक तो वाया घालवतो. शिल्लक भरभर कमी होत जाते. `हे परमेश्वरा! मला ह्या विशिष्ट अडचणीतून सोडव किंवा माझ्या मुलाला इंजिनिअयरींग कॉलेजला प्रवेश मिळविण्यात मदत कर.’’ अशा विनंतीमुळे आतापर्यंत केलेल्या सर्व प्रार्थना, पूजा हवेत विरून जातात.

म्हणून सूज्ञ लोक प्रार्थना करतात, ``हे परमेश्वरा! माझ्या प्रार्थना, जप, नाम संकीर्तन, पारायण ह्या सगळ्याची मदत मला तुमच्यात एकरूप होण्यासाठी होऊ दे. ह्या शिवाय मला इतर काहीही नको. माझ्या अडचणींना तोंड देण्यास मी तयार आहे. आजारपणातून मी जाण्यास तयार आहे. सगळ्या वेदना, अडचणीतून जाण्यास लागणारी शक्ति आणि शहाणपण ह्याचा आशीर्वाद दिलास तरी पुरेसे आहे. परंतु परमेश्वरा तू जर माझ्या अडचणी दूर केल्यास तर माझी अध्यात्मिक खात्यातील शिल्लक खूप कमी होईल. ते मला नको आहे. माझ्या पूजा, तपस, पारायण ह्याचा उपयोग मला फक्त तुझ्यात एकरूप होण्यासाठी व्हावा असे वाटते. त्याचा वापर मला इतर कशासाठीही करायचा नाही. आपल्यात एकरूप होण्यासाठी मला खूप मोठ्या शिल्लकेची गरज आहे. मी इतके दिवस जे केले ते एकरूप होण्यासाठी पुरेसे नाही. मला माझे प्रयत्न वाढविण्याची गरज आहे. ज्या अडचणींना तोंड देऊन त्या संपवू शकतो, अडचणींसाठी मी जर मूर्खपणाने ही शिल्लक माझ्या क्षुल्लक सांसारिक अडचणींसाठी वापरली, तर मी माझी साधनसंपत्ती वाया घालवली असे होईल. माझी शिल्लक शुन्यावर येईल आणि मला परत नव्याने प्रयत्न चालू करावे लागतील. हे खूप दु:खदायक असेल. तुम्ही माझ्यासोबत असलात तरी पुरेसे आहे. तुमची कृपा माझ्यावर असली तरी पुरेसे आहे. मी माझ्या कष्टांचा आनंदाने सामना करीन. मी माझी कर्म संपवीन. परंतु माझ्या पुण्यांचे रक्षण करा. कारण ते मला फक्त आपल्यात एकरूप होण्यासाठीच वापरायची आहे.’’

आपण बऱ्याचदा अशी लोक पहातो जे छोटी छोटी दुकाने, हॉटेल चालू करतात. परंतु मूर्खपणे आपले प्रमुख भांडवल किंवा साठा आपल्या किंवा कुटुंबियांच्या गरजांसाठी वापरतात. हॉटेलात कुटुंबातील सदस्य वरचेवर खाण्यासाठी येतात. दुकानातील किराणामाल घरासाठी वापरतात. जर त्यांचे कपड्याचे दुकान असेल तर स्वत:ला वापरण्यासाठी दुकानातील सगळ्यात चांगले कपडे लोक घेतात. याचा परिणाम म्हणजे दुकान दिवळखोरीत निघण्यासाठी वेळ लागत नाही. अध्यात्मिक बाबतीतही हेच धोरण आहे. जर तुम्ही देवास अभिषेक केलात आणि आपली वैयक्तिक अडचण सोडविण्यासाठी प्रार्थना केलीत तर त्या प्रार्थनेतून तुम्ही मिळविलेले सर्व पुण्य घालवता.

दत्त स्तवम्‌सुद्धा वरील सांगितलेले तीन हेतू पूर्ण करते. तिन्ही प्रकारच्या लोकांना अनुरूप अशा प्रार्थना स्वामी वासुदेवानंद सरस्वतींनी ह्यात समाविष्ट केली आहे.

आता आपण मुख्य मंत्राकडे वळू या. हे करण्यापूर्वी आपण ह्या मंत्रातील प्रमुख मुकुटाचा ‘स्मर्तुगामी सनोवतु’ ह्याचा अर्थ समजाऊन घेऊ या.

स्मर्तृगामी सनोवतु - ह्या शब्दातील तत्व

जरी ह्या मंत्रात पूर्णपणे दत्ताचा उल्लेख केला असला तरी त्यांच्या नावाचा प्रत्यक्ष संदर्भ दिला नाही. त्या ऐवजी `स्मर्तुगामी सनोवतु’ अशा शब्दांचा वापर केला आहे.

ह्या दोन विशेष शब्दांचा काय अर्थ असू शकेल? स्मर्तृगामी : त्याचा अर्थ – त्याचा विचार करताच ते तत्क्षणी प्रकट होतात. स्तोत्रात त्यांचे नाव येत नाही कारण वास्तववात त्यांना नाव नाही. सर्वव्याप्त अस्तित्वास नाव आणि रूप दिले तर ते मर्यादित होते. मुळात परमात्मा निराकार असून त्यास कोणतेही नाव नाही. सर्व स्वरूपात, सर्व भावनेत परमेश्वराचे अस्तित्व असते. तुझ्यात, माझ्यात सगळ्यांच्याच असते. औदुंबर आणि दिगंबर हे समानार्थी शब्द आहेत. सर्व दिशा (दिक्‌) हे परमेश्वराचे वस्त्र (अंबर) आहे ह्यावर जोर दिला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो सर्वव्याप्त आहे. तो सगळीकडे, प्रत्येक जणात आणि प्रत्येक गोष्टीत आहे. परंतु त्याचवेळी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना पकडणे अशक्य असते. परमात्म्याचे हे तत्त्व आहे. ज्याचे मूळ स्वरूप सर्वव्याप्त आहे त्यास नाव आणि रूप दिल्याने मर्यादितता येते.

व्यक्तीस स्वत: चे नाव कसे मिळते? सर्वसाधारण प्रथेनुसार नविन जन्मलेल्या मुलास पालक नाव देतात आणि ते त्याचे नाव असते. जर पालकांनी मुलाला नाव दिले नाही तर काय होईल? तर तो निनावी राहिल. जोपर्यंत तो मोठा होऊन स्वत: स्वतः:ला काही नाव घेत नाही तोपर्यंत तो निनावी राहिल. मुलाला नाव देण्यासाठीसुद्धा एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करायला लागतो. त्यास नामकरण संस्कार म्हणतात. बाळाला देवळात किंवा सद्‌गुरूंकडे घेऊन जातात. त्याचे नक्षत्र आणि इतर माहिती सांगून नाव विचारले जाते. प्रत्येक प्रांतात ही पद्धत वेगळी असते. सद्‌गुरूंकडे जाऊन नाव विचारणे ही पद्धतसुद्धा स्विकार्य आहे.

महर्षि अत्रींनी दत्तात्रेय भगवानांच्या बाबतीत सांगितलेल्या संस्कारांचे (शुद्धीकरण समारंभ) पालन केले नाही. त्यांनी नामकरण विधी केला नाही. कारण त्यांना माहित होते की परमात्मा जो संस्काररहित (प्रवृत्ती) आहे, जो ह्या सगळ्यांच्या पलिकडचा आहे , त्याने त्याचा पुत्र म्हणून जन्म घेतला आहे. आपला मुलगा काल स्वरूप आहे त्याची त्यांना जाणीव होती. खरं तर तो कालातीत होता.

कृष्णाच्या बाबतीत यशोदा मातेस ह्याची जाणीव नव्हती. तो आपला पुत्र आहे असे तिने गृहीत धरले होते. ह्या जाणीवेच्या अभावामुळे तिला त्याच्यापासून दूर जावे लागले. काही कालानंतर तिला जाणीव झाली की तो तिचा पुत्र नसून परमात्मा आहे. ती कृष्ण माया होती. दत्ताचे वडील अत्री आणि आई अनुसया होती. अ-त्री म्हणजे ज्याने त्रिगुण पार केले आहेत किंवा ज्याचे त्रिगुणांवर नियंत्रण आहे. अनसुया म्हणजे जिच्यात असूयेचा अंशपण नाही. त्यांनी दत्ताकडे आपला पुत्र म्हणून बघितले नाही. कोठल्याही संस्काराची त्यास गरज नाही ह्यावर त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांनी त्यास नाव दिले नाही.

जर त्याला नाव नव्हते तर आपण त्यास दत्त म्हणून का बोलावितो?

पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अत्री आणि अनसुयेने विंध्य पर्वत रांगेतील रुक्षाद्री पर्वतावर खडतर तपस्या केली होती. ब्रह्मा, विष्णु आणि शिवाच्या उपस्थितीत सर्व देवता ह्या विचाराने अचंबित होत होत्या की त्यांना तपस्येचे फल कोण देणार? 33 कोटी देवतांच्या सभेत असे ठरले की तीन प्रमुख देव त्या जोडप्याकडे जाईल आणि त्यांच्या तपस्येचे फळ देतील. ब्रह्मा, विष्णू आणि शिवांमार्फत जे वरदान दिले ते 33 कोटी देवतांचे वरदान होते. त्या योजनेनुसार ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर त्या जोडप्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, आम्ही स्वत:ला तुम्हाला भेट (दत्ता) देत आहोत.

दत्ता म्हणजे भेट, बक्षीस देणे. दत्ताचा अर्थ जो स्वत:ला देतो, किंवा जो ज्ञान देतो.

इंग्रजीमधून भाषांतर केले तर दत्ता म्हणजे अ) भेट ब) present हे दोन भागात विभागता येते. Pre-sent इतर कोणत्याही जीवींची निर्मिती होण्यापूर्वी दत्तास पाठविण्यात आले होते. क) Present म्हणजे वर्तमानकाळ. आपणसुद्धा वर्तमान काळात रहावे. इथे दत्त कालस्वरूप आहे. काल जो आपल्याला देण्यात आला आहे. निघून गेलेल्या कालाचा उल्लेख भूतकाळ असा केला आहे. येणाऱ्या कालाचा उल्लेख भविष्यकाळ असा केला आहे. महात्म्यांचा उल्लेख `वर्धन्ते’ असा केला जातो. त्याचा अर्थ ते पूर्णपणे वर्तमान कालात रहातात.

त्रिमूर्तींनी तीन डोके असलेल्या मुलाचे रूप धारण केले आणि ते त्या जोडप्याकडे गेले. जोडप्यास आशीर्वाद देताना देवाने दत्त’ हा शब्द उच्चारला. जवळपास असलेल्या लोकांनी हे पाहिले, ऐकले आणि ते त्या मुलास दत्त म्हणून बोलवू लागले. ह्या जन्मापूर्वी भगवानांनी नाव प्राप्त केले होते. तपस्वी त्या मुलास दत्तात्रेय म्हणून बोलवत असत. त्याचा अर्थ महर्षि अत्रींचा दत्त किंवा महर्षि अत्रींची भेट (दत्त). म्हणून ते खरंतर नाव घेतले नाही. अत्रिंची भेट’ असे म्हणून त्यास संबोधित करणे चालू राहिले.

अशा प्रकारे थोडक्यात सांगायचे तर परमेश्वरास नाव नसते. जो निराकार, नामरहित आहे त्याचे स्मरण करणे पुरेसे आहे. हा निनावी अवतार आहे.

जेव्हा आपण स्मर्तुगामी म्हणतो तेव्हा आपण असे सूचित करतो – हे परमेश्वरा! मी तुझे स्मरण करत आहे. त्याचे जोरजोरात नामोच्चारण करण्याची गरज नाही, फक्त त्याचे स्मरण केल्याने तो संतुष्ट होतो. परंतु आपण त्याचे स्मरण पूर्ण प्रेमाने, निष्ठेने, भय आणि आदराने करावे. मगच तो स्वत: प्रकट होतो. तो कुठे प्रकट होतो? जो बोलवत असतो त्याच्या हृदयात प्रकट होतो. केव्हा? ज्याक्षणी बोलाविले जाते त्याक्षणी प्रकट होतो. ह्या कारणासाठी, त्यास `स्मर्तृगामी असे योग्य नाव आहे. अशा उत्कट भक्तीच्या भावनेने स्वामी वासुदेवानंद सरस्वती परमेश्वरास अशा प्रकारे संबोधतात.

सनोवतु – ह्याचा अर्थ – परमेश्वर आमचे रक्षण करो. ‘आमचे’ ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? मी आणि माझे कुटुंब असा एक अर्थ लावता येईल. ह्याचा खरा अर्थ – माझे आणि सृष्टीतील सर्व जीवांचे रक्षण करो. संत लोक कधीच फक्त स्वत:च्या फायद्यासाठी प्रार्थना करत नाहीत. ते सृष्टीतील सर्व जीवींच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात – सर्वे जन सुखिनो भवन्तु, समस्त सद्‌मंगलानि संमंगलानी भवन्तु –

स्वत:च्या फायद्यासाठी तपस्या करणे चुकीचे आहे. प्रत्येकाने स्वत:साठी, कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, गावात राहणाऱ्या सगळ्यांसाठी, सृष्टीतील प्रत्येक जीवासाठी प्रार्थना करायला हवी. कुटुंबातील इतर सदस्य आनंदी नसले तर तो माणूस आनंदी कसा राहू शकेल? त्याचप्रकारे तो माणूस किंवा ते कुटुंब कसे आनंदी राहू शकतील जर त्याच्या गावातील इतर कुटुंब दु:खी असतील. तो खरा आनंद नसतो. जेव्हा जगातील प्रत्येकजण आनंदी असेल तेव्हाच खरा आनंद प्राप्त होतो. खरं तर माणसाने अशी प्रार्थना करावी की अस्त्वित्वातील सर्व जीव आनंदी राहोत. कारण सर्व लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. जर वरून खाली पाहिले तर असे दिसते. इतर लोकांमुळेच पृथ्वी अस्तित्वात आहे. पृथ्वी अस्तित्वात आहे म्हणून तुमचा देश तुमचे गाव अस्तित्वात आहे. गावात सामंजस्य असले तरच तुम्ही घरात शांतपणे राहू शकता. घरातील इतर सदस्य आनंदी असले तर तुम्ही आनंदी राहू शकता. म्हणून मोठ्या मनाचा माणूस अस्तित्वातील सर्व लोकांतील प्रत्येकाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.

तुमच्या शेजाऱ्यांसाठी, शत्रूसाठी, घरमालकासाठी, भाडेकरूंच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यास शिका. प्रत्येकास सद्‌बुद्धी मिळण्यासाठी प्रार्थना करा. खरा सज्जन माणूस जरी तो खूप अडचणीत असेल किंवा आजारी असेल तरी तो प्रार्थना करेल, ``माझ्या शत्रूवरसुद्धा अशी वेळ यायला नको.’’ ह्याने त्याच्या मनाचे मोठेपण प्रतिबिंबीत होते. शत्रूला शाप देणे, अपशब्द वापरणे किंवा त्याचे वाईट चिंतणे हे चुकीचे आहे.

ह्या दत्त स्तवम्‌मध्ये स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी `सनोवतु’ ह्या शब्दाचा वापर करून आपण सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू ह्याची खात्री करून घेतली!!

आता आपण दत्त स्तवम्‌ मधील श्लोकांकडे जाऊ या.

Tags: