SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25-12-2020
भागवत 000२: नारद महर्षि आणि भक्ती देवी यांच्यात चर्चा

नारद महर्षि पुढे म्हणाले, “या कलियुगात ज्ञान आणि वैराग्य बाबत विसरून जा, लोकांमध्ये भक्तीही कमी झाली आहे. हेच कारण आहे की तुम्ही तिघे वृद्ध झालात. तुम्ही वृंदावन गाठले हे आपले मोठे भाग्य आहे. हे भक्ती, या भूमीच्या प्रभावामुळे तुला तुझे तारुण्य पुन्हा मिळू शकले. या वृंदावनमध्ये भक्तीचे राज्य आहे.

परंतु कोणालाही सर्व श्रेष्ठ ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्याची चिंता नाही. याचा परिणाम म्हणजे, तू पुन्हा तरुण झालीस तरीही तुझी मुले वृद्धच राहिली. तथापि, या पवित्र भूमीच्या प्रभावामुळे, बर्‍याच दिवसानंतर ते आता आरामात झोपू शकतात. ”

हे ऐकून भक्तीदेवींनी विचारले, “हे महर्षी, परीक्षित राजाने अपवित्र कलीची (युग) पूजा कशी केली? त्याने कलियुगची स्थापना का आणि कशी केली? कलियुग सुरू झाल्यावर धर्माच्या तत्वाचे काय झाले? ते कोठे गायब झाले? करुणामयी असलेले परमात्मा हरी ह्या(पापी) कलीस का सहन करतात? कृपा करुन मला ते समजावून सांगा.”

यावर महर्षि नारदांनी उत्तर दिले, “हे तरुण स्त्री, मी तुला एक गोष्ट सांगेन ज्यामुळे तुझी शंका तसेच तुमच्या अडचणी दूर होतील. श्रीकृष्णाने आपल्या निवासस्थानाकडे परत जाण्यासाठी पृथ्वी सोडली त्या क्षणी कलियुगने पृथ्वीवर स्वतःची स्थापना केली.परीक्षित जेव्हा दिग्विजय यात्रेत होता तेव्हा कलीपुरुष त्यास भेटला. अश्रुपूर्ण डोळ्यांनी कलीपुरुष सम्राटाच्या पायावर पडून त्याने आश्रय मागितला . सुरुवातीला परीक्षितला कलीला ठार मारायचे होते, पण त्यानंतर त्याने पुढील वाक्यांवर विचार करण्यास सुरवात केली-

‘यत् फलं नास्ती तपसा न योगें समाधी नाम्

तत् फलम् लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात्

तात्पर्य: कृत, त्रेता आणि द्वापार (प्रथम तीन युग ) युगात जे तप, योग आणि समाधीने मिळू शकले नाही, ते केवळ हरिच्या नावाचा जप केल्याने कलियुगात प्राप्त होऊ शकेल.’

परिक्षितचा असा विचार होता की सध्या एकाच रूपात आणि एकाच ठिकाणी असलेला कली अनेक भागात विभागल्याशिवाय त्याचा फायदा मिळू शकणार नाही. त्याचे कारण असे होते की मंदिर, नद्या, शाळा आणि पवित्र ठिकाणांमधून सार नष्ट झाले होते. हे घडत होते कारण या कलियुगाचे दैवत एकाच स्वरूपात होते. यात त्याचा कोणताही दोष नव्हता. हा युग धर्म आहे (विशिष्ट युगासाठी धार्मिकतेचा विशिष्ट पैलू).

‘या सर्वांमध्ये कलीचा काय दोष होता? म्हणून त्याला ठार मारण्यात काही अर्थ नाही, मी फक्त त्याला विभागून टाकीन ‘,असा परिक्षितने विचार केला. त्याने ताबडतोब कलीस विभागले.” अशाप्रकारे नारदांनी कलीची कहाणी पूर्ण केली.

त्यानंतर भक्तीने नारद महर्षिंची प्रशंसा केली आणि त्यांचे स्तुतीगान केले . भगवान नारद नंतर म्हणाले,

“वृथा खेरयसे बाले अहो चिंतातुरा कथम् श्री कृष्ण चरणाम भोजं स्मर दु:खम् गमिश्यति अर्थ: हे भक्तिबाला, तू अनावश्यकपणे दु:खी होत आहेस . श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे स्मरण कर. तुझे दु: ख दूर होईल.

त्याने द्रौपदीचे कौरवांपासून रक्षण केले. त्याने गोपिकांचे रक्षण केले. हे भक्ती, तू भगवान विष्णूला खूप प्रिय आहेस. तू त्याला हाक मारल्यास तो नक्कीच येईल. कृत , त्रेता आणि द्वापारयुगात, ज्ञान आणि वैराग्य ही अशी साधने होती जी मुक्ती देत होती. कलौ तू केवला भक्ती: ब्रह्म सायुज्य कारिणी - याचा अर्थ- कलियुगातच भक्ती मुक्ती देऊ शकते.

या हेतूने, परम प्रभूने तुला निर्माण केले. भक्तांचे पालनपोषण करण्याची जबाबदारीही त्यांनी तुझ्यावर सोपविली आहे. तू देखील यास संमती दिली आहे. त्याने मुक्तीला तुझा सेवक बनविला आहे. ज्ञान आणि वैराग्य तुला पुत्र म्हणून देण्यात आले आहेत. आपल्या सत्य स्वरूपात तू वैकुंठात (भगवान विष्णूचा निवासस्थान) आहेस. येथे जे अस्तित्वात आहे ती फक्त छाया रूप आहे. द्वापर युगापर्यंत (तिसरे युग )तू नेहमीच आनंदी होतीस . कलियुगात मुक्ति दुर्बल आणि नाहीशी झाली आहे.ती वैकुंठाकडे परत गेली आहे. आता, जर तुझी इच्छा असेल तरच स्वर्गातून मुक्ति खाली येईल.

आतापर्यंत तू ज्ञान आणि वैराग्य ह्या तुझ्या मुलांचे रक्षण केलेस . परंतु कलियुगातील लोक त्यांची उपेक्षा करतात. या कारणास्तव, ते म्हातारे झाले आहेत.

तरीही तू निराश होऊ नकोस . लक्षात ठेव दुसरा कोणताही कालावधी नाही जो कलियुगासमान असेल! या कलियुगात मी तुला प्रत्येक घरात स्थापित करीन. आजपासून मी ह्या संकल्पाचा निश्चय केला आहे.

भक्तीच्या माध्यमाने या कलियुगातील लोक आपली पापं धुवून काढतील. राक्षस, भुते इत्यादीसुद्धा भक्तीने भगवान हरिबद्दल विचार करतील. भगवान श्रीहरी योग्य भक्तीद्वारे सहज प्राप्त होऊ शकतील. भक्तीद्वारे जितक्या सहजतेने ते प्राप्त होतील तितक्या सहजतेने इतर कोणत्याही माध्यमाने प्राप्त होणार नाहीत. केवळ भक्तीच मुक्ती देऊ शकते. अशा प्रकारे नारद महर्षिंनी भक्तीदेवीत आत्मविश्वास निर्माण केला.

हे नारदांचे शब्द ऐकून भक्तीदेवी सर्व दु: खापासून मुक्त झाली. पण तिच्या मुलांचे म्हातारपण अजूनही तसेच राहिले होते. आता ती प्रार्थना करू लागली कि तिचे दु:खपण निघून जावे.

त्यानंतर नारदा महर्षीने तिच्या दोन्ही मुलांचे कान धरले आणि त्यांना दीक्षा दिली. त्या दोघांनी हळू हळू डोळे उघडले, खाली बसले, कमजोरपणे नारद महर्षिंकडे पाहिले आणि मग पुन्हा झोपी गेले. हे पाहून, नारद महर्षींनी वारंवार त्यांना दीक्षा दिली पण ते थोडेपण हलले नाहीत. त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आता नारद काळजी करू लागले.

तितक्यात त्यांना आकाश वाणी ऐकावयास आली - “हे महर्षी, दु: खी होऊ नका. आपले प्रयत्न यशस्वी होतील. आपण या जगात भक्ती पसरवण्याचे कार्य पूर्ण करा. याने केवळ भक्तीच अत्यंत प्रसन्न होणार नाही तर तिचे पुत्र, ज्ञान आणि वैराग्य देखील त्यांच्या वृद्धत्वापासून मुक्त होतील. ते पुन्हा एकदा संपूर्ण तेजस्वीतेने चमकतील.”

अशरीरी वाणी ऐकून, नारद महर्षींनी असा विचार केला - ओम नमो नारायणाय!

Tags: