SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
००२ : मारुती नावातील महत्त्व

चला आता ‘मारुती’ नावाचे महत्त्व समजून घेऊया. ‘मरुत्‌’ म्हणजे ‘वारा’. पवनपुत्र म्हणून हनुमानाला ‘मारुती’ असे संबोधले जाते. ‘मरुत्‌’ या शब्दाचा अर्थ ‘देवता’देखील आहे. हनुमानात सर्व देवतांचा अंश असल्यामुळे तो ‘मारुती’ आहे. ‘रुती’ म्हणजे दु:ख. दुःख निवारण करणारा म्हणून, तो ‘मारुती‘ आहे. ज्याप्रमाणे वारा वाहतो परंतु अदृश्य असतो, त्याचप्रमाणे प्रभुसुद्धा त्यांचे स्मरण करणाऱ्यांचे दु:ख दूर करतात आणि त्यांचे दु:ख नाहीसे करतात. या कारणास्तव, जेव्हा आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडतो तेव्हा आपण ‘हे मारुतीराया, हे प्रभो! आम्हाला पर्वतकाय विशाल अडचणी आल्या आहेत त्याचा मागमूससुद्धा न राहू देता त्या पूर्णपणे नाहीशा कर.’ अशी प्रार्थना हनुमानाकडे करतो. ‘रुती’ म्हणजे ‘ध्वनी’. ‘मा’ म्हणजे ‘देवी लक्ष्मी’. जो ओंकाराचा शुभ ध्वनी निर्माण करतो तो ‘मारुती’ आहे. याचा अर्थ असादेखील केला जाऊ शकतो - ‘माता लक्ष्मी (मा) यांच्याकडून जपला जाणारा मंत्र (ध्वनी, रुती) हा मारुती आहे’. तो स्वत: भगवान विष्णूंचा अंश आहे. तो इतर कोणीही नसून मारुतीच आहे. या सर्व विश्लेषणावरून हे सिद्ध होते की हनुमानाचे मूलभूत तत्त्व या तीन नावांमध्ये समाविष्ट झाले आहे. त्यांच्यातच त्याचे सर्व प्राथमिक अंश समाविष्ट आहेत. असे या नावांचे महत्त्व आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण ‘सत्य हरिश्चंद्र’ असे म्हणतो, तेव्हाच त्या नावात असे प्रकट होते की सत्याच्या व्रताचे पालन केल्यामुळे, त्याचे मन चंद्राच्या शीतलतेने सर्व काही पाहत असते आणि तो चंद्राप्रमाणे शांत असतो. याच कारणास्तव आपले वडीलधारे आपल्याला नावाशी साधर्म्य जोडत वर्तन करायला सांगतात. जेव्हा आपली कृती आपल्या नावाच्या अर्थाच्या विरुद्ध असते तेव्हा ते आपणास शिक्षा करतात. जर आपल्याला हनुमानाचे तत्त्वसार अधिक तपशीलाने जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या जीवनकथेचा खोलवर अभ्यास करणे आवश्यक आहे. श्रीमद्‌ रामायणातील सुंदर-कांड आणि उत्तर-कांड विभागात हनुमानाची कथा विस्तृतपणे दिली आहे. महर्षी वाल्मीकी आणि तुलसीदास यांच्यापासून सुरू झालेल्या विविध प्रांतातील अनेक परम महात्म्यांनी त्यांना जसे समजले आहे तसे या भगवंताच्या माहात्म्याचे स्तुतीपर वर्णन केले आहे. या परमेश्वराचे महिमावर्णन सर्व भाषांमध्ये आढळते. हनुमानाच्या कथाभागातील सर्वांत विस्मयकारी पैलू कोणता आहे? तर प्रत्येक त्रेता युगात (चार युगांतील दुसरे युग) भगवान श्रीराम नव्याने जन्म घेतात.

पुढील भागात चालू ठेवू या…..!

Tags: