नारी स्तनभार नाभीदेशं द्रिष्टवामागा मोहावेशम् ।
एतन्मांस वसादी विकारम् मनसी विचिन्तया वारम् वारम्।
तात्पर्य- एखाद्या युवतीचे सौन्दर्य पाहून त्याच्या मोहात पडू नका. हे समजून घ्या की हे मोहक सौंदर्य स्नायू, मांस आणि रक्तातील परिवर्तनाशिवाय दुसरे काहीही नसते. या सत्याबद्दल मनात विचार करा. सतत चिंतनातून, एक दिवस आपल्याला हि वस्तुस्थिती समजेल.
ह्या श्लोकात स्त्रीच्या शरीराचा आणि सौंदर्याचा मोह सोडण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त केले आहे. म्हणूनच हा नियम केवळ पुरुषांना लागू आहे अशा गैरसमजात स्त्रीने राहू नये. सत्य हे आहे की हा नियम दोघांनाही तितकाच लागू पडतो. बाह्य शारिरीक सौंदर्याचा मोह आपण सोडून द्यायला पाहिजे यावर जोर दिला आहे.
लोकांचे लक्ष बाह्य (शारीरिक) सौंदर्याकडे केंद्रित होणे सामान्य आहे, इतर व्यक्तीच्या बुद्धी , शहाणपणा किंवा ज्ञान यावर केंद्रित होत नाही. वासनांच्या सापळ्यात अडकणे म्हणजे मानवी जन्म वाया घालवणे. रक्त आणि हाडे मांस याने बनलेले शरीर मृत्यू पावते आणि कुजते. तर मग एखाद्या व्यक्तीने या क्षणभंगुर गोष्टींची लालसा केव्हा पूर्ण करावी ?
सहा अंतर्गत शत्रूंमध्ये काम (वासना आणि इतर इच्छा) प्रथम येतो आणि अगदी महान व्यक्तीलाही फसवण्याची क्षमता आहे. संपूर्णपणे कामाने व्यापलेल्या व्यक्तीमधी योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि विवेक शक्ती (विवेक) कमी होते. तो चांगल्या आणि वाईट यातील फरक जाणू शकत नाही. नहुशाची कथा ही ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
स्वर्गातील देव पद मिळविणे हा सर्वसाधारण पराक्रम नाही. कठोर तपश्चर्या केलेले महात्माच केवळ ते पद मिळविण्यास सक्षम असतात . हे प्रतिष्ठित स्थान मिळवल्यानंतरही नहुशाच्या मनात शचि-देवीबद्दल (भगवान इंद्राची पत्नी ) मोह निर्माण झाला. आणि परिणामी तो त्याच्या स्थानावरून खाली आला. अगदी महर्षी विश्वामित्रदेखील मोहाने वश झाले आणि याचा परिणाम म्हणून त्यांच्या तपश्चर्येची संपूर्ण शक्ती वाया गेली.
या सर्व संसाराचे (वारंवार पुनर्जन्म घेणे ) मूळ शरीरावरचे प्रेम आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, मानवांच्या पतन होण्याचे कारण त्याचा शरीरावरील मोह हे आहे. हेच मनुष्याच्या पतनाचे कारण आहे. जेव्हा जेव्हा त्याने या मोहावर विजय मिळविला तेव्हा तेव्हाच त्यास आवश्यक असलेली शांती मिळू शकते.
भौतिक शरीराच्या भ्रमात मानवाचा बळी पडू नये म्हणून या श्लोकात देहतत्वाचे वर्णन केले आहे. या भौतिक शरीरात त्वचा, मांस आणि स्नायू, पू, रक्त, हाडे, अशुद्ध द्रव स्राव रूपात साठविलेला - अशा प्रकारच्या सर्व गोष्टींचा समावेश असतो. प्रत्येक क्षणाला या भौतिक शरीरात बदल होतो.
स्वामीजींनीही त्यांच्या ‘नगरम् नगरम् नारायण नगरम्’ या भजनात मानवी देहाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. शहराला दोन स्तंभानी आधार दिल्याप्रमाणे हे मानवी शरीर आहे(पाय). यात हात नावाच्या दोन लांब तारा आहेत. या रचनेवर विशाल तुळई ठेवल्याप्रमाणे हे शरीर त्यावर टेकलेले आहे. ही संपूर्ण रचना सुंदर त्वचेने सुबकपणे झाकलेली आहे. यात ९ छिद्र आहेत ज्यामधून अशुद्धता सतत फेकली जाते. घाम सुद्धा अशुद्धतेखेरीज दुसरे काही नाही. अशा अपवित्र घन गोळ्यास ‘शरीर’ असे नाव देण्यात आले आहे. आपण त्याचे कौतुक आणि प्रशंसा करण्याचा अभिमान बाळगतो आणि त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी खूप मेहनत घेतो. दरम्यान वृद्धावस्था येते आणि शरीरात बरेच बदल होतात. त्यास आजार होतात. हे शरीर कोणत्या क्षणी खाली पडेल हे आपल्याला माहित नसते. त्यानंतर काय होईल? आगीत टाकल्यास त्याची राख होते. दफन केल्यानंतर ते कुजते. आणि असेच ठेवले तर त्यावर सूक्ष्मजंतूंचे प्रजनन होते आणि ते सडून जाते.
पुरुष आणि स्त्री दोघांनीही आपल्या शरीरावर आणि एकमेकांबद्दल असलेल्या या शारीरिक आकर्षणापासून स्वतः:ला परावृत्त केले पाहिजे. त्याच्या जाळ्यात न अडकण्यासाठी पुन्हा पुन्हा या भौतिक शरीराचे अचिरस्थायी स्वरूप आठवावे. या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी सतत ‘गोविंदाचा’ नामजप करत राहावा.