SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
भज गोविंदम् ०२: श्लोक १

भज गोविन्दं भज गोविंदम् गोविन्दं भज मूढमते । सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृङ्करणे ॥ १

हे मूर्ख, अज्ञानी व्यक्ती (मूढ)! भगवान गोविंदाचा आदर आणि उपासना कर! मृत्यूच्या शेवटच्या घटकामध्ये, आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या धड्यातील व्याकरण कोणत्याही प्रकारे आपल्या मदतीस येणार नाही!

शंकरा भगवद्-पद्याचार्य आपल्या शिष्याला ‘मूढ-मते’ असे संबोधून आपल्या उपदेशाची सुरूवात करतात. सामान्यतः मूढ हे मूर्ख व्यक्तीच्या संदर्भात बोलले जाते. तथापि वेदान्तानुसार,जी व्यक्ती मोहात बुडली आहे., ती ‘मुढ’ असते.

या मोहामुळे व्यक्तीला असा विश्वास वाटतो की तो म्हणजे इंद्रिय असलेले भौतिक शरीर आहे. पूर्णपणे हा विश्वास असल्यामुळे , तो त्याचा खरा आत्मा ओळखू शकत नाही. हा मोह आहे.

भ्रमात बुडलेल्या मानवांची उन्नति कशी होईल? त्यांच्यासाठी कोणता मार्ग आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, व्यक्तीमध्ये ही वाईट परिस्थिती का निर्माण होते हे पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे.

आपली उपनिषदे अधिकाराने सांगतात की आध्यात्मिक अज्ञान (अविद्या) किंवा भ्रम (माया) हे यामागील कारण आहे. वेदांताच्या समर्थकांनी निर्णायकपणे सांगितले आहे की आत्म्याविषयी जे ज्ञान (विद्या) शिकवतात ते वगळता इतर सर्व प्रकारच्या ज्ञानांना अविद्या (अज्ञान) म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. या कोनातून पाहिल्यास, अगदी वेदांग (वेदांचा अभ्यास आणि वेद समजण्यास असलेले संबंधित सहायक विषय) ज्यात व्याकरण समाविष्ट आहे, त्यांना ‘अविद्या’ असेही म्हटले जाऊ शकते.

म्हणूनच, या स्तोत्रात, व्याकरण सूत्र लक्षात ठेवण्यासाठी जो पूर्ण वेळ वाया घालवितो, अशा व्यक्तीला शंकर भगवद्-पादाचार्यांनी फटकारले आहे. अशामुळे स्व: वर /आत्म्यावर लक्ष केंद्रित करण्याकडे दुर्लक्ष होते. हा वेळेचा अपव्यय आहे. मृत्यूच्या शेवटच्या घटकेला, परमात्म्याबद्दल विचार करण्याऐवजी व्याकरणावरील हे धडे आठवतील.

जर आपल्याला हे अंतिम लक्ष्य प्राप्त करायचे असेल ज्यामध्ये परमात्म्याच्या विचारांनी मृत्यूच्या शेवटच्या क्षणी मनावर करावे असे वाटत असेल तर तर भौतिक शरीर तरुण, उत्साही आणि निरोगी आहे तेव्हापासूनच सतत ईश्वरी नामजप चालू ठेवणे आवश्यक आहे!

हे केवळ ठामपणे सांगितले गेले आहे म्हणून इतर ज्ञान आणि शास्त्रवचने यांना निरुपयोगी म्हणून संबोधत बाजूला काढून टाकू शकत नाही. या सर्व शास्त्रांचा (शास्त्रांचा) उपयोग परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी असलेली साधने म्हणून केला पाहिजे आणि हि मानसिकता ठेवून त्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. केवळ आत्म्याचे तत्व समजून घेणे हे ध्येय असले पाहिजे.

एक माणूस असा होता की त्याने आयुष्यभर कधीही देवाबद्दल कोणताही विचार केला नाही. मृत्यूच्या वेळी शेवटच्या श्वासात त्याने परमेश्वराचे नाव घ्यावे म्हणून त्याच्या नातेवाईकांनी खूप धडपड केली जेणेकरून तो कमीतकमी काही पुण्य जमा करू शकेल. त्यांच्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. अंतिम उपाय म्हणून, त्यांनी एक घासणी आणली (भांडी घासण्यास वापरले जाते) आणि त्याला त्याचे नाव सांगायला सांगितले. त्यांना आशा होती की तो ‘नार’ म्हणेल, जे भगवान नारायणाचे अर्धे नाव असेल आणि अशा प्रयत्नाने तो थोडेसे पुण्य जमा करेल. पण त्या माणसाने ‘पेचू’ (सामान अर्थी शब्द) म्हणाला आणि मरण पावला. ज्यांना लहानपणापासून देवाचे नावघेण्याची सवय नसते त्यांची स्थिती अशी असते.

‘भज गोविंदम’ म्हणजे ‘त्या परमात्म्याचे खरे स्वरूप समजून घेणे / प्रतिबिंबित करणे’. ही वस्तुस्थिती निर्ढावलेल्या मानवी बुद्धीकडे दृढपणे वळविली जावी यासाठी ‘भज गोविंदम्’ ह्या शब्दांची तीनवेळा पुनरावृत्ती केली आहे .

‘श्रीमद् भागवत ’ या पवित्र ग्रंथात असे म्हटले आहे की जेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि गायींना संरक्षण दिले तेव्हा भगवान इंद्रांनी ‘गोविंदा’ म्हणून त्यांची स्तुती केली. ‘गोविंदा’ म्हणजे ‘गायींचा परमेश्वर’. खरे तर वास्तवात , ‘गो’ म्हणजे ‘त्यांच्यात प्राण (जीवनशक्ती) आहे ते सर्व प्राणी’. ‘भज गोविंदम’ची सुरवात कशी झाली? एकदा शंकर भगवद्-पादाचार्य स्वामी गंगा नदीत स्नान करून परत येत होते, एका विद्वान शिक्षकाजवळून ते जात होते. ते शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्याला व्याकरणात्मक धड्यातील ‘डुकरिन् करने ’ हा शब्द घोकवून शिकविण्याचा प्रयत्न करीत होते. लहान मुलाला हा शब्द अचूकपणे सांगता येत नव्हता आणि शिक्षक कठोरपणे प्रयत्न करत होते. हे चालू असतानाच शिक्षकांच्या हातातील पाण्याचे भांडे खाली पडले. घरंगळत जाणाऱ्या पाण्याच्या भांड्यातून ‘डुकरिन् करने,डुकरिन् करने’ हा आवाज निर्माण झाला . याचा अर्थ असा की या अथक प्रयत्नांमुळे, पाण्याच्या भांड्याने देखील व्याकरणाचा हा धडा उचलला होता.

ते पाहून, शंकर भगवद्-पादाचार्य स्वामी खूप विचलित झाले . त्यांना वाईट वाटले की ही माणसे स्व: स्वरूपाचा अभ्यास करणे पूर्णपणे विसरून गेले आहेत आणि केवळ अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या कार्य कामाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. लगेच त्यानी हे भजन लिहिले - भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते

या स्तोत्रात समाविष्ट असलेले तत्वसार समजून घेण्यासाठी आता आपण इतर श्लोकांकडे जाऊया.

Tags: